https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ उद्देश व कार्य-


 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ उद्देश कार्य-

महाराष्ट्रातील विविध जाती-जमातीच्या विकासासाठी विविध महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु ज्या जाती-जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही. अशा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक विकासाचा मार्ग खुला करून त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी कायदा १९५६ अन्वये २७ नोव्हेंबर १९९८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.

महामंडळ स्थापनेचा उद्देश- महामंडळ स्थापनेचे पुढील उद्देश आहेत.

. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाचा विकास घडवून आणणे.

 . मराठी युवकांना सवलतीच्या दरात कर्जाच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करून देणे.

. सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करणे. . मराठी तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवणे त्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे,

. स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नसलेल्या उदा. मराठा, ब्राह्मण, मारवाडी आर्थिकदृष्टया मागास लाभार्थ्याला उदयोग व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देणे.

. आर्थिक मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे. महामंडळाची रचना-  महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महामंडळाचा एक अध्यक्ष शासनाकडून नियुक्त केले जाणारे संचालक आणि एक व्यवस्थापकीय संचालक असतो.

महामंडळाच्या योजना- महामंडळाकडून अनेक योजना राबविल्या जातात.

. बीज भांडवल योजना- मराठी युवकांना उदयोग व्यवसाय करण्यासाठी महामंडळाकडून बीज भांडवल कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार पाच लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी महामंडळ अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. कर्ज फेडीचा कालावधी पाच वर्ष इतका असतो.

 . वैयक्तिक गट कर्ज व्याज परतावा- महाराष्ट्रातील तरुणाचा स्वयंरोजगार सुरू करता यावा म्हणून महामंडळामार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. व्यक्तिगत कर्ज मर्यादा १० लाख आहे. बेरोजगार युवकांना एकत्र येऊन समूह स्वरूपात देखील उदयोग व्यवसाय स्थापन करण्यासाठी कर्ज महामंडळाकडून दिले जाते. कर्ज देतांना व्याजाचा दर अत्यंत वाजवी वा कमी असतो. बँकाकडून आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा काही हिस्सा महामंडळाकडून भरला जातो जेणेकरून लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होईल हा प्रमुख उद्देश असतो.

. स्वयंरोजगार योजना- राज्यातील आर्थिकदृष्टया मागास वर्गातील युवकांना स्वयंरोजगाराबद्दल मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाकडून अनेक योजना राबविल्या जातात.

. आर्थिक सहाय्य योजना- महामंडळाकडून बीज भांडवल कर्ज योजना, गट प्रकल्प योजना थेट कर्ज योजना या तीन विशेष योजना राबविल्या जातात. स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नसलेल्या जातीतील पात्र व्यक्तींना देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

महामंडळाची कार्य- अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून अनेक कार्य पार पाडली जातात. ती पुढीलप्रमाणे होत.

 . आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करणे.

. आर्थिक मदतीद्वारे आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवाराचे सशक्तीकरण करणे.

. आर्थिक सशक्तीकरणाची प्रक्रिया जलद, पारदर्शी अधिकाधिक कार्यक्षम करणे.

. आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र वेब पोर्टलची व्यवस्था करणे.

. लाभार्थीचे स्टेटस तपासणे.

. लाभार्थीना योजनांची माहिती देणे.

. आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्याना प्रशिक्षण देणे.

. मराठा समाजातील तरुणांना मंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून देणे.

. १० लाखापर्यंतच्या कर्जावर सवलत देणे.

१०. महाराष्ट्रात ज्या जाती जमातीसाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात घटकाला अर्थसहाय्य करणे.

अशा प्रकारे अण्णासाहेब पाटोल विकास महामंडळाचे कार्य चालू असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.