राजकीय संस्कृती म्हणजे काय?
राजकीय
संस्कृती ही संकल्पना दुसऱ्या महायुद्धानंतर राज्यशास्त्रात मोठया
प्रमाणावर अभ्यासली जाऊ
लागली
आहे.
प्रत्येक व्यक्तीला विशेष
व्यक्तिमत्व असते त्याप्रमाणे राष्ट्राला देखील
स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.
त्यांचे
अस्तित्व राष्ट्राच्या संस्कृतीतून प्रदर्शित होत
असते.
प्रत्येक राष्ट्राला स्वतःची
विशिष्ट
अशी
संस्कृती असते. त्या
संस्कृती बदल राष्ट्राला अभिमान देखील
असतो.
राजकीय संस्कृती अर्थ आणि व्याख्या-
'राजकीय संस्कृती' ही संकल्पना समाजशास्त्रातील 'संस्कृती' संकल्पनेतून उदयाला आलेली
आहे.
त्यामुळे राजकीय संस्कृती ही सामाजिक
संस्कृतीचा भाग असते.
समाजाशास्त्रात संस्कृती या संकल्पना ज्या अर्थाने
वापरली
जाते, त्याच
अर्थाने
राज्यशास्त्राज्ञांनी राजकीय संस्कृती संकल्पना वापरली
आहे.
राजकीय
विश्लेषणाच्या अध्ययनात राजकीय
संस्कृती ही संकल्पना मानववंशशास्त्र व समाजशास्त्रातील संस्कृती संकल्पनेतून आली. गॅब्रिएल आल्मंड यांनी
'Civic Culture' ग्रंथात
राजकीय
संस्कृती ही संकल्पना राज्यशास्त्रात रूढ
केली.
लुसियन पाय व सिडने
व्हर्बा
आणि
इतर
राज्यशास्त्रज्ञांनी या संकल्पनेचा अभ्यास केलेला
आढळते.
समाजाच्या सभासद म्हणून
व्यक्तीने मिळविलेल्या ज्ञान, कला, श्रद्धा, नीती, कायदे, रूढी
व इतर
क्षमता
या सर्वांचा एकत्रित समुच्चय
म्हणजे
संस्कृती होय. व्यक्ती
ज्या
समाजात
व समुदायात वाढते तेथील
लोकांच्या राजकारणाविषयीच्या धारणा, भावना
व जाणिवा
ती शिकत
असते
आणि
ती आपल्या
व्यक्तिमत्त्वातून भिनवत असते.
राजकीय
व्यवस्थेविषयी लोकांच्या अभिवृत्ती, श्रद्धा, जाणिवा
व अभिमुखता असतात त्यांचा
अंतर्भाव त्या समाजाच्या राजकीय संस्कृतीत होत असतो.
राजकीय
प्रक्रियांना अर्थपूर्णता व आकार
राजकीय
संस्कृतीत मिळतो. प्रत्येक राष्ट्राची संस्कृती त्या
त्या
देशातील
विशिष्ट
परिस्थितीतून विकसित होत
असते.
प्रत्येक देशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय
आणि
सांस्कृतिक परिस्थिती भिन्न
भिन्न
असल्याने प्रत्येक देशाच्या राजकीय संस्कृतीत भिन्नता दिसून
येते.
म्हणून
प्रत्येक देशाची राजकीय
संस्कृती ही त्या
देशाची
स्वत्व
वा ओळख
असते.
हे स्वत्व
टिकविण्यासाठी प्रत्येक राष्ट्र
प्रयत्न
करत
असते.
म्हणूनच
राजकीय
व्यवस्थेचे विश्लेषण करताना
राजकीय
संस्कृतीचे अध्ययन करणे
आवश्यक
असते.
१)
मॅक्रेटिस- एखादया राजकीय
समाजाने
सामान्यपणे स्वीकारलेले राजकीय
उद्दिष्टये म्हणजे राजकीय
संस्कृती होय.
