पोलीस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहाय्यक परीक्षेचे स्वरूप-
• पोलीस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयीन सहाय्यक या तिन्ही पदांसाठी परीक्षेचे स्वरूप जवळपास सारखे आहे.
• मंत्रालयीन सहाय्यक पदासाठी मुलाखत नसते. लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर नियुक्ती दिली जाते.
• पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आवश्यक असते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने पदवी प्राप्त करणे आवश्यक असते.
• परीक्षेचे स्वरूप-
• परीक्षा देण्यासाठी खुल्या वर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 38 दरम्यान आणि राखीव संवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 43 दरम्यान असणे आवश्यक असते.
• परीक्षेची एकूण तीन टप्पे असतात.
• पूर्व परीक्षा- पूर्व परीक्षा एकूण 100 गुणांची असते. परीक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी असते. कालावधी एक तासाचा असतो. बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास भूगोल, नागरिक शास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धीमत्ता व अंकगणित इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले जातात.
• मुख्य परीक्षा- मुख्य परीक्षेत दोन पेपर असतात.
• भाषा पेपर एक- या पेपर मध्ये मराठी भाषेवर साठ प्रश्न आणि इंग्रजी भाषेवर 40 प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न विचारले जातात. प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. प्रश्न सोडवण्याचा कालावधी एक तासाचा असतो
• इंग्रजी व मराठी भाषेतील सर्वसामान्य शब्द, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा उपयोग, उताऱ्यावरील प्रश्न, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द इत्यादी बद्दलचे प्रश्न विचारले जातात.
• सामान्य ज्ञान पेपर दुसरा- या पेपर मध्ये पदवीधर पर्यंतचे 100 गुणांसाठी शंभर प्रश्न विचारले जातात. प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. प्रश्न सोडवण्यासाठी एक तासाचा कालावधी दिला जातो. इंग्रजी व मराठी भाषेतून प्रश्न सोडवता येतात.
• चालू घडामोडी,बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास,भूगोल, भारतीय राज्यघटना, संगणक व माहिती तंत्रज्ञान,प्रशासन,न्याय मंडळ, जिल्ला आणि स्थानिक प्रशासन इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले जातात.
• विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालय सहाय्यक पदासाठी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान ऐवजी लेखाकर्म विषयावर प्रश्न विचारले जातात.
• पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 200 गुणांची शारीरिक चाचणी असते.या चाचणीत 100 गुण मिळणे आवश्यक असते. शारीरिक चाचणीत गोळा फेक,पुलप्स, धावणे,चालणे आणि लांब उडी चा समावेश असतो.पुरुष उंची165 से.मी. आणि छाती न फुगवता 84से.मी. महिला उंची 157 से.मी.
• विक्रीकर निरीक्षक पदासाठी पन्नास गुणांची मुलाखत असते. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 75 गुणांची मुलाखत असते. मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या एकत्रित गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातात. मुलाखतीत उमेदवारांची निर्णयक्षमता,प्रसंगावधान,व्यक्तिमत्व, आकलन क्षमता, समस्या निवारण क्षमता आणि उमेदवाराच्या पार्श्वभूमीची बद्दलचे प्रश्न विचारले जातात.
•

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.