प्रश्नावली आणि अनुसूची यातील परस्परसंबंध, साम्यभेद वा फरक
प्रश्नावली
आणि अनुसूची ही दोन्ही प्राथमिक तथ्य संकलनाची तंत्रे आहेत. या दोन्ही तंत्रामध्ये
प्रश्नांची सूची असते आणि लिखित स्वरूपात प्रतिसाद नोंदवावा लागतो. प्रश्नावली आणि
अनुसूचीत विशेष फरक नसतो. या दोन्ही तंत्रात समस्येशी संबंधित प्रश्न असतात.
दोन्हीचा उद्देश तथ्यसंकलन आणि संशोधनाला आधार म्हणून केला जातो. रचना आणि समान ततत्वांचे
पालन दोन्ही तंत्रामध्ये होत तरी हो दोन्ही तंत्रात काही महत्त्वाचे भेद आहेत. ते
पुढील प्रमाणे सांगता येतात.
· प्रतिक्रियांचे नोंद- प्रश्नावलीमध्ये प्रश्नांच्या उत्तरदाता
स्वतःचे प्रतिसाद उत्तराच्या स्वरूपात स्वतः नोंदवितो. उत्तरदात्याला विचार करून
उत्तर लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. अनुसूचीत संशोधकाने विचारलेल्या
प्रश्नांना उत्तरदाता तोंडी उत्तरे देतो. संशोधक तो उत्तराच्या स्वरूपात लिहून
घेतो. संशोधकाच्या उपस्थितीचा उत्तरदात्यावर कळतनकळत परिणाम होता.
· अध्ययन क्षेत्र आणि संपर्काचे स्वरूप- प्रश्नावलीचा वापर विस्तृत अध्ययन
क्षेत्रासाठी केला जाऊ शकतो मात्र अनुसूचीचा उपयोग लहान अध्ययन क्षेत्रासाठीच होऊ
शकतो. अनुसूचीत उत्तरदात्यांना प्रत्यक्ष भेटून प्रतिसाद नोदवावा लागतो. अनुसूचीत
एक प्रकारे मुलाखत अंतर्भूत असते. प्रश्नावली पोस्टाने उत्तरदात्याकडे पाठवावी लागत
असल्यामुळे संशोधक आणि उत्तरदाता यांचा प्रत्यक्ष संपर्क येत नाही.
· उत्तराचे स्वरूप आणि तथ्यांचे प्रमाण- प्रश्नावलीचे प्रतिसाद नोंदवितांना संशोधक
उपस्थित नसल्यामुळे उत्तरदात्यावर कोणताही दबाव येत नाही. तो विचार करून स्वतंत्रपणे
प्रश्नाचे प्रतिसाद नोंदवितो. अनुसूची संशोधक स्वतः प्रश्न विचारतो. त्यांच्या
उपस्थितीच्या प्रभावामुळे उत्तरदात्याची मानसिकता प्रभावित होते. त्यामुळे
स्वतंत्रपणे उत्तरे देऊ शकत नाही. अनुसूचीत प्राप्त होणारी उत्तर अत्यंत मर्यादित
व संकुचित स्वरूपाची असतात. अनुसूचीतंत्रातून होणारे तथ्यसंकलन मर्यादित स्वरूपाची
माहिती उपलब्ध करून देते तर प्रश्नावलीतून प्राप्त होणारी माहिती विस्तृत व
गुणात्मकदृष्टया श्रेष्ठ असते.
·
उत्तरदात्यांचे स्वरूप- प्रश्नावली तंत्राचा वापर फक्त सुशिक्षित वर्गापुरता करता येतो.
मात्र अनुसूचीत संशोधक स्वतः प्रश्न विचारून उत्तर लिहिणारा असल्यामुळे अशिक्षित
वर्गासाठी देखील तिचा वापर करता येतो. सर्वसमावेशक नमुना तयार करण्यासाठी
अनुसूचीचा वापर केला जातो. अनुसूचीतील प्रश्नाबाबत येणाऱ्या अडचणी संशोधक सोडवत
असल्यामुळे माहिती अपुरी राहण्याची शक्यता नसते. प्रश्नावली तंत्रात ही सोय नसते. प्रश्नावली
संदर्भात अडचणी असतील वा प्रश्नाचा नीट अर्थबोध होत नसेल तर प्रश्नांची उत्तरे
न लिहिण्याकडे उत्तरदात्याचा कल असतो. प्रश्नावलीतून बऱ्यादा अपुऱ्या प्रश्नांची
उत्तरे पात्र होतात.
·
प्रश्नांची रचना- प्रश्नावलीत प्रश्न साधे, सोपे असतात. तसेच प्रश्नाची संख्या जास्त असते.
उत्तरदात्याला त्यांचा सहज अर्थ बोध होणे आवश्यक असते. अनुसूचीची रचना संशोधनाच्या
दृष्टीने केलेली असल्यामुळे सोपे संख्या कमी असते. उत्तरदात्याला कंटाळा येऊ नये
म्हणून अनुसूचीत प्रश्नांची संख्या कमी असते.
·
उत्तराचे स्वरूप- प्रश्नावलीचे प्रतिसाद नोंदविताना उत्तरदाता बाह्य दडपणाशिवाय
स्वतंत्रपणे विचार करून कार्य पार पाडू शकत असल्यामुळे माहिती लपविण्याची शक्यता
कमी असते. मात्र अनुसूची संशोधक भरतो आणि उत्तरदाता तोडी प्रतिसाद देतो. संशोधकाच्या
उपस्थितीचा मानसिक परिणाम होऊन उत्तरदाता अपुरी,
खोटी या वरवरची माहिती देऊन आपली सुटका करून
घेण्याचा प्रयत्न करतो. अनुसूचीच्या माध्यमातून वस्तुस्थितीदर्शक माहिती मिळण्याची
शक्यता कमी असते.
·
वेळ आणि पेशाचा विनियोग- प्रश्नावली उत्तरदात्याकडे पोस्टाने वा कुरियरने पाठविले जाते.
उत्तरदाता ती पोस्टले पाठवितो. अनेकदा उत्तरदाता प्रश्नावली पाठवत नाही म्हणून
स्मरणे व विनंती पत्रे पाठवावी लागतात. प्रश्नावली भरून परत न आल्यास नवीन
उत्तरदाता शोधून नवीन प्रश्नावली पाठवाव्या लागतात. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम तिन्ही गोष्टींचा अपव्यय होता. अनुसूची संशोधक स्वतः
भरतो. उत्तरदाता आणि त्यांचा प्रतिसाद लगेज नोंदवितो. अनुसूची तंत्राच्या वापरात
वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होते.
अशा प्रकारे प्रश्नावली आणि अनुसूची तंत्रातील साम्य व भेद स्पष्ट करता येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.