२) वीर : शासनसंस्थेने नियंत्रण कसे ठेवावे व कशावर ठेवावे या संबंधीची मूल्ये व भावनिक दृष्टिकोन समुच्चय म्हणजे राजकीय संस्कृती होय.
३)
सिडने व्हर्बा: अनुभवातून निर्माण
झालेल्या श्रद्धा, देशातील
प्रतिके
व मूल्य
यांची
गोळाबेरीज म्हणजे राजकीय
संस्कृती होय.
४)
आल्मंड- ज्या
मूल्यांच्या व प्रेरणाच्या चौकटीत एखादी
राजकीय
व्यवस्था कार्य करत असते.
ती चौकट
म्हणजे
राजकीय
संस्कृती होय.
वरील
व्याख्यांच्या आधारावर राजकीय
व्यवस्था, राजकीय
घटना
किंवा
राजकीय
वस्तू
इत्यादी
कडे
पाहण्याची लोकांत असलेली
प्रवृत्ती किंवा दृष्टिकोन व मूल्ये
यांच्या
समुच्चयाला अभ्यासकांनी राजकीय
संस्कृती मानलेली आहे.
राजकीय
संस्कृतीचा अर्थ विशद
करतांना
राजकीय
व्यवस्थेसंबंधी व्यक्तीच्या असलेल्या भावनेच्या आधारावर
व्यक्तिगत दृष्टिकोनातून काही
अभ्यासकांनी केलेल्या आहेत
काही
अभ्यासकांनी समूहांच्या राजकीय
व्यवस्थेकडे पाहण्याच्या सामूहिक
दृष्टिकोनाच्या आधारावर अर्थ
विशद
करण्याचा प्रयत्न केलेला
आहे.
राजकीय संस्कृतीवर प्रभाव पाडणारे घटक वा आधार-
प्रत्येक राजकीय व्यवस्थेवर ज्या विशिष्ट
प्रेरणा
लोकात
दिसून
येतात, त्यांच्या निर्मितीमागे काही
कारणे
असतात.
या कारणांनाच राजकीय संस्कृतीचे आधारभूत घटक
किंवा
राजकीय
संस्कृतीवर प्रभाव पाडणारे
घटक
असे
म्हणतात.
राजकीय
संस्कृती ही अचानक
निर्माण
होत
नसून
सामाजिक, राजकीय, आर्थिक
वा अनेक
घटकांचा
परिपाक
असतो.
अर्थात
सर्व
घटकाचा
अभ्यास
करणे
गरजेचे
नसले
तरी
स्थूलमानाने राजकीय संस्कृती घडविणाऱ्या सार्वत्रिक स्वरूपाच्या घटकांचा
अभ्यास
करणे
आवश्यक
आहे.
ते घटक
पुढीलप्रमाणे होत.
१)
भौगालिक वा नैसर्गिक परिस्थिती- देशाची भौगोलिक
संरचना
हा घटक
लोकांच्या अभिवृत्तींना आकार
देण्यात
महत्त्वपूर्ण भूमिका बजावत
असतो.
अतिदुर्गम, डोंगराळ
व भौगोलिकदृष्टया इतर भूभागापासून अलिप्त असलेल्या भागात राहणाच्या जनजातींच्या राजकीय
संस्कृतीत बदल होण्याची शक्यता फार
कमी
असते.
कारण
बाह्य
जगाशी
त्यांचा
संबंध
फार
कमी
असतो.
सांस्कृतिक देवाणघेवाण आणि
आदानप्रदानअभावी हे समूह
इतर
समूहापेक्षा राजकीयदृष्टया मागासलेले आढळून येतात.
उदा.
आफ्रिका
खंडातील
विषवृत्तीय प्रदेशातील घनदाट
जंगले
व दळणवळण
साधने
मर्यादित असल्याने तेथील
राष्ट्र
राजकीय
मुलभ
असते
तेथील
संस्कृती झपाट्याने बदलण्याची शक्यता असते.
समाजात
काही
राजकीय
मूल्य
भौगालिक
परिस्थितीतून जन्माला येतात.
