https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राजकीय संस्कृतीचे स्वरूप व वैशिष्टये Nature and Characteristics of Political Culture


 

राजकीय संस्कृतीचे स्वरूप व वैशिष्टये  

Nature and Characteristics of Political Culture 

राजकीय संस्कृती ही संकल्पना सामाजिक संस्कृती संकल्पनेतून उदयाला आलेली आहे. तरीही सामाजिक संस्कृती आणि राजकीय संस्कृतींच्या स्वरूप वैशिष्ट्यांत फरक दिसून येतात. राजकीय संस्कृतीचे स्वरूप वैशिष्ट्ये साधारणपणे पुढील प्रमाणे सांगता येतात.

) राजकीय संस्कृती सामाजिक संस्कृतीची उपसंस्कृती असते :- राजकारण हे समाजात अस्तित्वात येत असते आणि समाजातील घटकांनी प्रभावित होत असते. राजकारणाचे मूळ समाजात आढळते म्हणून राजकीय संस्कृतीचे मूळ देखील सामाजिक संस्कृतीत आढळते. समाजाने मान्य केलेली मूल्ये ही सामाजीकरणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनलेली असतात. त्यामुळे समाजाचे राजकीय दृष्टिकोन व्यक्तीचे राजकीय दृष्टिकोन यात बऱ्याचदा साम्य दिसूनव्यतीच्या सामाजिक दृष्टिकोनावर राजकीय दृष्टिकोन आणि राजकीय मते अवलंबून असतात. समाज दैववादी, अपश्रद्धेवर भर देणारा असेल तर दुष्काळ महापूराबद्दल शासनाला दोष देणार नाहीत त्यासाठी राजकीय मोर्चा आंदोलने करणार नाहीत याउलट समाज साक्षर जागृत असेल तर या नैसर्गिक संकटाबद्दल सरकारला जबाबदार मानत जाईल. म्हणजे एकंदरीत सामाजिक मूल्यांच्या प्रभाव राजकीय मूल्य संस्कृतीवर पडत असल्याने राजकीय संस्कृती सामाजिक संस्कृतीची उपसंस्कृती असते. समाजात उपलब्ध असलेल्या मूल्यव्यवस्थेतून व्यक्तीची जडणघडण होत असल्याने समाजात प्रचलित राजकीय दृष्टिकोन विकसित करत असतात. उदा. इटलीत मानवी स्वभाव हा विश्वास ठेवण्यास पात्र नाही हा समज अस्तित्वात आहे. लहानपणापासून हा समज मुलांमध्ये तेथे रुजत असल्याने मोठेपणी देखील राजकीय जीवनात त्यांचे प्रतिबिंब पडत असते. सर्वसाधारणपणे समाजात अस्तित्वात असलेल्या सामाजिक दृष्टिकोनाचा राजकीय दृष्टिकोनावर प्रभाव पडतो या दृष्टीने विचार केल्यास राजकीय संस्कृतीही विशाल सामाजिक संस्कृतीची उपसंस्कृती असते.

) राजकीय संस्कृती स्वायत्त अलग असू शकते:- राजकीय संस्कृती ही सामाजिक संस्कृती उपसंस्कृती आहे असे अभ्यासक मानत असले तरी आल्मंडसारखे अभ्यासक राजकीय संस्कृती ही सर्वसाधारण संस्कृतीशी संबंधित असूनही मोठ्या प्रमाणात अलग किंवा स्वायत्त असू शकते. व्यक्तीची वैयक्तिक मते सार्वजनिक मताहून अलग असू शकतात. त्यामुळे राजकीय संस्कृती सामाजिक संस्कृती एकमेकांपासून अलग स्वायत्त असू शकते उदा. डॉ. आंबेडकराबद्दल आदर बाळगणारे व्यक्ती मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचे नाव देण्यास विरोध करीत होत्या. भाषा प्रांतविषयक निष्ठा योग्य मानणारे संसद सदस्य सभागृहातील चर्चेत अशा गोष्टींना अयोग्य ठरवतात. मद्यपान करणारे सदस्य दारूबंदीच्या विधेयकास पाठिंबा देतांना दिसतात. वैयक्तिक जीवनात संकुचित निष्ठा व्यक्त करणारे अनेक नेते वा कार्यकर्ते सार्वजनिक जीवनात वावरत असतांना विशाल दृष्टिकोन धारण करतात किंवा त्यांचे समर्थन करतांना दिसतात. त्यामुळे सामाजिक संस्कृतीपेक्षा राजकीय संस्कृती भिन्न बऱ्याचदा अलग असते.

) राजकीय संस्कृती गतिमान असते:- राजकीय संस्कृती ही स्थिर स्वरूपात नसते तर गतिमान असते. प्रत्येक राजकीय संस्कृतीत सातत्याने बदल होत असतात. बाह्य देशाचा वाढता प्रभाव, वाढते औद्योगिकीकरण, नवीन नेतृत्वाचा प्रभाव, शिक्षण दळणवळण साधनातील वाढ, लोकसंख्येतील बदल इत्यादी विविधकारणामुळे राजकीय संस्कृती सतत बदल होत असतात. ब्रिटिश राजवटीने संसदीय लोकशाही भारतात रूजविण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला दिसतो. १९१७ साली रशिय राज्यक्रांतीच्या प्रभावातून अनेक देशात समाजबादास अनुकूल विचार रूजलेले दिसतात. मात्र राजकीय संस्कृतीत होणारे बदल योग्य मार्गानेच होतील यांची शाश्वती नसते. उदा. पाकिस्तानमध्ये संसदीय लोकशाही भक्कम होण्याऐवजी नष्ट होऊन लष्करी राजवट उदयाला आल्याची दिसून येत असते. राजकीय संस्कृतीच्या बदलातून संस्कृतीचा एक निश्चित बारसा विकसित असतो. तो बदल राजकीय सामाजीकरणाच्या प्रक्रियाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिला जातो. राजकीय संस्कृतीच्या गतिमानतेतून नवीन राजकीय मूल्य परंपरा विकसित होत असतात..

