https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपाचे पानिपत का झाले?


 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बसपाचे पानिपत का झाले?

बसपाचे संस्थापक स्वर्गीय कांशीराम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात नेला. उत्तर प्रदेश सारख्या परंपरेचा प्रचंड प्रभाव असलेल्या राज्यामध्ये कांशीराम यांनी अत्यंत मेहनतीने हा विचार रुजवला. त्यासाठी संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढला. सामाजिक परिघाबाहेर असलेल्या वंचित जातींचे संघटन घडवून आणण्यासाठी बसपा हा पक्ष काढला. "तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार" या घोषणेच्या माध्यमातून ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात एल्गार सुरू केला. त्यांच्या या कार्यामुळे हजारो वर्षापासून शोषणाला बळी पडलेल्या उत्तर प्रदेशातील वंचित आणि मागासलेल्या जातींनी बसपाला पाठिंबा दिला. शोषणाने पीडित असलेल्या जातींचा नवा आवाज म्हणून बसपाला ओळखले जाऊ लागले. कांशीराम यांनी विविध जाती समूहांना एकत्र आणून बसपाचा विस्तार केला. पक्षाचा विस्तार घडवून आणण्यासाठी मायावती सारख्या तरुण स्त्रीच्या हातात पक्षाची नेतृत्वाची सूत्रे सोपवली. बसपाने स्थापनेपासूनच विविध पक्षांशी आघाडी करून उत्तर प्रदेशात अनेकदा सत्ता प्राप्त केली. मायावती सारखी दलित महिला उत्तर प्रदेशची पाचदा मुख्यमंत्री झाली.

2006 मध्ये पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांच्या निधनानंतर झालेल्या 2007 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला जवळपास 206 जागा मिळाल्या. या निवडणुकीत सर्वाधिक 30.43 टक्के मते मिळाली. निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मायावतींकडे भविष्यातील पंतप्रधान पदाचे सक्षम उमेदवार म्हणून पाहिले जाऊ लागले. भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगाने विस्तारत जाणारा पक्ष म्हणून बसपाकडे पाहिले जाऊ लागले. परंतु 2007 च्या निवडणुकीनंतर बसपाचा यशाचा आलेख घसरु लागला. 2012 च्या निवडणुकीत बसपाला सत्ता गमवावी लागली. 206 जागांवरून पक्षाला अवघ्या 80 जागांवर समाधान मानावे लागले. 2017 च्या निवडणुकीत पक्षाला फक्त 19 जागा मिळाल्या तर 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला अवघी एक जागा आणि 12.88 टक्के मते मिळाली. बसपा सारख्या प्रभावशाली पक्षाची उत्तर प्रदेशात इतकी वाईट परिस्थिती का झाली हा चिंतनाचा मुद्दा बनला.

लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी-

लोकसभा

निवडणूक वर्ष

एकूण लढविलेल्या जागा

विजयी जागा

प्राप्त मतांची टक्केवारी

नववी

१९८९

२४५

०४

४.५३

दहावी

१९९१

२३१

०३

३.६४

अकरावी

१९९६

२१०

११

११.२१

बारावी

१९९८

२५१

०५

९.८४

तेरावी

१९९९

२२५

१४

९.९७

चौदावी

२००४

४३५

१९

६.६६

पंधरावी

२००९

५००

२१

६.५६

सोळावी

२०१४

५०३

००

४.१९

सतरावी

२०१९

३८३

१०

३.६७

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी-

विधानसभा

निवडणूक वर्ष

एकूण लढविलेल्या जागा

विजयी जागा

प्राप्त मतांची टक्केवारी

बारावी

१९९३

१६४

६७

११.१२

तेरावी

१९९६

२९६

६७

१९.६४

चौदावी

२०२

४०१

९८

२३.०६

पंधरावी

२००७

४०३

२०६

३०.४३

सोळावी

२०१२

४०३

८०

२५.९५

सतरावी

२०१७

४०३

१९

२२.२४

आठरावी

२०२२

४०३

०१

१२.८८

 