उदा.
भौगालिकदृष्टया इंग्लड चारही
बाजूने
समुद्राने वेढलेला असल्याने परकिय आक्रमणाची भिती इंग्लंड
नव्हती
त्यामुळे इंग्लंडला सुरक्षितता लाभल्याने तेथे
लोकशाहीचा उदय व विकासझाला. राजकीय व्यवस्थेला लाभलेले भौगोलिक
स्थान
व परिस्थिती हा घटक
राजकीय
संस्कृती निश्चित करण्यात
निर्णायक भूमिका बजावत
असतो.
अमेरिकेला लाभलेली अमर्याद
भूमी, विपुल
साधनसामुगी, उपद्रवी
शेजारी
राष्ट्राचा अभाव इत्यादी
घटकांमुळे व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारसरणी रूजण्यास अनुकूल
परिस्थिती निर्माण झालेली
दिसते.
भारताच्या उत्तरेला असलेल्या हिमालय आणि
तीनही
बाजूंनी
असलेल्या समुद्रामुळे भारताच्या संस्कृतीला संरक्षण
मिळालेले दिसते. भौगोलिक
एकात्मतेतून राष्ट्रवादाची भावना
विकसित
होत
असते
तसेच
भीगोलिक
सलगता
नसेल
तर राष्ट्र
विघटनाची प्रक्रिया सुरु
होत
असते.
उदा.
पूर्व
व पश्चिम
पाकिस्तानचा भूप्रदेश सलग
नसल्यामुळे समान धर्म
असूनही
अवघ्या
२४ वर्षात
पाकिस्तानचे दोन तुकडे
होऊन
बांगलादेश स्वतंत्र झाला
याचा
अर्थ
भौगालिक
परिस्थिती राजकीय संस्कृतीवर खूप प्रभाव
पडतो.
२)
आर्थिक परिस्थिती
:- आर्थिक परिस्थिती हा राजकीय
संस्कृतीचा महत्त्वाचा आधार
असतो.
देशाच्या आर्थिक परिस्थितीचा राजकीय संस्कृतीवर निश्चित परिणाम
होत
असतो.
ग्रामीण
व शहरी
समाजाची
आर्थिक
वैशिष्टये भिन्न भिन्न
असल्यामुळे राजकीय दृष्टिकोन निरनिराळे असतात.
ग्रामीण
समाज
स्थितीशील व परंपरेना मानणारा असतो
तर नागरी
समाजात
सुधारणांना अनुकूल प्रवृत्तीमुळे नवे बदल
व परिवर्तन नागरी भागात
लवकर
घडून
येते
असते.
नागरीकरण व औद्योगिक समाजात स्थानिक
किंवा
प्रांतिक निष्ठांपेक्षा राष्ट्रीय निष्ठा प्रभावी
असतात.
वाढत्या
औद्योगिकीकरणातून राष्ट्रीय निष्ठाची मोठया प्रमाणावर विकसित होत
असते.
ज्याउलट
ज्या
देशात
औद्योगिकरण व शहरीकरण
मर्या
प्रमाणात असते तेथील
राजकीय
संस्कृती संकुचित असते.
शेतकरी
वर्गामध्ये शिक्षणाचा अभाव, संसूचन
साधनाची
कमतरता
यामुळे
सनातनी
प्रवृत्तीसोबत शासकीय कृत्याविषयी तिरस्कार व अज्ञानाची भावना मोठ्या
प्रमाणावर आढळते. तसेच
शेतीप्रधान देशात शेतकरी
विखुरलेला असल्याने तो संघटित
नसतो.
त्यामुळे त्यांचा शासनाचा
प्रभाव
पड़त
नाही
याउलट
औद्योगिकरण झालेल्या देशात
कामगार
वर्ग
एकाच
शहरात
राहत
असल्याने तो लवकर
एकत्र
येतो.
संघटनेच्या जोरावर शासनावर
प्रभाव
पडतो.
त्यामुळे उद्योग प्रधान
देशात
राजकीय
जागृती
व मतदानाचे प्रमाण जास्त
असते.
