https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

प्रश्नावली तंत्र अर्थ, व्याख्या, स्वरूप, उद्देश आणि वैशिष्टये


 प्रश्नावली तंत्र अर्थ, व्याख्या, स्वरूप, उद्देश आणि वैशिष्टये

संशोधन प्रक्रियेत तथ्य संकलनासाठी विविध साधनाचा वापर केला जातो. प्रश्नावली देखील तथ्य संकलनासाठी वापरले जाणारे महत्वपूर्ण साधन असते. निरीक्षण आणि मुलाखत तंत्राद्वारे प्राप्त केली जाणारी तथ्य संशोधकाच्या आकलनावर आधारित असतात. निरीक्षण तंत्रात अध्ययन समूहाचे वर्तनाचे संशोधकाला जे आकलन होईल त्यावर अर्थबोध अवलंबून असतो. तसेच काही घटना व प्रसंग निरीक्षणाच्या पलीकडील असल्यामुळे निरीक्षण तंत्राचा वापर करता येत नाही. मुलाखत तंत्रात उत्तरदात्याला संशोधकाने विचारलेल्या प्रश्नाचा जो अर्थबोध होईल त्याप्रमाणे उत्तरे दिली जातात. उत्तरदात्याशी प्रत्यक्ष संवाद साधूनच संशोधनाशी संबंधित माहिती संकलित केले जाते त्यासाठी प्रश्नावली आणि अनुसूची तंत्राचा वापर करावा लागतो. प्रश्नावली तंत्रात उत्तदात्याकडून शास्त्रीय पद्धतीने तथ्य संकलन करण्यासाठी प्रश्नाची एक सूची तयार केली जाते. प्रश्नावलीत अध्ययन समस्येच्या संदर्भातील प्रश्नाचा समावेश असतो. ही प्रश्नायलो लिखित स्वरूपात भरून घेतली जाते. ही सूची उत्तरदात्याकडे प्रत्यक्ष भेट पोस्ट वा कुरियर आणि ऑनलाईन पद्धतीने भरून घेतली जाते. प्रश्नावलीच्या व्याख्या पुढीलप्रमाणे सांगता येतात.

१.   गुड आणि हट यांच्या मते- सामान्यत: प्रश्नावली हे उत्तरे प्राप्त करण्याचे असे साधन आहे की ज्यामध्ये प्रत्रीकेतील प्रश्नाची उत्तरे उत्तरदाता स्वतः लिहितो.

२.   जोहान गाल्टूग यांच्या मते, प्रश्नावली म्हणने लिखित शाब्दिक अद्विपक आणि लिखित शाब्दिक प्रतिक्रिया होय

३.   बोगार्डस यांच्या मते,- अनेक व्यक्तांनी उत्तरे देण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नांची यादी म्हणजे प्रश्नावली होय.                                                                        प्रश्नावलीचे उद्देश वा वैशिष्टये- प्रश्नावलीच्या विविध अभ्यासकांनी केलेल्या राज्याच्या आधारावर व्याख्याच्या आधारावर प्रश्नावलीचे पुढील वैशिष्टये सांगता येतात.

  •   प्रश्नावली प्राथमिकतंत्र संकलनाचे एक तंत्र आहे.
  •  प्रश्नावली निव्वळ प्रश्नाची सूची नसते तर अध्ययन समस्येशी संबंधित प्रश्नांची प्राधान्यक्रमाने रचना केलेली असते.
  •   मोठया अध्ययन क्षेत्राच्या संकलनासाठी प्रश्नावली उपयुक्त साधन मानले जाते.
  • प्रश्नावलीत उत्तरदाता स्वतः प्रतिसाद नोंदवितो. उत्तरदात्याने दिलेला लेखी प्रतिसाद प्रश्नावलीत असतो.
  •   प्रश्नावली सामान्य उत्तरदात्यांना गृहित धरून तयार केली जाते. 
  •  प्रश्नावली तंत्रात संशोधकांच्या उपस्थितीचा कोणताही प्रभाव न पड़ता उत्तरदात्याकडून प्रतिसाद मिळविता येतो.
  •   प्रश्नावलीची भाषा सरळ, सुगम व सोपी असते.
  •   प्रश्नावलीत प्रश्न प्रश्नाचा क्रम सोपा कडून काठीणाकडे आणि सामान्याकडे विशिष्ठाकडे असतो.
  • प्रश्नावलो तंत्रामुळे वेळ व पैसाची बचत होते.
  •   प्रश्नावलीतून प्राप्त होणारी माहिती इतर तंत्राच्या तुलनेने वस्तुनिष्ठ व वैध असते.
  •      प्रश्नावली एकाच वेळेस असंख्य लोकांना वितरीत करता येते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.