https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

लोकशाहीतील विरोधी पक्षाची भूमिका Role of Opposition Party in Democracy


 

लोकशाहीतील विरोधी पक्षाची भूमिका ?

लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्ष देखील आवश्यक मानला जातो. लोकशाहीच्या यशासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त पक्ष अस्तित्वात असणे आवश्यक असते. सत्ताधारी पक्षाने सत्तेचा गैरवापर करू नये म्हणून त्याला विरोध करणारा प्रभावी विरोधी पक्ष आवश्यक असतो. सत्ताधारी पक्ष बेजबाबदारपणे सत्तेचा वापर करू लागला तर जनतेचा रखवालदार या नात्याने विरोधी पक्षाला काम करावे लागते.

  विरोधी पक्ष लोकांना पर्यायी व्यवस्था देण्याचे काम करतो म्हणजे जनतेला नवा पर्याय उपलब्ध करून देतो.

  सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर जुलमी बनण्याची शक्यता असते. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम विरोधी पक्ष करीत असतो.

  सत्ताधारी पक्षाला तुल्यबळ असा विरोध करणारा विरोधी पक्ष असेल तर सत्ताधारी पक्ष जबाबदारीने वागतो. विरोधी पक्षामुळे सत्ताधारी पक्षावर अकुंश राहतो.

  कायदेमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवू शकतो.

  सरकारविरोधी लोकमत तयार करणे, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणे,

  सरकारच्या चुका जनतेच्या लक्षात आणून देणे,

  सत्ताधारी पक्षाला रचनात्मक सहकार्य करणे,

  देशाच्या विकासात भागीदारी करणे.

  सरकारी धोरणाची चिकित्सा करणे.

  इत्यादी विरोधी पक्षाची प्रमुख भूमिका असते. विरोधी पक्षाच्या अभावी लोकशाहीची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळे प्रभावी विरोधी पक्ष लोकशाहीचा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.