राजकीय सामाजीकरणाची आवश्यकता, गरज वा महत्व :
राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया ही प्राचीन काळापासून महत्त्वपूर्ण
मानली जाते. प्लेटो, अॅरिस्टॉटल यांच्या
सारख्या विचारवंताच्या विचारात ही अप्रत्यक्षपणे या संकल्पनेला महत्त्व दिलेले
दिसते. १९५९ मध्ये हर्बर्ट हायमन यांनी 'Political Socialization' नावाचा ग्रंथ लिहून या विषयाकडे लक्ष वेधले. दुसऱ्या महायुद्धानंतर ही
संकल्पना राज्यशास्त्रात मोठया प्रमाणावर अभ्यासली जाऊ लागली आहे.
राज्यशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून राजकीय सामाजीकरणाकडे पाहिले
जाते. या संकल्पनेची उपयुक्तता लक्षात आल्याने ह्या संकल्पनेचे महत्त्व आधुनिक
काळात वाढत आहेत. त्यांची कारणे पुढील प्रमाणे
१) राजकीय व सामाजिक व्यवस्थेतील दुवा:- मानवाचे राजकीय वर्तन
व सामाजिक वर्तन यांचा परस्पराशी संबंध असतो. त्यांचा एकमेकावर प्रभाव पडतो.
म्हणून मानवाचे राजकीय वर्तन समजून घेण्यासाठी त्यांचे सामाजिक वर्तन विचारात घेणे
आवश्यक असते. तसेच राजकीय व्यवस्थेची उभारणी सामाजिक व्यवस्थेवर झालेली असते.
कोणत्याही देशाच्या राजकारणाचा पाया सामाजिक परिस्थितीतून विकसित होत असतो.
कुटुंबसंस्था, धर्मसंस्था, जात, वर्ण इत्यादी सामाजिक घटकाचा राजकीय वर्तनावर
प्रभाव पडत असतो. याचा अर्थ राजकीय कृतीवर सामाजिक कृतीचा प्रभाव पडत असतो. या
परस्परसंबंधित कृतीचे अध्ययन करण्यासाठी राजकीय सामाजीकरणाचा उपयोग होत असतो. उदा.
व्यक्तीच्या जन्म ज्या परिसर, जाती व धर्मात झालेला आहे
त्याचा राजकीय मतावर कळतनळत प्रभाव हा पडत असतो.
२) आंतरशास्त्रीय दृष्टिकोन :- सामाजिक शास्त्राचा अभ्यास
करतांना आधुनिक काळात आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब केला जातो. समाजशास्त्र व
राज्यशास्त्र हे दोन्ही महत्त्वाची सामाजिक शास्त्रे आहेत. या दोन्ही शास्त्राचा
परस्परा असलेला संबंध समजून घेण्यासाठी राजकीय सामाजिकरण प्रक्रियांचा अभ्यास करणे
आवश्यक आहे. आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाच्या आधारावर राज्यशास्त्र आणि समाजशाखाचा
अभ्यास केला तर मानवी वर्तनामागील गुढ़ाची उकल शास्त्रीय पद्धतीने करता येऊ शकते.
विविध सामाजिक शास्त्रे मानवाच्या विविध पैलूंचा अभ्यास करतात अभ्यासाच्या सोईसाठी
ती वेगवेगळी केलेली आहेत पण ज्ञान है एकसंघ असते मानवाच्या राजकीय वर्तनाचा विचार
करतांना त्यांच्या विविध वर्तनाचा प्रभाव त्यांच्यावर पडत असतो म्हणून मानवाच्या
राजकीय कृती आणि वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब
करून विविध सामाजिकशास्त्राच्या मदतीने अभ्यास करता येईल त्यासाठी राजकीय
सामाजीकरण प्रक्रियेचे मदत लागेल. सर्व सामाजिकशास्त्रांच परस्परसंबंध जाणून
घेण्यासाठीही राजकीय सामाजीकरण प्रक्रियेचा उपयोग होऊ शकतो.