2007 ची विधानसभा निवडणूक हा बसपाच्या राजकीय वाटचालीचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. बसपाच्या स्थापनेपासून ते 2007 पर्यंत पक्षाने चढत्या आलेखात यश मिळवले. मात्र 2007 नंतर हा आलेख वेगाने घसरू लागला. 2022 च्या निवडणुकीने बसपाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बसपा सारख्या पक्षाची फार मोठ्या प्रमाणावर घसरण होण्यास कारणीभूत गोष्ट म्हणजे मायावतीची सोशल इंजिनिअरिंगची कल्पना मानली जाते. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत मायावतीच्या सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पनेमुळे यश मिळाले शी देशभर चर्चा झाली. मात्र मायावतींच्या सोशल इंजिनिअरिंगचा पाया मजबूत होता का? याची कधीही शास्त्रीय पद्धतीने चर्चा झाली नाही. त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगचे कल्पनेचे तीन महत्त्वाचे घटक होते; दलित, ब्राह्मण आणि मुस्लिम परंतु हे तिन्ही घटक आंबेडकरी विचारधारेवर विश्वास ठेवून एकत्र आलेले नव्हते. दलित वर्गांमध्ये आंबेडकरवादाबद्दल आस्था होती. परंतु ब्राह्मण आणि मुस्लिम हे घटक प्रस्थापित पक्षांवर असलेल्या नाराजीतून बसपाच्या जवळ ले होते. सपा आणि भाजपने या दोन्ही वर्गांना गोजारण्याचे प्रयत्न करता या घटकांनी बसपाची साथ सोडली. 2012 च्या निवडणुकीत मुस्लिमांनी सपाला साथ दिली. 2019 आणि 2022 च्या निवडणुकीत ब्राह्मणांनी भाजपला जवळ केले. बसपाच्या सोशल इंजिनिअरिंगची कल्पना कमकुवत पायावर उभी होती. तात्कालिक राजकीय लाभासाठी एकत्र आलेल्या घटकांना सोशल इंजीनियरिंग मानून मायावतीने सुरू केलेली वाटचाल क्षाला अधोगतीच्या दिशेने नेणारी ठरली. सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या नादात मायावतीने बसपाच्या मूळ विचारधारेला तिलांजली दिली. ब्राह्मणांचा पाठिंबा मिळवण्यासाठी "हाथी नही गणेश है, ब्रह्म-विष्णू-महेश-है..! 'ब्राह्मण शं बजायेगा, हत्ती दिल्ली जायेगा! ' अशा घोषणा केल्या गेल्या. फुले, शाहू डॉ.आंबेडकर यांची विचारधारा बसपाचा वैचारिक पाया होती. कांशीराम यांनी निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी विविध राजकीय पक्षांची आघाडी करून पक्षाचा विस्तार घडवून आणला. मात्र आपली वैचारिक बांधिलकी आणि निष्ठा कधीही सोडली नाही.  ही त्यांची भूमिका मायावतीने कायम ठेवली नाही. राजकीय सोयीनुसार आपली धोरणे बदलली. पक्षाच्या मूळ विचारधारेला तिलांजली देणाऱ्या अनेक घोषणा किंवा कार्यक्रम राबवले. उदा. क्षा मार्फत भरवली गेलेली ब्राह्मण संमेलने, परशुरामाची मूर्ती उभारण्याच्या घोषणा, पक्षाचे निवडणूक चिन्ह हत्तीला गणेशाची दिलेली उपमा . सारख्या वैचारिक धरसोडपणामुळे त्यांच्या हक्काचा दलित मतदार दुरावला. सवर्णांची मते मिळवण्यासाठी केलेल्या कसरती पक्षाच्या अलगट आल्या. दलितां सोबत सवर्णांनी देखील पक्षाची साथ सोडल्यामुळे बसपाची स्थिती नाजूक बनली.