नागरी
भागात
संसूचन
माध्यमाची उपलब्धता, शिक्षणाच्या सोयीमुळे व्यक्तीची बौद्धिक व वैचारिक
पातळी
उंचावते.
त्यातून
लोकांमध्ये हक्काविषयी जागृती
निर्माणहोते आणि लोक
हक्क
रक्षण
व हितसंबंधाच्या परिपूर्तीसाठी संघटना
वा दबावगटाची निर्मिती करत
असतात.
या गटातील
सहभागामुळे नागरी भागातील
लोकाचा
राजकीय
सहभागाचे प्रमाण जास्त
दिसून
येते.
देशाच्या आर्थिक परिस्थितीचा राजकीय संस्कृतीवर परिणाम होतो.
आर्थिक
सुबत्ता
असलेल्या देशात लोकशाही
यशस्वी
होते.
याउलट
आर्थिकदृष्टया बिकट परिस्थिती असलेल्या देशात
हुकूमशाही निर्माण होते.
उदा.
इटलीत
फॅसिझम
मोठया
प्रमाणावर आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाल्यास
राजकीय
व्यवस्थेची अधिमान्यता धोक्यात
येत
असते.
आर्थिक
समानता
असलेल्या देशात लोकशाही
शासन
प्रणाली
यशस्वी
होण्याची शक्यता असते.
उदा.
इंग्लंड
व अमेरिकेत असलेल्या आर्थिक
संपन्नतेतून लोकशाही यशस्वी
होण्यास
हातभार
लागलेला
दिसतो.
आर्थिक
विकास
प्रक्रियेत निर्माण झालेल्या असंतुलनातून प्रादेशिक अस्मितेची भावना
विकसित
होत
आहेत.
वाढत्या
प्रदेशवादातून प्रादेशिक राजकीय
पक्षाचा
उदय
होता.
प्रादेशिक राजकीय पक्षाचा
प्रभाव
वाढत
जातो.
उदा.
भारतातील प्रत्येक घटकराज्यात विशेषतः भूमीपूत्र विरुद्ध परप्रांतीय या संघर्षातून अनेक राज्यात
प्रादेशिक पक्ष निर्माण
झालेले
दिसतात.
उदा.
शिवसेना, मनसे
औद्योगिकरण व नागरी
करण्यातून होणाऱ्या विकास
प्रक्रियेच्या वाटा भूमीपूत्राना मिळाला पाहिजे
या भावनेतून राजकीय संस्कृतीत प्रादेशिकवादाचे अस्तित्व वाढत चाललेले
दिसते.
म्हणजे
आर्थिक
परिस्थिती ही राजकीय
संस्कृती निश्चित करणारा
महत्त्वपूर्ण घटक असतो.
३)
सामाजिक परिस्थिती
:- सामाजिक रचनेचा
राजकीय
संस्कृतीवर प्रभाव पडतो.
सामाजिक
परिस्थितीत वर्ग, वर्ण, भाषिक
मतभेद
आणि
धार्मिक
संबंधाचे स्वरूप इत्यादींचा समावेश असता.
सामाजिक
परिस्थितीत पुढील घटकाचा
समावेश
होतो.
अ)
वर्ग, वर्ण व जात :- विवेकशील राजकीय व्यवस्था निर्माण करणाऱ्या दृष्टीने वर्ग-भेदातीत
समाज
निर्माण
करणे
आवश्यक
असते.
कारण
वर्ग
आणि
वर्ण
या घटकाचा
राजकीय
संस्कृतीवर प्रभाव पडत
असतो.
वांशिक
भिन्नतेमुळे व वर्णभेदामुळे त्या त्या
देशातील
राजकीय
संस्कृतीला फार मोठा
धोका
निर्माण
होऊ
शकतो.
