https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

महाराष्ट्राचे ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवन आणि महाराष्ट्राची ओळख


 महाराष्ट्राचे ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवन-

महाराष्ट्र हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. महाराष्ट्र राज्याला फार ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहास भारतीय इतिहासालादेखील प्रभावित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजा पराक्रमी आणि शूर राजे महाराष्ट्राच्या भूमीने दिलेले आहेत. संत ज्ञानेश्वरापासून आधुनिक काळापर्यंत वारकरी संप्रदायाच्या समर्थ परंपरेने भक्तीचा नवा मार्ग समाजाल उपलब्ध करून दिला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, विना दामोदर सावरकरांसारखे संपूर्ण भारताला प्रभावित करणारे नेते या भूमीत उपजले महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, गो.. आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आनंदीबाई जोशी, पंडित रमाबाई, धोंडो केशव कर्वे, शाहू महाराजांसारखे समाजसुधारक वा भूमीत जन्माला आले. आधुनिक महाराष्ट्राचा अभ्यास करण्याआधी राज्याची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

महाराष्ट्र नावाची उत्पत्ती- मराठी भाषिक अनेक शतकांपासून या प्रदेशात वास्तव्यास होते; पण महाराष्ट्र राज्य मे १९६० रोजी अस्तित्वात आले. महाराष्ट्र शब्दाचे विचारवंतांनी विविध अर्थ सांगितलेले आहेत. 'महाराष्ट्र' संज्ञेचा वापर व्या व्या शतकात केला गेला होता. सातवाहनकालीन शिलालेखात 'महारठी' उल्लेख आहे. बौद्ध साहित्यात 'महारठ्ठ' इत्यादी ठिकाणी बौद्ध धर्मोपदेशक पाठविल्याचे उल्लेख आहेत. 'महार' हे नाव .. पूर्व तिसऱ्या शतकात रूढ झाले असावे. महाराष्ट्र म्हणजे मोठे महान राष्ट्र, तर काहींच्या मते प्राकृतपासून निर्माण झालेल्या महाराष्ट्र भाषेवरून प्रदेशाचे नाव "महाराष्ट्र' पडले. महंत राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र तर जॉन विल्सन यांनी मोल्सवर्थ कोशान महाराष्ट्र म्हणजे महार राष्ट्र = महारांचे राष्ट्र ही व्युत्पत्ती मांडली आहे. ओपर्ट यांनी 'भारत वर्षातील मूळ रहिवाशी' ग्रंथात महाराष्ट्राला 'मल्लराष्ट्र' म्हटले आहे. महम्हणजे मार आणि मार लोकांनाच म्हार म्हणतात. मार या शब्दाचे हळूहळू महार हे रूप बनले असावे त्यामुळे मल्लराष्ट्र व महाराष्ट्र हे दोन शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत. अशोकाच्या शिलालेखात 'रास्टीक' लोकांचा उल्लेख आहे हा महाराष्ट्रातील लोकांच्या संदर्भातील आहे. त्याचे वास्तव्य असलेला प्रदेश म्हणजे 'महाराष्ट्र' होय. सातवाहन साम्राज्यात एका सत्तेखाली एकत्र आलेल्या राष्ट्राला 'महाराष्ट्र' हे नाव पडले. महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती 'रट्ठ' नावाच्या प्राचीन जातीतून झाली यावरून 'महारठ्ठ अर्थात महाराष्ट्र' हे नाव पडले तर डॉ. आंबेडकरांच्या मते, 'महार' नावाच्या अस्पृश्य जातीतून 'महाराष्ट्र' हे नामकरण झाले असावे. राजारामशास्त्री भागवत यांनीदेखील 'महारांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र' हे मत मांडले. डॉ. काणे यांनी महान राष्ट्र ते महाराष्ट्र तर चि.वि.वैद्य यांनी मल्ल लोकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र तसेच मराठा शब्दापासून महाराष्ट्र नाव पडल्याचे अभ्यासकांचे मत आहे. महाराष्ट्र शब्दाच्या अर्थाबाबत अनेक  अभ्यासकांनी विविध मते मांडलेली आहेत. मात्र, श्री चक्रधर, ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेचा व महाराष्ट्राचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. यावरून महाराष्ट्र ही संकल्पना मध्ययुगीन काळापासून अस्तित्वात असल्याचे आढळून येते. तसेच महाराष्ट्र शब्दाच्या अर्थ व व्युत्पत्ती बाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत.

महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी- 'इतिहासाचार्य वैद्य यांच्या मते, “इ.स. पूर्व ६०० मध्ये आर्य लोकांचे दक्षिणेत आगमन झाले. गोपराष्ट्र, पंडुराष्ट्र, महाराष्ट्र अशा नावांनी वसाहती करून राहू लागले." सम्राट अशोकाच्या शिलालेखात रास्टीक लोकांचा उल्लेख आहे. सातवाहन राज्याच्या काळात मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे एकत्रीकरण झाले. तत्कालीन काळात सापडलेल्या शिलालेखावर महारठी, महारठिनी इत्यादी नावांचा उल्लेख आहे. १२ व्या शतकात उदयाला आलेल्या देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्यात बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश अंमलाखाली आलेला होता. यादवांचे साम्राज्य १३ व्या शतकात अल्लादीन खिलजीने नष्ट केले. त्यानंतर बहामनी राज्याची स्थापना हसन गंगु बहामनी यांनी केली. अंतर्गत सत्तासंघर्षातून या राज्याचे पाच तुकडे होऊन पाच पातशाह्या निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करीत होत्या. महाराष्ट्राचा उत्तर भाग दिल्लीच्या मोगल बादशहाच्या ताब्यात होता. कोकण आणि देशावरच्या काही भागात सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मात्र, खानदेश, वऱ्हाड, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बराचसा मुलूख स्वराज्याबाहेर होता. पेशवेकाळात पेशव्यांच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणातून उत्तरेकडील मुलूखावर स्वाऱ्यांना सुरुवात झाली. या स्वाऱ्यांना यश आल्याने उत्तरेकडे पेशव्यांच्या राज्याचा विस्तार झाल्याने बहुतेक मराठी प्रदेश पेशव्यांच्या नियंत्रणाखालीआला. दुर्बळ मध्यवर्ती सत्ता आणि अंतर्गत सत्तासंघर्षामुळे उत्तर पेशवेकाळात सरदारांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार हाकण्यास सुरुवात केली. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी एतद्देशीय राज्यकर्त्यांचा पराभव करून आपले साम्राज्य निर्माण केले. १८१८ मध्ये पेशव्यांचा पराभव करून पेशवेशाही नष्ट केली. पेशवेशाहीतील पश्चिम महाराष्ट्राचा भाग मुंबई इलाख्यात समाविष्ट केला. वन्हाड भाग नागपूरकर भोसले आणि निजामाकडून काही भाग काढून मध्यप्रांतात समाविष्ट केला. मराठी वस्ती असलेला मराठवाड्याचा प्रदेश हैदराबाद संस्थानात समाविष्ट केला. अशा प्रकारे संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश गेल्या सातशे-आठशे वर्षांपासून एकाच राजवटीच्या नियंत्रणाखाली येऊ शकला नाही. तो विविध राजवटीत विखुरलेला राहिला.

