https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक विश्लेषण


 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक विश्लेषण-

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत विविध संस्था आणि न्यूज चैनल यांनी प्रकाशित केलेल्या एक्झिट पोल नुसार भारतीय जनता पक्षाला दणदणीत यश मिळाले. मुस्लिम आणि यादव या MY समीकरणा ऐवजी मोदी आणि योगी या समीकरणाला जनतेने उचलून धरले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल-

      BJP- 255 Seats

      SP- 111 seats

      ADAL- 12 Seats

      RLD- 8     Seats

      NINSHAD- 6 Seats

      SBSP-6 Seats

      INC- 2 Seats

      BSP-1 Seats

      Other Party- 2 Seats

      Total- 403 Seats

      उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल वैशिष्टे-

      भाजप आणि मित्र पक्ष २७४ जागा % मतवाढ २०१९ च्या निकालापेक्षा ४८ जागा कमी मिळाल्या.

      सपा आणि मित्र पक्ष १२५  जागा १२ % मतवाढ २०१९ च्या निकालापेक्षा ७२ जागा जास्त मिळाल्या.

      बसपा   जागा  १० % कमी मते मिळाली. २०१९ च्या निकालापेक्षा १८ जागा कमी मिळाल्या.

      कॉंग्रेस पक्ष   जागा मिळाल्या. २०१९ च्या निकालापेक्षा ०५ जागा कमी मिळाल्या.

      भाजप निवडणूक  यशाला कारणीभूत घटक

      उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे यशाला कोणते घटक कारणीभूत आहेत.

      पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिमा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिव्य वलयी निवडणूक जिंकून देणाऱ्या प्रतिमेचा फायदा पक्षाला मिळाला. निवड मोदींच्या प्रतिमेमुळे विजय मिळालेला नसून त्यांनी आपल्या प्रतिमेला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी विकास संकल्पनेची मदत घेतली. काशी विश्वनाथकॅरिडॉर हा त्याचा उत्तम नमुना आहे.

      मुख्यमंत्री योगी यांची प्रतिमा- गुंडांचा कर्दनकाळ आणि बुलडोजर अशी मुख्यमंत्री योगी यांची विकसित झालेली प्रतिमा पक्षाच्या यशाला फायदेशीर ठरली. मुक्तार अन्सारी, अतिक अहमद आणि इतर गुंडांच्या मालमत्तेवर फिरवलेला हातोडा

      कायदा आणि सुव्यवस्था मुद्दा- कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी योगी सरकारने उचललेली कठोर पावलामुळे सरकारची प्रतिमा उंचावण्यास हातभार लागला. सपाच्या काळातील गुन्हेगारीचे वर्चस्व त्यांनी मोडून काढले हा मुद्दा निवडणूक प्रचारात प्रभावी ठरला.

      धार्मिक ध्रुवीकरण- उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत भाजपच्या यशात धार्मिक ध्रुवीकरण याचा फार मोठा वाटा आहे. मुख्यमंत्री योगी यांची  ८० विरुद्ध 20 अशी मांडणी असो वा जिना, अब्बाजान, हिजाब, कबरस्तान आणि शमशान शब्दांचा निवडणूक प्रचारात झालेला वापर धार्मिक ध्रुवीकरणाचे दर्शन देतो.

      हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व- हिंदुत्व हेच खरे राष्ट्रीयत्व आहे हे भाजपच्या पारंपारिक भूमिकेला उत्तर प्रदेशात मोठा पाठिंबा मिळाला.

      विकास योजना- हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या पारंपारिक मुद्दाम सोबत सुशासनाची हमी, विकास आणि कल्याणकारी काम लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरला. गरीब कल्याण योजना, मोफत रेशन योजना, उज्वला गॅस योजना, औद्योगीकरण वाढीसाठी केलेले प्रयत्न इत्यादींमुळे भाजप सरकारची प्रतिमा उंचावली. तीन तलाकचा मुद्दा आणि विकास कामांमुळे काही प्रमाणात मुस्लिम महिलांची मते बीजेपीला मिळण्यास हातभार लागला.

      इतर घटक- भाजपची हायटेक प्रचार यंत्रणा,  अमित शहा यांचे संघटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर अध्यात्मिक संघटनांची भाजपला मिळालेली साथ विजय मिळवून देण्यास कारणीभूत ठरले.

      समाजवादी पक्षाची एकाकी झुंज- समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची एकाकी झुंज अपयशी ठरली. जयंत चौधरी यांच्या राष्टीय लोकदल पक्षाशी युती करून शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पण फारशी यश आले नाही. निवडणुकीच्या आधी पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेऊन विरोधकांच्या हातातील हा मुद्दा काढून घेतला. सपा, बसपा आणि काँग्रेस हे घराणेशाही आणि वंशवादाची जपणूक करणारे पक्ष आहेत हा भाजपने केलेला आरोप या पक्षांना खोडून काढता आला नाही. मोरया, सैनी, चव्हाण, पटेल या ओबीसी नेत्यांना पक्षात घेऊन अखिलेश यांनी प्रचारातआघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या नेत्यांमुळे समाजाची मते सपाला मिळाली नाहीत. बाहुबलीचा पक्ष ही प्रतिमा समाजवादी पक्षाला पुसता आली नाही. जाती-जातील मधील सामाजिक परिघ विस्तारत असताना उत्तर प्रदेशातील लहान-लहान जातींच्या पक्षांना एकत्र करून मैदान जिंकण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. जातीय राजकारणाच्या मर्यादा लक्षात घेता विशिष्ट जातींच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न अखिलेश यादव यांच्या अलगट आला.

      काँग्रेस आणि बसपाची दयनीय स्थिती- उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि बसपाची स्थिती अत्यंत दयनीय बनली. बसपाला अवघी एक जागा मिळाली. जाटव समाजापुरते बसपाचे अस्तित्व उरले. दलित मते भाजपकडे वळली. बसपाला मागच्या निवडणुकीपेक्षा 18 जागा कमी आणि दहा टक्के कमी मते मिळाली. निवडणुकीच्या आधीपासूनच मायावती पराभूत मानसिकतेत वावरत असल्याचा फटका पक्षाला बसला. काँग्रेसचे नेतृत्व प्रियंका गांधी कडे असून ही फक्त दोन जागा मिळाल्या. स्वतःला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करून आणि एकूण तिकिटा पैकी 40% तिकिटे महिलांसाठी देण्याचा निर्णय फारसा फलदायी ठरला नाही. परंपरेचा प्रभाव असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसने केलेला हा प्रयोग अलगट आला.

      उत्तर प्रदेश विधानसभा निकाल राष्ट्रीय राजकारणावरील परिणाम-

      उत्तर प्रदेशाचा निवडणूक निकाल भाजपला राष्ट्रीय राजकारणात बळ देणारा ठरला. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूका आणि राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी हा निकाल महत्वपूर्ण मानला गेला.

      या निकालाने काँग्रेस आणि बसपाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. काँग्रेसला आपले विजन आणि कार्यक्रम बदलल्याशिवाय यश प्राप्त होणार नाही हा धडा या निवडणुकीने दिला. भाजपला देशपातळीवर शह देण्यासाठी काँग्रेसप्रणित आघाडी बनवण्याच्या मनसुब्याला हादरा बसला. भाजप हा देशातील सर्वात शक्तिशाली पक्षी आहे हे पुन्हा सिद्ध झाले. भाजपला शह देण्यासाठी पारंपारिक रणनीती फारशा उपयुक्त ठरणार नाहीत हे या निवडणुकीने सिद्ध केले.

       


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.