वांशिक
संघर्षातून सामाजिक संघर्ष
उदयास
आल्याची
असंख्य
उदाहरणे सांगता येतात. वांशिक
संघर्षामुळे राजकीय व्यवस्थेची स्थिरता धोक्यात
असल्याची वा देशाची
तुकडे
पडल्याची उदाहरणे दिसून
येतात.
उदा.
भिन्न
वंशियाना एकत्र राहणे
अशक्य
झाल्याने तुर्की साम्राज्याचे विघटन झाले.
अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत
राजकीय
संस्कृती असलेल्या देशामध्येही आजही निग्रो
विरुद्ध
गोरे
हा छुपा
संघर्षअस्तित्वात असल्याचे दिसून
येतो
दक्षिण
आफ्रिकेतील काळा गोरा
यांच्यातील संघर्ष आधुनिक
काळातातील प्रमुख उदाहरण
सांगता
येईल.वर्ण
या घटकाचा
राजकीय
संस्कृतीवर प्रभाव पडतो.
कनिष्ठ
वर्गातील लोक साम्यवाद व समाजवादाला पाठिंबा देतात
तर उच्चवर्णीय भांडवलशाहीला पाठिंबा
देतात.
भारतात
वर्णव्यवस्था आणि जातिभेद, अस्पृश्यता इत्यादींचा भारताच्या राजकीय संस्कृतीवर परिणाम झालेला
दिसतो.
जात
या घटकांचा
राजकीय
संस्कृतीवर सर्वात जास्त
प्रभाव
पाडणारा
घटक
आहे.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक
वर्ष
होऊनही
राजकीय
पक्षांना प्रचार मोहिमेत
जातीय
आवाहनाचा आधार घ्यावा
लागतो.
निवडणुकीत तिकिट बाटप
करतांना
किंवा
महत्त्वपूर्ण पद देतांना
जातीचा
विचार
केला
जातो.
मतदार
सुद्धा
जातीचा
आधारावर
मतदान
करतो.
उदा.
महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठा
जातीचे
लोकसंख्येमुळे वर्चस्व निर्माण
झालेले
आहे.
ब)
भाषा- भाषिक
एकता
व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य
मानली
जाते.
आधुनिक
काळात
निर्माण
झालेली
राष्ट्र
राज्य
एक भाषिक
स्वरूपाची आहेत. युरोपात
भाषेच्या आधारावर राष्ट्र
वा राष्ट्रक निर्माण झालेली
दिसतात.
उदा.
जर्मनी
जर्मन
भाषा, स्पेन
स्पॅनिश
भाषा
भाषेच्या आधारावर परस्परविरोधी प्रक्रिया निर्माण
झालेल्या दिसतात. जर्मनी
भाषिकांना एकत्र आणून
राष्ट्र
उभारणी
फ्रेडरिक द गेट
आणि
बिस्मार्क यांची कामगिरी
ही एकत्रीकरणाची प्रक्रिया आहे
तर एका
साम्राज्यामध्ये किंवा देशामध्ये असलेल्या सांस्कृतिक आणि भाषिक
भेदामुळे विघटनाची प्रक्रिया होऊन देशाचे
तुकडे
पडल्याची उदाहरणे आहेत.
उदा.
पूर्व
पाकिस्तान व पश्चिम
पाकिस्तान हे इस्लाम
धर्म
समान
असूनही
भाषा
भेदामुळे बांगलादेश फुटून
निघाला.
बहुभाषिकत्व हे भारताच्या राजकीय संस्कृतीचे वैशिष्टये आहे.
भारतात
जवळपास
पाचशेपेक्षा जास्त बोलीभाषाचे अस्तित्व दिसून
येते.
भाषिक
भिन्नतेतून भारतीय ऐक्याला
सातत्याने आवाहने मिळता
आहेत.
उदा.
दक्षिण
भारतीय
हिंदीला
जोरदार
विरोध
करतात.
भाषिक
भिन्नतेच्या प्रश्नावर मात
करण्यासाठी भारतात भाषावार
प्रांतरचनेची निर्मिती करण्यात
आली.