बसपाची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट होण्यास मायावतींची व्यक्तिवादीवृत्ती देखील कारणीभूत मानले जाते. वास्तविक आंबेडकरी विचारधारा व्यक्तीपूजेची कट्टर विरोधक आहे. व्यक्तीपूजा हे हुकूमशाहीचे लक्षण आहे असे मानते. परंतु मायावती यांनी 2007 मध्ये पूर्ण बहुमतानी सत्तेवर आल्यानंतर व्यक्ती स्तोम माजविण्या सुरुवात केली. मुख्यमंत्री असताना फुले-शाहू-आंबेडकर, कांशीराम आणि स्वतःचे पुतळे आणि स्मारके उभे करणे सुरु केले. अनेक गावे आणि जिल्ह्यांची नावे बदलण्यास सुरुवात केली. त्यांची ही कृती त्यांच्या अनेक समर्थकांना रुली नाही. सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली बसपाशी जुळलेले ब्राह्मण किंवा सवर्ण नेतृत्व हळूहळू नाराज होऊन बसपा पासून दूर जाऊ लागले.

मायावती यांनी पक्षाची घटना आणि विचारधारेत मनाप्रमाणे बदल घडून आणला. पक्षाचे नेतृत्व कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवण्यासाठी पक्षाच्या घटनेत बदल करून इतरांशी चर्चा करता स्वतःला अध्यक्ष घोषित केले. कांशीराम यांच्या बरोबरीने पक्षबांधणी योगदान देणाऱ्या अनेक नेत्यांना मायावतीची एकाधिकारशाही पटल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला. उदा. इंद्रजीत सरोज, राम अचल राजभर पक्षातले जुने कार्यकर्ते आणि सहकारी यांनी पक्ष सोडल्यामुळे पक्षामध्ये दुय्यम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी मायावती यांनी भाऊ आनंदकुमार, भाचा आकाश नंद, महासचिव सतीशचंद्र मिश्रा यांना पक्षात महत्वपूर्ण पदे बहाल केली. इतर पक्षाप्रमाणेच बसपाची वाटचाल घराणेशाहीच्या दिशेने होऊ लागल्यामुळे त्या पक्षाचे वेगळेपण ष्ट झाले. दलित, मागास, उपेक्षित समाजाच्या विकासासाठी स्थापन झालेला पक्ष विशिष्ट कुटुंबाच्या मक्तेदारीचा भाग बनू लागल्यामुळे जाटव सोडून अन्य मागास जाती बसपा पासून दूर जाऊ लागल्या याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2007 मध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 89 जागांपैकी 61 जागांवर बसपाला विजय मिळाला होता. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 84 मतदारसंघांपैकी एकाही मतदार संघात बसपाला विजय मिळाला नाही. 76 मतदारसंघांमध्ये बसपाला तिसऱ्या नंबरची मते मिळाली यावरून असे लक्षात येते की बसपाचा आधार असलेला अनुसूचित जाती हा पारंपारिक मतदार देखील त्यांच्यापासून दुरावला. कांशीराम यांच्या मृत्यूनंतर दलितांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्यासाठी मायावती यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत. उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये दलित अत्याचाराच्या असंख्य घटना घडत असताना सुद्धा मायावतींनी फार व्यापक प्रमाणात आवाज उठवला नाही. परिणामत: उत्तर प्रदेश मधला वंचित वर्ग बसपा पासून दुरावला याचा प्रत्यय 2022 च्या निवडणूक निकालात दिसून आले. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 63 मतदार संघात भाजपने आणि 20 मतदार संघात सपाने यश मिळवले.

