via IFTTT
राज ठाकरे भाषणाचा अन्वयार्थ-
▪ राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
▪ गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क वर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोग्यांना विरोध केला. राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडी सरकार मधल्या प्रमुख नेत्यांनी टीका केल्या. या टीकेला उत्तर देण्यासाठी ठाण्यात राज ठाकरे यांनी उत्तर सभा घेतली. या दोन्ही सभेत राज ठाकरे यांनी पुढील मुद्दे मांडले आहेत.
सभेत राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे-
▪ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढला. दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना काढण्याला या पक्षाने उत्तेजन दिले.
▪ शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. शाहु, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार नास्तिक आहेत. धर्म, देव वगैरे मानत नाही.
▪ जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते निवडून आलेल्या मुंब्रा मतदारसंघात अतिरेकी सापडले होते हे विसरलात का
▪ अडीच वर्षे जेलमध्ये राहिल्यानंतर शपथ विधी घेणारे छगन भुजबळ हे पहिले नेते आहे.
▪ जयंतराव पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनसे हा विझलेला पक्ष नसून समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे.
▪ देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा आणण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान
▪ मोदी सरकार पंतप्रधान देशाला मिळाला असे म्हणणाऱ्यांनी पहिला माणूस आहे.
▪ मोदी सरकारने 370कलम रद्द केल्यानंतर पंतप्रधानाचे अभिनंदन करणारे ट्विट माझे होते.
▪ मनसे भाजपची बी टीम नसून एक स्वतंत्र पक्ष आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या ज्या वेळी चुका केल्या त्यावेळी मी टीका केल्या. चांगले काम केले तेव्हा पहिले मी अभिनंदन केले.
राज ठाकरे यांची नवी रणनीती-
▪ महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष फारसा प्रभावशाली नसला तरी त्यांनी मुंबई आणि ठाण्यातल्या सभेत मांडलेल्या मुद्द्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाच्या राजकारणाचा अवकाश व्यापला आहे. या दोन्ही सभेमध्ये ३ मे पर्यंत देशातील आणि राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणार हे जाहीर केले. या घोषणेने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. राज ठाकरे यांच्या घोषणांकडे विरोधकांनी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. नेहमीप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल साधारण स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या. राज ठाकरे नकलाकार आहेत. वेळोवेळी आपल्या भूमिका बदलतात. आपल्या वक्तव्यावर ठाम राहत नाही. अशा प्रतिक्रिया दिल्यात.
▪ मनसे या पक्षाची स्थापना मराठीअस्मितेच्या मुद्द्यावरून झाली होती. मराठीअस्मितेऐवजीसरळ हिंदुत्ववादी भूमिकेवर राज ठाकरेंचे जाणे अनेकांना खटकले. परंतु राजकारणात भूमिका सोयीनुसार बदलल्या जातात. उदाहरणार्थ मुख्यमंत्री असताना जीएसटीला विरोध करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जीएसटीच्या समर्थन करू लागले. विदेशी वंशाच्या मुद्द्यांच्या आधारावर काँग्रेस पासून दूर झालेले शरद पवार नंतरच्या काळात त्याच पक्षाची युती करून केंद्रात मंत्री बनले. सोयीनुसार किंवा बदलत्या परिस्थितीनुसार राजकरणात भूमिका बदलल्या जातात याच नियमाने राज ठाकरेंनी भूमिका बदलली. त्यांनी बदललेल्या भूमिकेमागे एक विशिष्ट प्रकारची रणनीती आहे हे अजूनही अनेक लोकांच्या लक्षात आलेले नाही.
▪ शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. या पोकळीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. हे स्थान निर्माण करण्यासाठी देशभर चलनी नाणे ठरलेला हिंदुत्व आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार त्यांनी घेतलेला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या कारभारावर कोरडे ओढता येतील. महाराष्ट्रात एकटा पडलेल्या भाजपचा जवळ जाता येईल हा राज ठाकरे यांचा अंदाज खरा ठरला. भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांनी त्यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे.
▪ धार्मिक ध्रुवीकरण करताना राज ठाकरे यांनी अत्यंत चलाखीने हा मुद्दा मांडलेला आहे. मशिदी वरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन हा मुद्दा धार्मिकतेशी संबंधित नसून सामाजिकतेशी संबंधित आहे. मशिदीतून दिल्या जाणाऱ्या आजानामुळे इतर धर्मीयांना, अभ्यास करणाऱ्या मुलांना त्रास होतो असा दावा करून जर भोगे उतरवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा प्रती कार्यक्रम देऊन मरगळलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. राम मंदिराचा प्रश्न देशात अत्यंत तीव्रतेने पेटलेला असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्याला बगल देऊन उघडउघड नव्वदीच्या दशकात केलेल्या हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याच्या रणनीतीची आठवण राज ठाकरेच्या भाषणाने करून दिली. बाळासाहेबां प्रमाणेच राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत योग्य त्या वेळी बदल करून आपल्या पक्षाचे भवितव्य सुकर करण्याच्या दिशेने केलेली वाटचाल यादृष्टीने त्यांच्या घोषणेनेकडे बघावे लागेल.
▪ राज ठाकरेंच्या भाषणात सर्वाधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावर केली .कारण वीस वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनलेले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक मानली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात आपला पाया भक्कम करायचा असेल तर शरद पवार यांच्या नेतृत्वावर आसूड ओढणे गरजेचे होते. महाविकास आघाडीच्या निर्मितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकारचा वैचारिक गोंधळ निर्माण झाला. परस्पर विरोधी विचारधारा असलेले पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत.
▪ अशा परिस्थितीत मनसेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अकेला चलो रे या मनसेच्या भूमिकेला सुरुवातीच्या काळात थोडेफार यश लाभले परंतु नंतरच्या काळात या पक्षाला उतरती कळा लागली. पक्षाचा प्रभाव असाच जर ओसरत राहिला तर हा पक्ष नामशेष होईल हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपल्या पक्षाच्या धोरण आणि कार्यक्रमात बदल करणे गरजेचे आहे हे त्यांना जाणवले म्हणून त्यांनी आपली भूमिका बदलली. महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवण्यासाठी मनसेला सध्या काळात एकाच जोडीदाराची गरज होती ही गरज भारतीय जनता पक्ष पूर्ण करेल हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पूर्वीच्या भूमिकेचा अंगीकार केला. 2014 मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि गुजरात पॅटर्नची वाहवा केली होती तिच भूमिका त्यांनी सध्याच्या राजकारणात अंगीकारली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.