बहुभाषिक लोकांना एकत्रित
ठेवण्यासाठी भारतीय संघराज्याची निर्मिती भाषावार
प्रांतरचनेच्या तत्त्वावर करण्यात आलेली
आहे.
उदा.
मराठी
बोलणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य
क)
धर्म :- राजकीय
संस्कृती निश्चित करणारा
धर्म
हा महत्त्वपूर्ण सामाजिक घटक
आहे.
धर्म
ही व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत
जिव्हाळयाची बाब असते.
धर्माबाबत मानवीची संवेदनक्षमता सर्वात तीव्र
असते.
एकेकाळी
धर्माच्या नावावर संहारक
युद्धे
झालेली
दिसतात.
इतिहासात धमनि राष्ट्रनिर्मितीबाबत महत्त्वाचीभूमिका बजावलेली दिसते. धर्माच्या आधारावर राष्ट्रनिर्मितीसोबत राष्ट्रविघटनाची प्रक्रियाही झालेली दिसते.
भारतात
ब्रिटिश
काळात
धर्माच्या आधारावर द्विराष्ट्रवादास ब्रिटिशांनी प्रोत्साहन दिल्यामुळे हिंदूस्थानची फाळणी होऊन
भारत
आणि
पाकिस्तान ही दोन
राष्ट्र
उदयाला
आलेली
दिसतात.
आजही
अनेक
देश
धर्माधिष्ठीत दिसतात. उदा.
मध्य
पूर्वतील अनेक देश
इस्लाम
धर्मावर
आधारित
आहेत.
ज्या
राष्ट्रातील राजकारणात धर्माचा
आधार
घेतला
जातो
तेथे
बुद्धिपेक्षा परंपरेला जास्त
महत्त्व
असते.
धर्माचा
आधार
घेणारी
राजकीय
व्यवस्था परंपराप्रधान आहे.
समाजाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये कायदा आणि
करार
यापेक्षा रूढी, परंपरेला अधिक महत्त्व
असते.
उदा.
मध्य
पूर्वतील अनेक देशात
इस्लाम
धर्मातील शरियत या धर्मग्रंथातील कायदयाचा अंमल
केला
जातो.
अनेक
देशात
धर्मावर
आधारित
राजकीय
पक्ष
निर्माण
झालेले
दिसतात.
उदा.
भारतात
हिंदू
महासभा
धार्मिक
वेगळेपणाचा राजकीय सहभागावर निश्चित परिणाम
होतो.
धर्मभिन्नतेमुळे कायदे सुद्धा
वेगवेगळे तयार करावे
लागतात.
उदा.
भारतात
मुस्लिमासाठी स्वतंत्र कायदे
आहेत.
परंतु
आधुनि
काळात
धर्म
आणि
राजकारणाची फारकत करण्याची संकल्पना अनेक
राष्ट्रामध्ये रूजलेली असल्याने धर्मनिरपेक्षता तत्त्वाला मोठया प्रमाणावर अधिमान्यता मिळत
आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला अनेक
देशाच्या राज्यघटनांनी मान्यता
दिलेली
असली
तरी
राजकारणात मोठया प्रमाणात धार्मिक आवाहने
केलेली
जातात.
निवडणुकीत केलेल्या धार्मिक
प्रचाराच्या आधारावर विशिष्ट
समाजाची
एकगठ्ठा
मते
मिळविण्याचा प्रयत्न अनेक
देशात
सुरू
झालेला
दिसतो.
धर्माधर्मातील तणावामुळे अनेक
राजकीय
व्यवस्थाचे स्थैर्य धोक्यात
आल्याचे
दिसून
येते.
उदा.
पाकिस्तान मध्ये शिया
सुन्नी
पंथातील
तणाव
४)
शिक्षण पद्धती :- राजकीय
व्यवस्था आणि राजकीय
संस्कृतीच्या जडणघडणीत शिक्षणाला महत्त्वाचे स्थान
आहे.
संस्कार
हा संस्कृतीचा आधार असतो.
शिक्षण
हे संस्काराची पाठशाला आहे.