बसपाच्या राजकीय अपयशाला देशाची बदलती राजकीय परिस्थिती देखील कारणीभूत आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदींचं राजकीय नेतृत्व विकसित झाल्यानंतर देशाच्या राजकीय परिस्थितीत फार मोठा व्यापक बदल झाला. जातीय राजकारणाची जागा धार्मिक राजकारणाने घेतली. घराणेशाही आणि वंशवादी राजकारणाचे महत्त्व कमी झाले. परिणामतः जातीय आधारावर राजकारण करणाऱ्या पक्षांची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली.  साक्षरतेचे वाढते प्रमाण, कनिष्ठ जातीतील लोकांची बदलती आर्थिक स्थिती, विविध जातींचा पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेली स्पर्धा इत्यादी कारणांमुळे जाती-जातींतला सामाजिक परी विस्तारू लागला. जाती-जातीतील सामाजिक अंतर कमी होऊ लागले. अशा बदलत्या परिस्थितीत जातीय राजकारण करणाऱ्या पक्षांना अहोटी लागू लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने निवडणुका जिंकण्याचे अनेक नवीन तंत्र विकसित केले. पक्षाशी संलग्नित असलेल्या विविध संघटनांच्या मदतीने सातत्याने जनसंपर्क वाढविणे, पक्षाचा सामाजिक पाया विस्तारण्यासाठी मागासलेल्या जातीतील जास्तीत जास्त लोकांना पक्षाच्या रचनेत सामावून घेणे, निवडणुका जिंकण्याची पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मानसिकता निर्माण करणे,देशातील प्रत्येक घटनेचा निवडणूक यशासाठी कसा फायदा करून घेता येईल यासाठी प्रयत्न करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने पक्षाला अनुकूल विचारधारेचा प्रसार करणे, हिंदुत्व विरोधी विचारधारा आणि नेत्यांबद्दल जनतेच्या मनात असंतोष निर्माण करणे, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व यांची सरमिसळ, धार्मिक ध्रुवीकरण, निवडणूक प्रचारात पंतप्रधानाच्या वकृत्वशैलीच्या जोरावर जनतेला आपलेसे करणे इत्यादी तंत्राच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने सर्वच विरोधी पक्षांवर मात केली. विशेषतः जे पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी नवीन तंत्र विकसित करण्यात मागे पडले त्या पक्षांचे फार मोठे नुकसान झाले. भारतीय राजकारणात घडलेल्या बदलाची दखल मायावती यांनी फारशी घेतल्यामुळे त्यांच्या पक्षांना दारुण पराभव स्वीकारावा लागला.

मायावतींच्या राजकीय प्रवासाची सुरुवात मनुवादी आणि ब्राह्मणवादी विचारधारा विरुद्ध संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून झाली. परंतु नंतरच्या काळात तात्कालिक राजकीय फायद्यासाठी पक्षाच्या मूळ विचारधारेला त्यांनी गुंडाळून ठेवले. पक्षाच्या संघटनेत मनमर्जी प्रमाणे हवे ते बदल केले. पक्षाची ब्रीदवाक्ये देखील सोयीनुसार बदलली. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ऐवजी सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय ही घोषणा पुढे आणून मायावतीने आपला हक्काचा मतदार गमावला. विपरीत सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या ब्राह्मण, दलित आणि मुस्लिम या समाज घटकांना एकत्र आणून सोशल इंजिनिअरिंग करण्याचा मायावतीचा प्रयत्न एका निवडणुकीचा अपवाद वगळता फारसा यशस्वी ठरला नाही. 2007 नंतर सातत्याने पक्षाच्या जागा आणि मतांची टक्केवारी घसरत गेली. गेल्या अनेक वर्षापासून उत्तर प्रदेशातील वाढते दारिद्र्य, बेरोजगारी, कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आणि मुत्यचे तांडव, दलित अत्याचाराच्या घटना इत्यादी कोणत्याही प्रश्नावर त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही. पीडित कुटुंबांना भेटी देखील दिल्या नाहीत. अशा परिस्थितीत बसपाचा निवडणुकीतील पराभव एक फक्त औपचारिकता उरली होती. ती औपचारिकता 2022 च्या विधानसभा निवडणुकीने पूर्ण केली असे मानता येईल. भारतातील दलित आणि वंचित समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा बसपा सारखा पक्षाने आपल्या चुकीच्या रणनीतीमुळे स्वतःची वाताहात घडवून णून आपले भवितव्य अंधकारमय केले.उत्तर प्रदेशातील जाटव सारख्या एका जातीपुरता हा मर्यादित बनला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.