प्रश्नावली तंत्राचे प्रकार, गुणदोष वा मूल्यमापन
प्रश्नावलीचे संरचित
प्रश्नावली आणि असंरचित प्रश्नावली हे मुख्य दोन प्रकार आहेत.
1. संरचित प्रश्नावली- संरचित प्रश्नावली अत्यंत शास्त्रीय पद्धतीने
तयार केली जाते. प्रश्नांचे स्वरूप प्रश्नांचा क्रम आणि त्यांची पर्यायी उत्तरे
अभ्यासक काळजीपूर्वक तयार करतो. अभ्यासाचा हेतू,
उद्देश व्याप्तो मर्यादा आणि गृहितके लक्षात
घेऊन प्रश्नाचे स्वरूप ठरविले जाते. प्रश्नाचा क्रम निश्चित केल्यानंतर प्रश्नांची
पर्यायी उत्तरे देखील निश्चित केली जातात. उत्तरदात्याला पर्यायी उत्तरातून उत्तर
लिहावे लागते. या प्रश्नावलीला बंदिस्त प्रश्नावली असे देखील म्हणतात.
2. असंरचित प्रश्नावली- अभ्यासकाने विषय निश्चित केलेला असला तरी
त्याला अभ्यास विषयाची पूर्ण माहिती असेलच असे नाही. अशा वेळी प्रश्नावली कोणते
प्रश्न विचारावे आणि त्यांची उत्तरे कोणती असतील याबाबत अभ्यासकांच्या मनात शंका
असतात. अभ्यास विषयाविषयी काही मूलभूत प्रश्न विचारून लोकांची मते, प्रतिक्रिया आणि नवे दृष्टिकोन समजून घेण्यासाठी असंरचित
प्रश्नावलीचा उपयोग केला जातो. असंरचित प्रश्नावलीत उत्तरदात्याला उत्तर
लिहिण्याचे स्वातंत्र्य असते. या वरील मुख्य प्रकाराशिवाय बंदिस्त प्रश्नावलो, चित्रमय प्रश्नावली आणि मिश्रित प्रश्नावली इत्यादी प्रकार आहेत.
3. बंदिस्त प्रश्नावली- बंदिस्त प्रश्नावली वस्तुनिष्ठ स्वरूपाची
असते. प्रश्नाची उत्तरे होय किया नाही. बरोबर आणि चूकची खूण नोंदवून मिळविता
येतात. उत्तर लिहिण्यासाठी उत्तरदात्याला पर्याय दिलेले असतात त्यातून एक पर्याय
उत्तरदाता निवडतो.
4. मुक्त प्रश्नावली- मुक्त प्रश्नावलीत प्रश्नाची पर्यायी उत्तरे
दिलेली नसतात. अध्ययन समस्येशी निगडित प्रश्नाची रचना केलेली आहे. प्रश्नाचे उत्तर
लिहिण्यासाठी जागा सोडलेली असते. या जागेत उत्तरदात्याला प्रश्नाच्या अनुषंगाने
उत्तर लिहावे लागते. उत्तरदात्यास उत्तर लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.
5. मिश्रित प्रश्नावली- मिश्रित प्रश्नावलीत बंदिस्त व मुफ्त प्रश्नावलीचे मिश्रण असते. काही प्रश्न वस्तुनिष्ठ या बहुपर्यायी स्वरूपाचे असतात तर काही प्रश्न उत्तरदात्याला मुक्तपणे उत्तर देण्यास वाव देतात. या प्रश्नावलीमुळे उत्तरदात्याला दोन्ही प्रकारचे फायदे मिळतात. प्रश्नावली तंत्राचे गुणदोष वा मूल्यमापन- प्रश्नावली तंत्र विस्तृत अध्ययन क्षेत्राच्या सर्वात उत्तम मानले जाते. मुलाखतंत्राद्वारे विस्तृत क्षेत्राचे अध्ययन करता येत नाहीत. तथ्यसंकलनाच्या इतर तंत्रापेक्षा प्रश्नावली तंत्राचा वापर करताना कमी खर्च येतो. तथ्य संकलनासाठी वेळ कमी लागतो. एकाच दिवशी सर्वाकडे प्रश्नावली पाठविता येते. आवश्यकता वाटल्यास उत्तरदात्यांला विनंती करून पुन्हा प्रश्नावली भरून संख्यात्मक माहिती अद्ययावत करता येते. प्रश्नावली तंत्रात संशोधकांचा प्रभाव पडण्याची शक्यता कमी असते. उत्तरदाता संशोधकाच्या अनुपस्थित प्रतिसाद नोंदवितो त्यामुळे प्रश्नावलो तंत्र हे उत्तरदात्याच्या दृष्टीने सोयीचे असते. तो आपल्या सवडीप्रमाणे प्रतिसाद नोंदवितो. या तंत्रातून हाती आलेल्या निष्कर्षाचे सांख्यिकीकरण करणे सोपे असते. प्रश्नावली तंत्राचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित संशोधक असण्याची आवश्यकता नसते. या तंत्राच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ माहिती गोळा करता येते.
प्रश्नावली तंत्राचे अनेक फायदे अभ्यासकांनी नमूद केलेले असले तरी प्रश्नावलीत लिखित प्रतिक्रिया व्यक्त कराव्या लागत असल्यामुळे साक्षर वा सुशिक्षित वर्गात वापर करता येतो. या तंत्राला उत्तरदात्याकडून प्रतिसाद अत्यंत कमी मिळतो. उत्तरदाता
प्रश्नावली भरून पाठवत नाही किवा अपुरी भरून पाठवतो. प्रश्नावली तंत्राच्या
माध्यमातून सविस्तर तथ्यसंकलन करता येत नाही. प्रश्नाचा अर्थ लक्षात घेऊन उत्तर
देण्यासाठी आवश्यक बौद्धिक पात्रता उत्तरदात्याकडे नसेल तर तो प्रश्नाचा प्रतिसाद
चुकीच्या पद्धतीने नोंदवितो. उत्तरदात्याच्या समोर संशोधक नसल्यामुळे प्रश्न
सोडविण्यासाठी आवश्यक प्रेरणा त्याला मिळत नाही. प्रश्नावलीबद्दल निर्माण झालेल्या
शंकाचे समाधान करून घेता येत नाही. प्रश्नावलीत प्रश्नाचे उत्तर उत्तदात्याला लेखी
स्वरूपात नीट नोंदविता येत नसल्यास त्यावर दडपण येऊन तो अयोग्य उत्तरे देतो. प्रश्नावलीतील
उत्तराचा अनेकदा अर्थबोध होत नाही. प्रश्नाची रचना सर्वसमावेशक करण्यात अनेक अडचणी
येतात. अशा पद्धतीने प्रश्नावली तंत्राचे दोष सांगता येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.