https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

ग्रामसभा Gram Sabha


 

ग्रामसभा-

       भारतात प्राचीन काळापासून ग्रामसभेचे अस्तित्व दिसून येते.

       मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 6 मध्ये ग्रामसभेचा उल्लेख आहे. कलम 7 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभेची स्थापना करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत असलेल्या प्रत्येक गावात ग्रामसभा स्थापन करण्याची वैधानिक बंधन शासनावर आहे. घटनादुरुस्तीने ग्रामसभांना घटनात्मक मान्यता दिली आहे.

       ग्रामपंचायत अधिनियम कलम 186 (1) नुसार ग्रामसभेत गावातील सर्व प्रौढ स्त्री-पुरुष नागरिकांचा समावेश होतो.

       ग्रामसभा बैठक-

       ग्रामसभेची बैठक बोलविण्याचा अधिकार सरपंचाला असतो. सरपंचाचे अनुपस्थित उपसरपंच ही जबाबदारी पार पाडतो.

       ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय किंवा चावडीवर बोलवले जाते.

        वर्षातून कमीत कमी चार ग्रामसभा बोलणे आवश्यक असते. पहिली ग्रामसभा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यात,दुसरी ग्रामसभा 15 ऑगस्ट, तिसरी ग्रामसभा नोव्हेंबर महिन्यात  आणि चौथी ग्रामसभा 26 जानेवारीला बोलवले जाते. याशिवाय पंचायत समिती, स्थायी समिती   आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने ग्रामसभा बोलावली जाते.

       ग्रामसभा गणसंख्या-

       ग्रामसभा बैठकीची सूचना सात दिवस आधी देणे आवश्यक असते. बैठकीची सूचना ग्रामपंचायत कार्यालयावर लावावी. बैठकीच्या  विषय पत्रिकेचा सूचनेत उल्लेख करावा. बैठकीबाबत गावात दवंडी द्यावी.

        ग्रामसभेत गणपूर्तीसाठी एकूण मतदारांपैकी  15 टक्के किंवा  100  यापैकी जी संख्या कमी असेल इतके मतदार हजर असणे आवश्यक असते.

       कोरम पूर्ण न झाल्यास सभा तहकूब करावी लागते. सभा तहकूब करताना पुढच्या सभेची तारीख व वेळ अध्यक्ष जाहीर करतो.

       ग्रामसभा बैठकीचा अहवाल  बैठक समाप्त झाल्यानंतर सात दिवसाच्या आत जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवावा

       ग्रामसभेचा अध्यक्ष-

       सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच आणि दोघांच्या अनुपस्थित उपस्थित सदस्यापैकी एकाची अध्यक्ष निवड करतात.

       अध्यक्ष मागील बैठकीचा इतिवृत्त वाचून दाखवणे, गणसंख्या अभावी सभा तहकूब करणे, ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे. आयत्या वेळचे ठराव चर्चेस घेणे व नाकारणे, ग्रामपंचायतीचे शोभा व कार्याची माहिती देणे, सभेत बोलण्याची वेळ निश्चित करून देणे आणि सभेवर नियंत्रण ठेवणे इत्यादी कार्य करत असतो.

       ग्रामसभेची कार्य-

       ग्रामसभेत वार्षिक जमाखर्च, मागील वर्षाचा कामकाज  अहवाल, चालू वर्षातील कामाचे नियोजन आणि मागील वर्षाची  लेखापरीक्षण टिपणे सगळे ठेवावी लागतात.

       ग्रामपंचायतीकडून राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना ग्रामसभेची मान्यता घेतली जाते.

       विकास कार्यावर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेत ठेवला जातो.

       केंद्र आणि राज्य योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची यादी सभेत मांडली जाते.

       गौण खनिज आणि वन उत्पादनाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो.

       मादक द्रव्य आणि दारूबंदी बद्दलचा ठराव ग्रामसभेत म्हणता येतो.

       जल,जमीन,जंगल आणि भूमी वापराबाबत ग्रामसभेची परवानगी आवश्यक असते.

       ग्रामपंचायत कायद्याने सोपवलेल्या कामांची संबंधित विषय ग्रामसभेत मांडता येतात.

       दारिद्र्याची यादी, जेव्हा रोजगार योजनेतून हाती घ्यायची कामे आणि ग्राम शिक्षण समिती सदस्य निवड इत्यादी विषय ग्रामसभेत मांडता येतात.

       पंचायत समिती, जिल्हा परिषद स्थायी समिती मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य शासनाने सुचवलेले विषय ग्रामसभेत मांडले जातात.

       ग्रामसभेचे मूल्यमापन-

       गावाच्या विकास कार्यात ग्रामस्थांना सहभागी करून घेण्यासाठी ग्रामसभा उपयुक्त असते परंतु सरपंच अनेकदा ग्रामसभा बोलविण्याची चूक नसतात.

       निरक्षरता व दारिद्र्यामुळे लोक ग्रामसभेत उपस्थित राहत नाही.

       ग्रामसभेत मांडलेल्या सूचना गंभीरतेने अमलात आणल्या जात नाही.

       ग्रामसभेसाठी निवडलेल्या स्थळ वेळ अनेकदा योग्य नसते.

       ग्रामसभेचा वापर राजकीय करण्यासाठी केला जातो.

       अनेकदा औपचारिकता म्हणून ग्रामसभा बोलावली जाते.



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.