३) राजकीय वर्तनाचा अभ्यास- एखादी व्यक्ती जेव्हा राजकीय वर्तन
करते. त्या बर्तना मागची मनोभूमिका समजून घेणे आवश्यक असते. ही मनोभूमिका समजून
घेण्यासाठी त्या व्यक्तीचे सामाजीकरण कसे झाले याचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी
राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया अभ्यासाने गरजेचे आहे. मानवाचा राजकीय
सहभागामागच्या कारणांचा शोध राजकीय सामाजीकरण प्रक्रियेच्या माध्यमातून करता येतो.
४) राजकीय बदलाचे आकलन- बदल आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम
आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक
रचनेमुळे राजकीय रचनेत बदल होत असतात. हे राजकीय बदल कोणत्या मार्गाने होत असतात,
बदलाची गती किती आहे, बदल योग्य मागांनी होत
आहेत की नाही, बदलातून समाजव्यवस्थेत होणारे फायदे इत्यादी
साकल्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय सामाजीकरण प्रक्रियेच्या मदतीने
राजकीय बदलाचे आकलन करता येते. उदा. औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेल्या भांडवलदार
वर्गाने कामगाराच्या केलेल्या शोषणातून साम्यवादी विचाराचा उदय झाला.
५) राजकीय व्यवस्थेचा अभ्यास- राजकीय व्यवस्था कालसापेक्ष
असते. तिच्यात काळाप्रमाणे बदल होत असतात. ते बदला का झाले, कोणी घडवून आणते, या बदलामुळे
व्यवस्थेवर काय परिणाम झाला या प्रश्नाची उत्तरे राजकीय अध्ययनातून मिळत असतात.
म्हणून ही प्रक्रिया अभ्यासणे आवश्यक असते.
६) राजकीय सहभागाची निर्मिती :- लोकशाही प्रशासनात व्यक्तीचा
सहभाग असणे गरजेचे आहे. राजकीय सामाजीकरण प्रक्रियेच्या माध्यमातून राजकीय
संस्काराची पेरणी करून जनतेला राजकीय दृष्टया कृतिप्रवण करता येते हे कृतिप्रवण
नागरिक राजकीय प्रक्रियेत सहभागी होतात म्हणून राजकीय सामाजीकरण प्रक्रियेतून
राजकीय सहभागाला चालना मिळत असते.
७) राजकीय व्यवस्थेच्या स्थैर्य आकलन :- प्रत्येक देशात
स्वत:ची अशी राजकीय व्यवस्था असते. काही ठिकाणी ती अल्पकाळ टिकते तर काही ठिकाणी
दीर्घकाळ टिकते असे का घडते या कारणाचे आकलन राजकीय सामाजीकरण प्रक्रियेतून होऊ
शकते. उदा. पाकिस्तान लोकशाही स्थिर होऊ शकली नाही यांचे कारण पाकिस्तानातील
मुस्लिम लीग व इतर पक्षांनी ब्रिटिश काळात टाकलेल्या बहिष्कारामुळे लोकशाही प्रक्रियेविषयी
आस्था निर्माण होऊ न शकल्यामुळे तेथे लोकशाहीला यश मिळू शकले नाही. म्हणून
कोणत्याही राजकीय व्यवस्थेच्या स्थैर्याचा अभ्यास राजकीय सामाजीकरण
प्रक्रियाद्वारे केला जाऊ शकतो.
८) राजकीय कृतीचा अभ्यास- राजकीय कृती घडून येण्यामागे राजकीय
सामाजीकरण निर्णायक भूमिका बजावत असते. व्यक्तीच्या राजकीय कृतीचा उलगडा राजकीय
सामाजीकरणाच्या अध्ययनातून होऊ शकतो. उदा. विशिष्ट समाजातील व्यक्ती विशिष्ट
पक्षाला का सातत्याने पाठिंबा देतात, विशिष्ट वर्गातील प्रतिनिधी विशिष्ट प्रकारच्या मागण्या सातत्याने करतात
अशा राजकीय कृतीचे अध्ययन राजकीय सामाजीकरणाद्वारे होऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.