https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

गटविकास अधिकारी Block Development Officer


 

गटविकास अधिकारी
Block Development Officer

       गटविकास अधिकारी हे राजपत्रित वर्ग एक आणि वर्ग दोन दर्जाचे पद आहे.

       गटविकास अधिकारी पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव आणि कार्यकारी प्रमुख असतो.

       गट विकास अधिकारीची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केले जाते.

       विस्तार अधिकारी यांना पदोन्नती देऊन गट विकास अधिकारी पदी नेमले जाते.

       गट विकास अधिकारी तहसीलदार पदाचे समकक्ष पद आहे.

       गट विकास अधिकारी पात्रता परीक्षा-

       गटविकास अधिकारी पदावर नेमणूक होण्यासाठी राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

       या परीक्षेसाठी उमेदवार पदवीप्राप्त असणे आवश्यक असते.

       वय- अमागास प्रवर्ग-18 ते 38, मागास प्रवर्ग-18 ते 43

       राज्यसेवा परीक्षा तीन टप्प्यात होते.

       पूर्व परीक्षा- पूर्व परीक्षेत दोन पेपर असतात. पहिला पेपर सामान्य ज्ञान आणि दुसरा पेपर C-SAT चा असतो. दोन्ही पेपर 200 मार्कांचे असतात. प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाची असतात. निगेटिव्ह मार्किंग असते. तीन प्रश्न चुकले एक मार्क कमी होतो.

       मुख्य परीक्षा- मुख्य परीक्षेत एकूण सहा पेपर असतात. मुख्य परीक्षा 800 गुणांची असते. पहिले दोन पेपर 100 गुणांचे आणि उरलेले चार पेपर 150 गुणांची असतात.पहिला पेपर वर्णनात्मक आणि उरलेले पेपर बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. पूर्वपरीक्षेत प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते.

       मुलाखत- मुलाखत हा अंतिम टप्पा असतो. लेखी परीक्षा आणि मुलाखत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवर्ग आणि त्यांनी निवडलेल्या पदानुसार नेमणूक करण्याची शिफारस आयोग राज्य शासनाकडे करतो.

       गट विकास अधिकारी पदी निवड लोकसेवा आयोग करतो तर नेमणूक राज्य शासन करत असते.

       गटविकास अधिकारी अधिकार कार्य-

       महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम1961 कलम 19 नुसार प्रत्येक गटासाठी एक गट विकास अधिकारी नेमला जातो.

       पंचायत समितीच्या बैठकीत उपस्थित राहून कामकाजाचे इतिवृत्ताचे नोंद घेणे.

       पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

       गट विकास अधिकारी हा स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिव असतो.

       पंचायत समितीच्या कामकाजाबाबत चे कागदपत्रे दस्तऐवज आपल्या ताब्यात ठेवणे.

       पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मार्गदर्शन करणे.

       अनुदानाची रक्कम विकास कार्यावर खर्च करणे. पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करणे.

       राज्यशासन जिल्हा परिषदेकडून आदेशाची अंमलबजावणी करणे. राज्य शासन पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समिती यात दुवा म्हणून काम पाहणे.

       सभापतीच्या मार्गदर्शनाखाली विकास गटासाठी विकास आराखडा तयार करणे.

       गट अनुदानातून हाती घेण्यात आलेल्या वा राज्य शासनाच्या आदेशाने विकास योजना राबवण्यासाठी मालमत्ता संपादन, विक्री हस्तांतरणास मंजुरी देणे.

       पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून विवरण, हिशोब आणि अहवाल मागविणे.

राज्यसेवा परीक्षा YouTube Video Link             

     


 
 https://www.youtube.com/watch?v=RDHqSsZW_M8&t=169s

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.