https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

मतदार वर्तनावर प्रभाव पाडणारे घटक


 मतदार वर्तनावर प्रभाव पाडणारे घटक-

मतदान हा राजकीय सहभागाचा सर्वात सोपा प्रकार आहे. समाजातील जास्तीत जास्त लोकांचा राजकीय सहभाग मतदाना पुरता मर्यादित असतो. मतदान या राजकीय सहभागाच्या प्रकाराचे शास्त्रशुद्धपणे मोजमाप आणि विश्लेषण करता येते. मतदान प्रक्रियेत बद्दल जगातल्या अनेक देशात विविध प्रकारच्या अभ्यास करण्यात आलेले आहेत. या अभ्यासाच्या आधारावर मतदार वर्तनाला पुढील घटक प्रभावित करीत असतात.

1. कुटुंब-

कुटुंब हा मतदार वर्तनावर प्रभाव टाकणारा महत्वपूर्ण घटक मानला जातो. भारतासारख्या देशात अनेक मतदार कुटुंब प्रमुखाचे इच्छेनुसार मतदान करत असल्याचे आढळून येते. प्राध्यापक वि..सिरसीकर यांनी केलेल्या अध्ययनात अल्पसंख्यांक समाजातील मतदारांवर कुटुंबाचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. वर्मा व नरेश यांनी राजस्थान मधील चार जिल्ह्यातील मतदारांचा अभ्यास करताना असे आढळून आले की, कुटुंबातील स्त्रिया कुटुंब प्रमुखाचे इच्छेनुसार मतदान करतात. अनेक मतदारांवर पक्षाच्या विशिष्ट धोरणापेक्षा विशिष्ट पक्षाशी कुटुंबाची बांधीलकी मतदानासाठी प्रेरित करत असते.

2. वर्ग-औद्योगिकीकरण व नागरीकरण झालेल्या समाजात वर्ग हा घटक मतदार वर्तनाला प्रभावित करत असतो. प्रगत समाजात राजकीय संघर्ष वर्ग संकल्पनेद्वारे व्यक्त होत असतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल समुदाय डाव्या विचारसरणीला तर आर्थिक दृष्ट्या सधन उजव्या विचारधारेशी संबंधित राजकीय पक्षाला मत देतात. वर्ग संकल्पनेच्या माध्यमातून आर्थिक हितसंबंध साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये कामगार व कनिष्ठ मध्यमवर्गातील लोक मजूर पक्षाला तर उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत हुजूर पक्षाला पाठिंबा देतात. अर्थात वर्ग आणि राजकीय पक्षांना दिला जाणारा पाठिंबा तू संगत असेलच असे नाही. कारण अनेकदा मतदारांवर वर्गणी पेक्षा इतर घटकांचा जास्त प्रभाव पडतो.

3. जात व धर्म-

भारतासारख्या देशात मतदार वर्तनावर जातीचा प्रभाव पडतो. त्यामुळे राजकीय पक्ष देखील उमेदवारी देताना मतदार संघातील जातीय गटाचे प्रॉब्लेम लक्षात घेतात. जातीच्या आधारावर मतदान करण्याची प्रवृत्ती लक्षात घेऊन उमेदवारी देण्यापासून हे महत्वपूर्ण राजकीय पद्धत देण्यापर्यंत जातीचा विचार करतात. जाती सोबत धर्म हा घटक देखील मतदार वर्तनाला प्रभावित करतो. धर्माच्या आधारावर समाजात परस्परविरोधी गट निर्माण होतात. या गटांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष धार्मिक भावनांचा उपयोग प्रचारात करत असतात. उदाहरणार्थ भाजपची हिंदुत्वाची संकल्पना

4. वय व अनुभव-

वय हा घटक मतदार वर्तनाला प्रभावित करतो. कारण विविध वयात व्यक्तीची मानसिकता वेगवेगळी असते. तरुण वयात व्यक्ती क्रांतिकारी आदर्शवादी असतो.  तरुण भावनेच्या आधारावर मतदान करतात.तरुण मतदार अशा मूल्यांना महत्त्व देणाऱ्या पक्षाला पाठिंबा देतात याउलट प्रौढ व उतारवयातील व्यक्ती राजकीय अनुभवाच्या आधारावर मतदान करतात.

5. नेतृत्व-मतदाराच्या वर्तनाला प्रभावित करण्यात नेतृत्वाचा फार मोठा वाटा असतो. नेतृत्वाची व्यक्तिमत्व आणि त्याच्याकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावर तो मतदारांना प्रभावित करत असतो. त्यामुळे राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे आहे हे लक्षात घेऊन जनता मतदान करत असते. उदाहरणार्थ भाजपला नरेंद्र मोदी सारखा प्रभावी नेता मिळाल्यामुळे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला दणदणीत बहुमत प्राप्त झाले.