शिक्षणामुळे ज्ञानात भर पडते.
विचारात
परिपक्वता येते... विवेचनात तर्कशुद्धता येते, विवेकवाद आणि विज्ञानवादास प्रोत्साहन मिळाल्याने राजकीय अंधश्रद्धा कमी होण्यास
हातभार
लागतो.
शिक्षणामुळे नागरिकांमध्ये परिपक्वता व वैचारिक
विकास
होत
असतो.
समाजापुढील व देशापुढील प्रश्नांचा व्यापक
पातळीवरून नागरिक विचार
करू
लागतात.
म्हणून
कोणत्याही देशाची राजकीय
परिपक्वता विकसित करावयाची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.
पाश्चिमात्य देशात आधुनिकीकरणात शिक्षणाने प्रभावी
भूमिका
बजावली.
पाश्चात्य शिक्षण पद्धतीतून व्यक्ति स्वातंत्र्याची कल्पना जन्मास
आल्यामुळे जगातल्या अनेकदेशात क्रांती घडून
आल्या.
जॉन
लॉक, रूसो, मिल, ग्रीन
हे आधुनिक
स्वातंत्र्य सकल्पनेचे प्रणेते
आधुनिक
शिक्षणपद्धतीतून निर्माण झाले.
त्यांनी
उदारमतवादी तोकशाहीला तात्त्विक आणि सैद्धांतिक सामथ्र्यं प्राप्त
करून
दिले, भारतीय
स्वातंत्र्य आंदोलनाचे शिल्पकार टिळक, गांधी
व नेहरू
पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीतून निर्माण झालेत.
शिक्षणातून सर्वसामान्य नागरिकाची बौद्धिक पात्रता
वाढते.
शिक्षित
व्यक्ती
बुद्धिनिष्ठ दृष्टीने प्रत्येक गोष्टींचा विचार
करतो.
सुशिक्षित माणूस भावनांना बळी पडत
नाही.
शिक्षणामुळे देशातील तंत्रज्ञानाची पातळी उंचावते.
या तांत्रिकतेचा देशांच्या शासन
आणि
प्रशासनावर निश्चित पडत
असतो.
साक्षरता आणि राजकीय
सहभाग
यांचा
ही संबंध
दिसून
येतो.
कारण
जास्त
साक्षरता असलेल्या देशात
राजकीय
सहभाग
व जागृती
जास्त
परिणाम
दिसून
येतो.
५)
इतिहास :
राजकीय
व्यवस्थेचा अभ्यास करण्याआधी तिचा पूर्वेइतिहास अभ्यासणे आवश्यक
असते.
कोणतीही
राजकीय
व्यवस्था व संस्कृती गतकाळात घडलेल्या ऐतिहासिक घडामोडीतून विकसित झालेली
असते.
ऐतिहासिक घडामोडीच्या परिणामातून राजकीय संस्कृतीतही फेरबदल होत
असतात.
राष्ट्रांच्या ऐतिहासिक विकास
कोणत्या
पद्धतीने झाला. त्यावर
त्या
देशाची
राजकीय
संस्कृती अवलंबून असते.
ऐतिहासिक घटनांचा मानवी
मनावर
खोलवर
प्रभाव
पडत
असतो.
एखाद्या
राष्ट्रावर परकीयांनी प्रदीर्घ काळ राज्य
केलेले
असेल
तर शासितांच्या संस्कृतीवर शासकांचा निश्चित प्रभाव
पडत
असतो.
उदा.
इंग्रजांनी केलेल्या दीडशे
वर्ष
राजवटीची छाप भारतीय
संस्कृतीवर मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे.
लोकांची
मूल्ये, दृष्टिकोन, प्रेरणा
किंवा
प्रवृत्ती निश्चित करण्यामागे ऐतिहासिक वारसा
महत्त्वाचा मानला जातो.
इतिहासकालीन घटकांचा प्रभाव
मानवी
मनावर
दीर्घकाळ परिणाम करत
असतो.
