https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

Tahsildar तहसीलदार-पात्रता, परीक्षा स्वरूप, अधिकार आणि कार्य


 तहसीलदार-

  • महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक ‘तहसीलदार’ नेमला जातो.
  • तहसीलदारालाच ‘मामलेदार’ असेही म्हटले जाते.
  • तहसीलदार गट ‘अ’ प्रकारचे पद आहे. तहसीलदार हा तालुक्यातील प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरतो. तहसील कार्यालय पूर्णपणे त्याच्या हाताखाली काम करते.
  • जिल्ह्यात जे स्थान जिल्हाधिकाऱ्याला असते. ते स्थान तालुक्यात तहसीलदाराचे असते.
  • तहसीलदार नेमणूक व पात्रता-तहसीलदार पदावर सरळ सेवा भरती आणि बढतीच्या मार्गाने नेमणूक होत असते.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची
  • तहसीलदार पदी नेमणूक केली जात असते.
  • नायब-तहसीलदार पदावर दहा ते पंधरा वर्षे सेवा केल्यानंतर बढती द्वारे किंवा विभागीय परीक्षादेऊन तहसीलदार बनता येते.
  • तहसीलदार पदासाठी परीक्षा देण्यासाठी पदवी असणे अनिवार्य असते. पदवीच्या शेवटच्या वर्षालाअसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. परंतु मुलाखतीच्या आधी पदवी प्राप्त करणे आवश्यकअसते.
  • परीक्षा देण्यासाठी खुला प्रवर्ग-18 ते 38, मागास प्रवर्ग-18 ते 43 अपंग-18 ते 45
  • तहसीलदार परीक्षा स्वरूप- परीक्षा तीन टप्प्यात होते.
  • पूर्व परीक्षा-400 गुणासाठी दोन पेपर असतात. पहिला पेपर सामान्य ज्ञान 200 गुण तर दुसरा पेपर200 गुण C-CAT चा असतो.
  • पहिला पेपरात चालू घडामोडी, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह,भारताचा स्वातंत्र्य लढा, भूगोल - महाराष्ट्र, भारत आणि जग, भारताचे संविधान, पंचायती राज,शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, अर्थशास्त्र - सामाजिक विकास, दारिद्रय आणि बेरोजगारी,पर्यावरण परिसंस्था, जैवविविधता आणि सामान्य विज्ञान या विषयावर बहुपर्यायी प्रश्न प्रश्नविचारले जातात.
  • दुसरा पेपरात तर्कशक्ती, निर्णय क्षमता, सामान्य बुद्धिमापन चाचणी, अंकगणित (दहावी स्तर),मराठी आणि इंग्रजीमधील सुसंवाद कौशल्य, व्याकरणावर बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.
  • तहसीलदार अधिकार व कार्य-
  • जमीन महसुलाची वसुली करणे. जमीन महसूलाबाबतचा कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोरयेतो. त्यावर त्याने योग्य निर्णय घेतल्यावरच तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो.
  • पिकांची आणेवारी काढणे आणि आणेवारीच्या आधारेच दुष्काळाची स्थिती जाणून घेऊन त्याचीघोषणा केली जाते.
  • सरकारने निश्चित केलेली नुकसानभरपाई तहसीलदाराच शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतो.
  • गौण खनिजांचे उत्खनन करण्याची परवानगी देणे. बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करणे.
  • स्वस्त धान्य दुकानांवर देखरेख ठेवणे व काळाबाजार रोखणे
  • तालुका दंडाधिकारी म्हणून देखील काम पाहणे.
  • नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना मार्गदर्शन करणे.
  • आपल्या कार्याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करणे.
  • तालुक्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे त्वरित सादर करणे.
  • जिल्हाधिकारी वा सरकारने घोषित कलेली मदत गरजू पर्यंत पोचवणे.
  • महत्त्वपूर्ण अधिकारी आणि सनदी सेवक
  • उपजिल्हाधिकारी
  • गटविकास अधिकारी
  • तलाठी
  • पोलीस पाटील
  • तहसीलदार Video You Tube link


  • https://www.youtube.com/watch?v=y47t0VtX8R0&t=111s

1 टिप्पणी:

If you have any donuts. Lets me Know.