वांशिक
लोकशाही अर्थ, इतिहास आणि स्वरूप-
भारतीय
लोकशाहीची वाटचाल सध्या काळात वांशिक लोकशाहीच्या दिशेने होताना दिसते आहे.
भारतासारख्या बहुविध आणि बहुसांस्कृतिक देशाच्या लोकशाहीचे वांशिक लोकशाहीच्या
दिशेने होणारी वाटचाल लोकशाहीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून गंभीर परिणाम करणारी
ठरेल.
वांशिक
लोकशाहीचा इतिहास- वांशिक लोकशाही या प्रतीमानाचा वापर पहिल्या महायुध्यानंतर जर्मनीत
हिटलर आणि इटलीत मुसोलिनी यांनी सत्तेवर आल्यावर सुरुवातीला केला. मात्र त्यांनी वांशिक
लोकशाहीचे रुपांतर हुकुमशाहीत केले. आधुनिक काळात वांशिक लोकशाहीची संकल्पना सर्वप्रथम इस्रायल
देशाच्या राजकीय परिप्रेक्षातून पहिल्यांदा 1975 मध्ये
मांडली गेली. इस्रायल हा ज्यूचा देश आहे. या देशाच्या संविधानाने ज्यूचे वांशिक
श्रेष्ठत्व संविधानाने आणि कायद्याने मान्य केलेले आहे. इस्राईलमध्ये ज्यू
बहुसंख्यांक आहेत. या बहुसंख्यांक समाजाच्या सांस्कृतिक अधिपत्याखालील तेथील
लोकशाही व्यवस्था चालत असते. इस्राईल मधील अन्य अल्पसंख्यांक समाजघटकांना लोकशाही
व्यवस्थेत सहभागी होण्याची मुभा आहे मात्र येथील लोकशाही व्यवस्थेत बहुसंख्यांक
ज्यू समाजाचे सर्वच क्षेत्रांवर प्रभुत्व आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की देशाची
संपूर्ण व्यवस्था बहुसंख्यांक समाजाच्या इच्छेनुसार चालते. अल्पसंख्यांक समाजाला
त्यांच्या इच्छेनुरूप वागावे लागेल. इस्रायलच्या लोकशाहीच्या प्रतिमानाचे आकर्षण
धार्मिकतेच्या आधारावर राजकारण करणाऱ्या जगातील अनेक देशातील राजकीय पक्षांना आहे.
इस्राएलच्या वांशिक लोकशाहीचे हे प्रतिमान भारतातील सद्यकालीन राज्यकर्त्यांच्या
दृष्टीने एक आदर्श प्रतिमान ठरलेले आहे.
वांशिक
लोकशाही अर्थ आणि स्वरूप- वांशिक लोकशाही व्यवस्थेत वांशिक
राष्ट्रवादाला महत्वपूर्ण स्थान असते. वांशिक लोकशाही असलेल्या देशात नियमित
निवडणुका होत असतात. पण वांशिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला महत्त्व देणारा गट
सत्तेवर येत असतो. हा सत्तेवर आलेला गट बहुसंख्यांक समाजाच्या सांस्कृतिक आणि
धार्मिक मूल्यांना अनुसरून निर्णय घेत असतो. देशातील अन्य वांशिक गटांना परकीय
किंवा उपरे मानतो. भारतात वांशिकतेच्या आधारावर राजकारण करणारे पक्ष मुस्लिम आणि ख्रिश्चनांना उपरे मानतात. वास्तविक
लोकशाही प्रक्रियेत सर्व वांशिक घटकांना समानतेने सहभागी होण्याची आणि सर्वांना
सामावून घेणे अपेक्षित असते परंतु वांशिक लोकशाहीत देशात असलेल्या बहुसंख्यांक
समाजाचे वांशिक वर्चस्व वाढवण्यासाठी हेतुपुरस्कर प्रयत्न केले जातात.विशिष्ट
वंशाच्या वर्चस्वाच्या आधारावर सत्तेवर आलेला गट इतर वंशियावर विविध प्रकारचे
बंधने लागत असते. त्यात पोशाख, आहार-विहार, धार्मिक प्रार्थना बाबत नियम इत्यादी गोष्टी सरकार मार्फत निश्चित
केल्या जातात.
वांशिक
लोकशाहीचे परिणाम- वांशिक लोकशाही व्यवस्थेत अप्रत्यक्ष स्वरूपात बहुसंख्यांक
संस्कृतीचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अल्पसंख्यांक वांशिक
गटासोबत समान आणि न्यायपूर्ण व्यवहार केला जात नाही. सार्वजनिक जीवनात
अल्पसंख्यांक गटांना ज्या प्रमाणात स्वतंत्रता आणि स्वायतत्ता प्रदान केली जात
नाही. परिणामत: अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक घटकांमध्ये तणाव किंवा अविश्वासाचे
वातावण निर्माण होते. अल्पसंख्यांक समाजाच्या राष्ट्रनिष्ठेवर शंका उपस्थित केल्या
जातात.त्यांना राजकीय परिघाबाहेर करण्याची प्रकिया सुरु केली जाते. त्याच्यावर
अनेक बंधने लादली जातात. लोकशाही व्यवस्थेत बहुमताला महत्त्व असले तरी बहुमतासोबत अल्पसंख्यांक
घटकांना देखील महत्वपूर्ण स्थान दिले जाते. अल्पसंख्यांकांच्या अधिकार
संरक्षणासाठी त्यांना राष्ट्रीय जीवनात समान स्थान देणे;
सांस्कृतिक आधारावर काही सवलती देणे आवश्यक असते परंतु सांस्कृतिक आधारावर
दिलेल्या सवलतीचा वांशिक लोकशाहीत काढून घेतल्या जातात आणि बहुसंख्याकांचे
सांस्कृतिक वर्चस्व लादण्याचा प्रयत्न आहे केला जातो. हा प्रयत्न भारतीय लोकशाही
व्यवस्थेत अस्थिरता निर्माण करू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.