6. मूल्ये आणि विचारसरणी-

व्यक्तीच्या मतदान निर्णयावर मूल्ये आणि विचारसरणीचा प्रभाव पडत असतो. बहुसंख्य मतदार मूल्य आणि विचारसरणीच्या आधारावर राजकीय निर्णय घेत असतात. समाजात मूल्ये आणि विचारसरणी विषयक संघर्ष तीव्र झाला असेल तर या घटकाचा प्रभाव जास्त पडतो. परंतु सर्वसाधारण परिस्थितीत मूल्ये आणि विचारसरणी पेक्षा दैनंदिन जीवनातील प्रश्नांचा मतदारांवर जास्त प्रभाव पडत असतो.

7. मतदारांमधील भेद-

मतदारांमधील श्रीमंत-गरीब, वरिष्ठ कनिष्ठ, ग्रामीण शहरी या भेदाचा मतदार वर्तनावर प्रभाव पडत असतो. ग्रामीण भागातील मतदार गटनेत्यांच्या इच्छेने मतदान करतात तर शहरी भागात स्वतंत्रपणे मतदान करण्याची प्रवृत्ती जास्त दिसून येते. मतदारांतील साक्षर निरक्षर भेद देखील मतदार वर्तनाला प्रभावित करतो. निरक्षर व्यक्ती भावनांना लवकर बळी पडतो आणि अनेकदा भावनेच्या आधारावर मतदान करतो या उलट सुशिक्षित मतदार विचारपूर्वक मतदान करतो.

8. संपत्ती- संपत्ती हा घटक देखील मतदार वर्तनाला प्रभावित करतो. श्रीमंत लोक भांडवलशाहीला पूरक विचारधारा असलेल्या असलेल्या पक्षाला पाठिंबा देतात तर गरीब लोक समता प्रस्थापित करण्याची भाषा करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देतात. तसेच भारतासारख्या देशात निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जातात. पैशाच्या प्रभावाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोक पैसे आणि भेटवस्तू देणाऱ्या उमेदवारांना मतदान करताना दिसतात.

9. प्रचार मोहीम

प्रचार मोहिमेचा देखील मतदार वर्तनावर प्रभाव पडत असतो. प्रचाराची शैली, प्रचारात वापरली जाणारी तंत्रे आणि प्रचारातील नेतृत्वाचा सहभाग इत्यादींचा परिणाम मतदा निर्णयावर होत असतो. उदाहरणार्थ 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकून अनेक मतदारांनी मतदान विषयक निर्णय घेतल्याचे दिसून येते. अर्थात मतदाराची आर्थिक परिस्थिती, सामाजिक दर्जा आणि शैक्षणिक पातळी उंच असलेल्या मतदारांवर प्रचार मोहिमेचा फारसा फरक पडत नाही. परंतु कनिष्ठ आर्थिक परिस्थिती, कमी शिक्षण असलेल्या मतदारावर प्रचार मोहिमेचा फार फरक पडतो कारण हे मतदार फार उशिरा मतदान निर्णय घेतात त्यामुळे प्रचार काळात घडलेल्या घटनांचा प्रभाव त्यांच्यावर जास्त पडतो.

10. सामाजिक स्थित्यंतराचा प्रभाव

सामाजिक स्थित्यंतराचा मतदार निर्णयावर प्रभाव पडत असतो. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत झालेल्या बदलाचा देखील मतदार निर्णयावर प्रभाव पडतो.सांपत्तिक आणि शैक्षणिक दृष्ट्या उच्च वर्गात गेलेली व्यक्ती आपला पूर्वीचा दर्जा आणि त्याच्याशी संबंधित वागणूक वैशिष्ट्ये विसरण्याचा प्रयत्न करते. आपले राहणीमान, शेजारी मित्र बदलते. त्यामुळे अशी व्यक्ती उच्च वर्गाला अनुकूल निर्णय घेते. आर्थिक परिस्थिती आणि राहणीमानातील बदलाचा फायदा उजव्या विचारसरणीच्या आणि परंपरावादी पक्षाला जास्त फायदा मिळतो.

11. राजकीय परिस्थितीत बदल-

राजकीय परिस्थितीत झालेल्या बदलाचा देखील मतदार वर्तनावर प्रभाव पडत असतो. राजकीय पक्षात पडलेली फूट, कमजोर नेतृत्व, पक्षाची भ्रष्ट बनलेली प्रतिमा इत्यादी कारणामुळे पक्षाला वर्षांनुवर्षे मते देणारे मतदार दुसऱ्या पक्षाला मतदान देतात. उदाहरणार्थ काँग्रेस पक्षाकडे असलेले समर्थन नेतृत्वाचा अभाव आणि घसरलेल्या प्रतिमेमुळे पक्षाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेला दिसतो.

    अशा पद्धतीने मतदार निर्णयावर वरील घटकांचा प्रभाव पडतो. अर्थात मतदारावर एकाच घटकाचा प्रभाव पडत नाही अनेकदा एकापेक्षा जास्त घटकाच्या प्रभावाने मतदार मतदान विषयक निर्णय घेत असतो.



विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt

प्रशासनhttps://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera)

https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse)

 Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.