https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची रचना आणि कार्य


 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची रचना आणि कार्य-

    अनुसूचित जमातीमध्ये जवळपास ५९ जातीचा समावेश आहे. यातील मांग वा मातंग समाजातील लोक सर्वाधिक उपेक्षित आहेत. उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने कंपनी अधिनियम १९५६ (१) अन्वये सामाजिक विभागाच्या अंतर्गत जुलै १९८५ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केली.

रचना- महामंडळात एक अध्यक्ष संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई, संचालक समाजकल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे हे पदसिद्ध दोन संचालक आहेत तर संचालक राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कार्यालय, पुणे निमंत्रित सदस्य असतात. महामंडळाच्या मुख्यालयी व्यवस्थापकीय  संचालक पदसिद्ध सदस्य असतात असे एक अध्यक्ष व ११ सदस्य असतात. महामंडळाचे मुख्यालय मुबई येथे आहे.

महामंडळ उद्देश- महामंडळ स्थापन करण्याचे उद्देश पुढील प्रमाणे होत

१.महाराष्ट्रातील दारिद्रय रेषेखाली आणि मागास असलेल्या समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे

. मातंग समाजाला सामाजिक प्रवाहात मानाचे स्थान मिळवून देणे.

 . मातंग सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सामाजिक विकासाला चालना चालना देणे.

. मातंग आणि तत्सम समाजाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक चळवळीना चालना देणे.

. तंतु कामाच्या व्यवसायात गुंतलेल्या मातंग समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे.

महामंडळाचे योजना कार्य- मातंग समाजात एकूण १२ पोटजाती आहेत. त्यात मांग, मातंग, मिनी मादींग, मादगी, दान्खणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी इत्यादी आहेत. या विविध पोटजातीच्या विकासासाठी महामंडळाची तर्फे विविध योजना राबविल्या जातात आणि कार्य देखील केले जाते

१.बीज भांडवल योजना- बीज भांडवल योजनेतंर्गत मातंग समाजातील विविध पोटजातीतील पात्र उमेदवारांना ५० हजार ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज मंजूर केले जाते. कर्जावरचे अनुदान देखील दिले जाते. या योजनेत अर्जदाराचा पाच टक्के वाटा असतो.

. शिष्यवृत्ती योजना- मातंग समाजातील १० यो १२ वी, पदवी, पदविका अभियांत्रिकीय, वैद्यकीय परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलो जाते. व्यावसायिक तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. देशात साडेसात लाख तर परदेशात शिक्षणासाठी पंधरा लाख रूपये कर्ज दिले जाते.

३.कर्ज योजना- अण्णाभाऊ साठे मंडळातर्फे मुदत कर्ज योजना, लघु ऋण योजना, महिला समृद्धी योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक योजना, विशेष अर्थसाहय्य योजना, थेट कर्ज योजना इत्यादी विविध योजनेच्या माध्यमातून मातंग समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबाना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

. विशेष अर्थसहाय्य योजना- राष्ट्रीय अनुसूचित जातो वित्तीय विकास महामंडळ, केंद्र शासन, राज्यशासन यांच्या मदतीने महामंडळाकडून विशेष अर्थसहाय्य या अनुदान उपलब्ध करून दिले जाते. अनुदानाची रक्कम ही प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के पर्यंत असू शकते.

. प्रशिक्षण देणे- मातंग समाजातील दारिद्रय बेरोजगारी दूर करण्यासाठी महामंडळातर्फे प्रशिक्षण योजना राबविली जाते. या योजनेतंर्गत मातंग समाजातील तरुणांना तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्थिक सहाय्य कर्ज रूपाने उपलब्ध करून दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन देखील दिले जाते.

 ६.   अनुदान देणे- विशेष घटक योजना, प्रकल्प खर्च अनुदान, व्यापार व्यवसाय करण्यासाठी भांडवल, कर्ज, तांत्रिक सहाय्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जात असते.

महामंडळाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतु महामंडळात कोटयावधी रुपयाचा भ्रष्टाचार व गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने मंडळाचा अर्थपुरवठयाला मोठया प्रमाणावर लगाम लावला आहे. सद्या महामंडळाकडून अत्यंत मर्यादित योजना राबवल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.