संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलेबून नसतो.
केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय.
स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही.
जेव्हा जेव्हा सर्व देशाचे हित आणि माझे हित यामध्ये विरोध निर्माण झाला, तेव्हा मी देशहिताला प्राधान्य दिले आहे. वैयक्तिक फायदे याचा मार्ग मी कधीही चोखाळलेला नाही. देशाचे हित आणि दलितांचे हित यांच्यामध्ये विरोध निर्माण होईल तेव्हा देशाच्या हितापेक्षा दलित हितालाच मी प्राधान्य देईन. देश आणि मी यांच्यामध्ये माझा अग्रक्रम नेहमी देश हिताला राहील. पण देश आणि दलित समाज यांच्यामध्ये विरोध निर्माण झाला तर मी दलितांची बाजू घेईन.
लोकशाही यशस्वी होण्यासाठी लोकशाहीवर अधिष्ठित अशा समाजाची गरज असते. लोकशाही हा काही केवळ शासनाचा एक प्रकार नाही. तो समाजव्यवस्थेचा एक प्रकार आहे. सामाजिक लोकशाही नसेल तर राजकीय लोकशाहीवर आधारलेल्या घटनेचा काही उपयोग नाही. तिला सामाजिक लोकशाहीची जोड द्यावी लागेल. सामाजिक लोकशाही म्हणजे सामाजिक जीवनात स्वातंत्र्य समता बंधुता मूल्यांना महत्त्व होय.
धर्म ही एक प्रभावशाली सामाजिक शक्ती आहे. माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती स्वार्था कडे असते. परंतु धार्मिक ध्येयप्राप्तीसाठी स्वतःच्या संकुचित स्वार्थावर पाणी सोडण्यास तो तयार होतो म्हणून समाजात नीतीचे राज्य प्रस्थापित व्हायचे असेल तर नीतीला धर्माची जोड द्यावी लागेल.
जाती व्यवस्थेचा आधार हा श्रमविभागणी तत्त्व नाही. जातिव्यवस्थेने श्रमिकांची वेगवेगळ्या जातीत विभागणी केली. श्रमिकांची एक उतरंड निर्माण केली या उतरंडी नुसार व्यवसाय व कार्याचे वाटप करण्यात आले. उतरंडीच्या उच्च स्थानी असणाऱ्या जातींना प्रतिष्ठेचे तर शेवटच्या टोकांना असलेल्या जातींना निकृष्ट दर्जाचे व्यवसाय वाटप करून व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्याला जातिव्यवस्थेने हरताळ फासला.
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर
पराभव निश्चित आहे.
सेवा जवळून,
आदर दुरून
आणि ज्ञान आतून असावे.
लोक आणि
त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या
आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर
इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत.
"मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेलो नाही, मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.