१९ व्या शतकात ब्रिटिश राजवट भारतभर पसरली. त्यांनी केलेल्या भौतिक व प्रशासकीय सुधारणा, पाश्चिमात्य शिक्षणातून भारतीयांत राष्ट्रीयत्वाची भावना विकसित होऊ लागली. वाढत्या राजकीय जागृतीतून राजकीय सत्तेत भागीदारी मिळविण्यासाठी आकांक्षा भारतीयांमध्ये विकसित होऊ लागली. त्यासाठी भारतीयांनी राजकीय संघटना निर्मितीस प्रारंभ केला. भारतीयांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला सनदशीर मार्गाने आकार देण्यासाठी आणि असंतोष कमी करण्यासाठी ब्रिटिशांच्या प्रेरणेने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. विसाव्या शतकातील विविध कर्तृत्ववान नेतृत्वामुळे राष्ट्रीय सभेचा प्रभाव भारतभर पसरला. राष्ट्रीय भावनेच्या विकासासोबत भारतातील भाषिक आणि भौगोलिक विविधतेमुळे प्रादेशिक अस्मिताही विकसित होऊ लागली. भारतीयांचा अंसतोष कमी करण्यासाठी आणि राजकीय सहभागाच्या वाढत्या मागण्यांना नियंत्रित करून मर्यादित प्रमाणात सत्ता देण्यासाठी १९१९ चा सुधारणा कायदा ब्रिटिशांनी संमत केला. या कायद्याअन्वये ब्रिटिशांनी स्थानिक व प्रादेशिक बाबतीत मर्यादित प्रमाणात स्वायत्ता दिली. द्विदल राज्यपद्धती स्वीकारून भारतीयांना मर्यादित प्रमाणात राजकीय सत्तेत वाटा दिला. १९२० साली काँग्रेसने तयार केलेल्या घटनेत भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वास मान्यता दिली होती. मोतीलाल नेहरू व सप्रू यांच्या समितीने भारतीय राज्यघटनेचा आराखडा विकसित करताना भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व गृहीत धरले होते. स्वराज्य मिळेपर्यंत या तत्त्वावरून काँग्रेसमध्ये काहीही विवाद नव्हता. गांधींनीदेखील त्यांचे समर्थन केले होते. ब्रिटिशांशी लढताना काँग्रेस कमिट्यांची उभारणी भाषिक तत्त्वाच्या आधारावर केली होती.' भारतीयांच्या राजकीय सहभागाच्या वाढत्या मागणीमुळे ब्रिटिशांनी १९३५ च्या भारत प्रशासन कायद्याने संघराज्यात्मक शासन पद्धतीला मान्यता दिली. दुसरे महायुद्ध आणि ब्रिटिशांनी सुरू केलेली सत्तांतराची प्रक्रिया यामुळे या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीहोऊ शकली नाही. १९३५ च्या कायद्यान्वये निर्माण केलेले संघराज्य घटनाकारांनी स्वीकारले. परंतु, हे संघराज्य भाषिक तत्त्वावर आधारित नसून ब्रिटिशांनी प्रशासनाच्या बीसाठी निर्माण केलेल्या प्रांतावर आधारित होते. मुंबई प्रांत आणि इतर प्रांतातील मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी १९४६ ते १९६० पर्यंत प्रदीर्घ आंदोलन झाले. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी प्राण त्यागले अनेक नेत्यांनी आंदोलने, उपोषणे व कारावास भोगल्यानंतर महत् प्रयत्नाने १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र प्रशासकीय कार्यालये, मंत्रालय, विधानसभा सचिवालय मुंबई येथे आहेत. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरला भरते. महाराष्ट्राचे कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र हे प्रमुख प्रादेशिक विभाग आहेत.

 महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती- भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. ३.०८ लाख चौ.कि.मी. चा भूप्रदेश महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला आहे. भारताच्या भूप्रदेशाशी महाराष्ट्राचे प्रमाण ९.८ टक्के इतके आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थाननंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. सहा राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत. वायव्येस गुजरात राज्य तसेच दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश, उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, दक्षिणेस कर्नाटक, नैर्ऋत्येस गोवा, आग्नेयेस तेलंगणा राज्याच्या सीमा आहेत. राज्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश राज्याशी आणि सर्वात कमी गोवा राज्यास लागून आहे. महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार ७०० कि.मी. तर पूर्व-पश्चिमेतर विस्तार ८०० कि.मी. आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राला ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या किनारपट्टीवर ४९ बंदरे आहेत. त्यात मुंबई आणि न्हावाशेवा ही प्रमुख बंदरे आहेत. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे प्रमुख चार भाग पडतात.

 १) कोकण किनारपट्टी उत्तरेतील दमणगंगा नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेतील तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेल्या चिंचोळ्या भूप्रदेशात कोकण होय.

२) सह्याद्री पर्वत रांग महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर पर्वतरांगेला सह्याद्रीची पर्वतरांग म्हणतात.

३) पूर्वेकडील पठारी प्रदेश सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला पसरलेल्या विशाल पठारी प्रदेशाला महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार म्हणून ओळखले जाते.

४) उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला पूर्व-पश्चिम - दिशेने पसरलेल्या पर्वतरांगांना सातपुडा पर्वत रांग असे म्हणतात.

भारतातील इतर भागाप्रमाणे महाराष्ट्रात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा है। तीन ऋतू आहेत. नैर्ऋत्य मोसमी वान्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही. कोकण किनारपट्टी, सह्याद्री घाट माथा, विदर्भात जास्त पाऊस पडतो. मराठवाडा आणि सह्याद्रीच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असते.