) राजकीय संस्कृती अलिखित असू शकते:- राजकीय संस्कृती राजकीय मूल्यातून विकसित होत असते. राजकीय मूल्य सतत बदल असल्यामुळे राजकीय संस्कृती पूर्णपणे लिखित असू शकत नाही. राजकीय संस्कृती ही बऱ्याच प्रमाणात अलिखित असते. देशाच्या संविधानात ती संपूर्णपणे प्रतिबिंबित होतेच असे नाही. राजकीय मूल्य राज्यघटनेत लिखित स्वरूपात प्रस्थापित केली जातात. तेव्हा राजकीय संस्कृतीला लिखित स्वरूप प्राप्त होते. परंतु सर्व राजकीय मूल्य लिखित स्वरूपात असू शकत नाही. काही मूल्य अलिखित असू शकतात. उदा. परराष्ट्राचा राष्ट्रप्रमुख भारत भेटीवर आल्यास त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधानाने विमानतळावर हजर राहावे राजकीय मूल्य अलिखित आहे. तसेच कायद्या बनविणारे राजकीय नेते हे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सनदी सेवकापेक्षा श्रेष्ठ असतो. हे संकेत अलिखित असले तरी राजकीय संस्कृतीचा एक भाग बनून राहतात. भारतीय घटनेनुसार राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च प्रमुख असला तरी त्यांने पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्लाने राज्यकारभार करावा हा संकेत आहे.

) राजकीय संस्कृती एकजिनसी नसते :- राजकीय संस्कृती कधीही संपूर्णपणे एकजिनशी नसते. प्रत्येक राजकीय संस्कृतीत विविधता दिसून येते. हेन्झ इलाऊ यांनी 'एकच संस्कृती' असा विचार करण्यापेक्षा 'विविध संस्कृतीचे एकत्रीकरण' म्हणूनच राजकीय संस्कृतीचा विचार करणे आवश्यक असते. राजकीय संस्कृतीत भेद असण्याची अभ्यासकांनी विविध कारणे विशद केलेली आहेत. साधारणत: सामाजिक जीवनात अनेक भेद दिसून येतात. समाजात जात, भाषा, धर्म लिंग . घटकावरून विविधता दिसून येते. प्रत्येक घटकाचे आचार विचार यांच्यात विविधता असल्याने समाजात अनेक उपसंस्कृत्या अस्तित्वात असतात. समाजात एकाचवेळेस हिंदू आणि मुस्लमानाची वेगवेगळी उस्कृती अस्तित्वात असते. राजकीय व्यवस्थेतील विविध रचनात अस्तित्वात असणार विविध प्रकारच्या गटातून देखील राजकीय संस्कृतीची एकजिनशीपणा नष्ट होण्यास हातभार लागतो. उदा. लष्कर, न्यायाधीश, राजकीय अभिजन, सनदी नोकरवर्ग इत्यादी विविध गटाच्या राजकीय प्रवृत्ती दृष्टिकोनात असलेल्या विविधतेतून राजकीय संस्कृतीत विविधता निर्माण होते. समाज हा परस्पर विरोधी मते असणाऱ्या व्यक्तीचा मिळून बनलेला असतो. त्याप्रमाणे राजकीय संस्कृतीत ही विविधता दिसून येते. उदा. भारतातील काही लोक संसदीय लोकशाहीला तर काही अध्यक्षीय लोकशाहीला पाठिंबा देतात तर काही साम्यवादाला समर्थन देतांना दिसतात म्हणजे समाजात राजकीय मूल्यामध्ये उफावत असल्याने राजकीय संस्कृती ही विविधता दिसून येते. पारंपरिकता आधुनिकता या मूल्यांच्या प्रभावातून राजकीय दृष्टिकोनात अंतर पडत जाते. हिंदूपेक्षा मुसलमानांमध्ये पारंपरिकतेचा प्रभाव जास्त असल्यामुळे मुसलमानाची राजकीय मते मिळविण्यासाठी धार्मिक आधाराचा वापर करते. त्यासाठी मुस्लिम मौलवी मुल्ला यांना निवडणुक काळात विशिष्ट पक्षास मते दयावीत म्हणून फतवे काढले जातात. याउलट हिंदू समाजात आधुनिकतेच्या प्रभावामुळे धार्मिक गोष्टीचा प्रभाव पडत नसल्यामुळे धार्मिक आधाराऐवजी इतर आधाराचा वापर केला जातो. त्यामुळे राजकीय संस्कृती एकजिनसी नसते. राजकीय संस्कृतीत एकजिनसीपणा का दिसून येत नाही याबाबत अभ्यासकांनी तीन कारणे सांगितलेली आहेत. समाजात असणारे गट भेद, राजकीय व्यवस्थेच्या विविध रचनांत असलेले गट आणि परस्परविरोधी मूल्यांचे नेत्व प्रभाव इत्यादी कारणामुळे राजकीय संस्कृतीत एकजिनसीपणा दिसून येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.