इंग्लंड
मध्ये
राजा
व प्रजा
यांच्यात अनेक करार
झालेले
आहेत, त्यांचा
प्रभाव
इंग्लंडमधील जनतेवर आजही
दिसून
येतो.
त्यामुळे इतिहासाचा बारसा
भावी
पिढयांमध्ये मूल्य निर्माण
करणारा
ठरतो.
भारताची
धर्मावर
आधारित
फाळणी
झाल्यामुळे भारताने स्वातंत्र्यानंतर धर्माला महत्त्व
देण्याऐवजी धर्मनिरपेक्ष तत्त्वाला महत्त्व दिलेले
आहे.
पाकिस्तानपेक्षा भारतात संसदीय
शासनपद्धती रूजू शकली
कारण
भारतीय
नेत्यांना ब्रिटिशकालीन संसदीय
लोकशाहीचा मिळालेला प्रदीर्घ अनुभव होय.
मुस्लिम
लीन
पक्षाने
सातत्याने टाकलेल्या बहिष्कारामुळे त्यांना संसदीय
लोकशाहीचा अनुभव मिळू
न शकल्यामुळे तेथे संसदीय
लोकशाही
स्थिर
होऊ
शकली
नाही.
इतिहासाचा आधार घेऊन
पूर्व
परंपरांना उजाळा देऊन
सत्ता
मिळविल्याची अनेक उदाहरणे
आहेत.
उदा.
मुसोलिनीने रोमन साम्राज्यातीलप्राचीन वैभवाचा दाखला
देत
इटलीमध्ये फॅसिस्ट पक्षाचे
बळ वाढविले
६)
राजकीय व्यवस्थेचे स्वरूप- प्रत्येक देशात काही
राजकीय
संस्था, संघ
कार्य
करीत
असतात.
त्यांच्या कार्याचा राजकीय
संस्कृतीवर निश्चित परिणाम
होत
असतो.
राजकीय
संस्कृतीचा राजकीय व्यवस्थेवर प्रभाव पडत
असतो
तसाच
राजकीय
व्यवस्थेचा राजकीय संस्कृतीवर प्रभाव पडत
असतो.
राजकीय
व्यवस्था ज्या प्रकारची असते त्याला
अनुकूल
राजकीय
संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला
जातो.
प्रत्येक राजकीय व्यवस्थेत काही राजकीय
मूल्यांची जोपासना केली
जाते
तर काही
मूल्यांचे खच्चीकरण केले
जाते.
लोकशाहीप्रधान देशात स्वातंत्र्य मूल्यांचा आदर
केला
जातो.
विरोधकाची मते मान्य
केली
जातात.
मात्र
हुकूमशाही देशात व्यक्तिस्वातंत्र्याचा गौण स्थान
दिले
जाते
दडपशाहीच्या मार्गाने विरोध
आणि
विरोधकांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला
जातो.
राजकीय
संसूचनाची वृत्तपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणी इत्यादी नियंत्रण ठेऊन त्यांचा
वापर
शासनमान्य मूल्यांच्या प्रसारासाठी करून जनतेचे
ब्रेन
वॉशिंग
करण्याचा प्रयास केला
जातो.
प्रत्येक व्यवस्था विशिष्ट
प्रकारचे विचार व्यक्तीवर लादण्याचा प्रयत्न
करतात.
उदा.
हिटलर
व मुसोलिनी यांनी प्रसिद्धी माध्यमे, शाळा
यावर
नियंत्रण ठेऊन विशिष्ट
मूल्य
रूजविण्याचा प्रयत्न केलेला
होता.
विशिष्ट
विचारसरणी रूजविण्यासाठी राजकीय
व्यवस्था जाणीवपूर्वक प्रयत्न
करत
असते.
उदा.
साम्यवादी देशात लहानपणापासून शाळेत व कुटुंबात मुलाना साम्यवादाचे धडे दिले
जातात.
या पद्धतीने राजकीय व्यवस्था देशाच्या राजकीय
जीवनाला
वळण
देण्याचा प्रयत्न करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.