महाराष्ट्राचे सामाजिक व आर्थिक जीवन- महाराष्ट्राची वस्ती संमिश्र - स्वरूपाची आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी व ज्यू इत्यादी समुदायाचे लोक महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत. या सर्व समुदायांपैकी सर्वाधिक जास्त संख्या हिंदू समुदायाची आहे. हिंदुंनंतर मुस्लीम, बौद्ध व जैन धर्मियांची संख्या दिसून येते. महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी बोलणारे लोक राहतात. त्यामुळे 'मराठी' ही राज्यभाषा आहे. मराठीच्या अहिराणी, वन्हऱ्हाडी, कोंकणी इत्यादी बोलीभाषा आहेत. मराठी शिवाय हिंदी, उर्दू, गुजराथी भाषिकांची संख्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी आहे. महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. बाजरी, ज्वारी, कापूस, मका, ही प्रमुख पिके आहेत. महाराष्ट्रातील जवळपास ४५.२ टक्के लोक नागरी भागात वास्तव्यास आहेत. नागरीकरणाबाबत तामिळनाडू आणि केरळ नंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. मुंबई, नवीमुंबई, ठाणे परिसर आणि पुणे येथे शहर आणि उद्योगाचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. नागरी भागात सेवा क्षेत्रात रोजगार करण्याचे प्रमाण जास्त आहे. सेवा क्षेत्रानंतर उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी भागात वास्तव्य जास्त दिसून येते. ग्रामीण भागात राहणाऱ्या ५४ टक्के लोकांचा व्यवसाय शेती व शेतीशी निगडित आहे. महाराष्ट्रात डोंगर व पर्वतरांगांचे प्रमाण जास्त असल्यामुळे बारमाही बागायती शेती कमी दिसून येते. बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू वा जिरायती शेती करतात. परिणामतः इतर ऋतूंमध्ये रोजगारासाठी शहरात व इतर राज्यात स्थलांतर करतात. महाराष्ट्राची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ११ कोटी २३ लाख ७४ हजार ३३३ इतकी होती. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राचा साक्षरता दर ८२.९ टक्के आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९२९ स्त्रिया आहेत. महाराष्ट्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गियांना आरक्षण दिलेले आहे. १३% अनुसूचित जाती, ७% अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग १९%, विशेष मागासवर्ग २%, भटक्या विमुक्त जाती ११% असे एकूण ५२ टक्के आरक्षण आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के आणि मुस्लीम समाजासाठी ६ टक्के आरक्षण घोषित केले होते. महाराष्ट्रात आरक्षणाचीमर्यादा ७२ टक्क्यांपर्यंत पोहचली होती. परंतु, न्यायालयाने मराठा आणि मुस्लीम समुदायाच्या आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. 

महाराष्ट्राचे राजकीय जीवन - महाराष्ट्र शासनाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्रात द्विगृही सभागृह असून विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन गृहे आहेत. विधानसभेत २८८ तर विधानपरिषदेत ७८ सदस्य आहेत. राज्यात राज्यपाल कार्यकारी प्रमुख आहेत तर मुख्यमंत्री हे वास्तव प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मदतीला जवळपास ४३ मंत्री असतात. मंत्री आपआपल्या विभागाचे कार्य सांभाळतात. मंत्र्यांना दैनंदिन कामकाज व अंमलबजावणीचे कार्य करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी नेमलेले आहेत. प्रशासनाची मुख्य कार्यालये मुंबई येथे असून विभागीय कार्यालये विभागाच्या ठिकाणी आहेत त्यानंतर जिल्हा आणि ग्रामीण भागात क्षेत्रीय स्थानिक कार्यालये असतात. स्थानिक प्रशासन चालविण्यासाठी शहरी भागात महानगरपालिका आणि नगरपालिका आहेत तर ग्रामीण भागात जिल्हापरिषद, पंचायतसमिती आणि ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात कोंकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर हे महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय महसुली विभाग, ३६ जिल्हे आणि ३५५ तालुके आहेत. अहमदनगर हा सर्वांत मोठा जिल्हा आहे तर मुंबई उपनगर हा सर्वांत लहान जिल्हा आहे. महाराष्ट्रात २८ हजार ३३२ ग्रामपंचायती, ३५१ पंचायत समिती आणि ३४ जिल्हापरिषदा आहेत तर २३४ नगरपालिका, १२४ नगर पंचायत, २७ महानगरपालिका आणि ७ छावणी बोर्डे आहेत.

अशा प्रकारे महाराष्ट्राची भौगोलिक, सामाजिक व राजकीय आणि राजकीय पार्श्वभूमी सांगता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.