https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

इसाया बर्लिन यांचे स्वातंत्र्यविषयक विचार


 

इसाया बर्लिन यांचे स्वातंत्र्यविषयक विचार

२० व्या शतकात जागतिक कीर्तीचे विचारवंत इसाया बर्लिन यांनी आपल्या of Liberty' ग्रंथात स्वातंत्र्य संकल्पनेचे सविस्तर विवेचन Two Concepts केलेले आहे. स्वातंत्र्याचे सकारात्मक आणि नकारात्मक हे दोन अर्थ सांगितलेले आहेत. उदार व्यक्तीवादी परंपरेने सांगितलेल्या नकारात्मक स्वातंत्र्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बर्लिनच्या मतानुसार स्वातंत्र्य हे व्यक्तित्व आणि बहुविविधता या दोन गोष्टीशी संबंधित आहे. बहुविविधता ही नैसर्गिक व वैचारिक विविधतेवर आधारलेली संकल्पना आहे. प्रत्येक माणूस निसर्गत:च भिन्न असून प्रत्येकाचे आचार, विचार, क्षमता भिन्न असतात. चांगले जीवन घडविण्याचे अनेक विचार वा पर्याय व्यक्तीला उपलब्ध असतात. त्या पर्यायातून योग्य पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. व्यक्तीच्या निवड प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप वा अडथळा नसणे म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय. नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे कर्त्यांला कृती करण्याची मोकळीक असणे किंवा दुसरी व्यक्ती वा व्यक्तीगटाकडून कृतीमध्ये हस्तक्षेप नसणे होय." "In am sleve to no man" असे म्हणतो. व्यक्तीच्या कृतीत कोणत्याही बाह्य घटकांचा हस्तक्षेप बर्लिन अमान्य करतो. इतर व्यक्ती वा राज्य यांचा देखील हस्तक्षेप असणार नाही. खऱ्या स्वातंत्र्याची प्राप्ती व्यक्ती-व्यक्तीतील परस्परसंबंध व सृजनात्मक कार्यातून प्राप्त होत असल्यामुळे ते बंधनविरहित असणे योग्य ठरते.

     बर्लिन सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट करताना "I am my own master" तत्त्वाला प्राधान्य देतो. व्यक्ती हा स्वतःच्या जीवनाचा मालक किंवा स्वामी आहे. व्यक्तीला आपला विकास घडवून आणण्यासाठी पर्याय निवडीचे स्वातंत्र्य असते. या स्वातंत्र्याच्या आधारावर व्यक्ती आपला विकास घडवून आणते. व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपोआप राज्यावर येते. व्यक्तीच्या विकासासाठी सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करून देणे हे राज्याचे कर्तव्य ठरते. याचा अर्थ माणूस जोपर्यंत कोणाचाही गुलाम नसतो. त्यांचे निर्णय व जीवन स्वतः निर्धारित केलेले असते आणि तो कोणत्याही प्रकारच्या बाह्य शक्तीवर अवलंबून नसतो, स्था प्रमाणात तो स्वतंत्र असतो. या परिस्थितीत व्यक्तीला स्वतःचे ध्येय साध्य करावयाचे असते. ते पूर्ण करण्यामागील कारणे व प्रभाव बाहेरून कोणीही • लादलेले नसतात. तो स्वतः निर्णय घेणारा आणि दिशा देणारा कर्ता असल्यामुळे स्वतःच स्वतःचा स्वामी असतो तेव्हा तो सकारात्मक स्वातंत्र्याचा उपभोग धन असतो. सकारात्मक स्वातंत्र्याची निवड करणारा व्यक्ती हा स्वायत्त व स्वयंनिर्णयक्षम असतो स्वतःच्या कृतीबद्दल वा निवडीबद्दल तोच उत्तरदायी असतो. स्वतःच्या विचार व कृतीबद्दल स्वत:च्या विचाराने स्पष्टीकरण देत असतो तीच व्यक्ती सकारात्मक स्वातंत्र्याचा खरा उपभोग घेते असे बर्लिन मानतो. सकारात्मक स्वातंत्र्याचा संबंध व्यक्तीच्या क्षमता, गुणधर्म आणि तिला उपलब्ध असलेली साधनसंपत्ती आणि संधीवर अवलंबून असते. या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी आवश्यक साधनसंपत्ती व संधी हे राज्याची जबाबदारी असते.

 बर्लिन स्वातंत्र्य संकल्पनेची काही लक्षणे वा वैशिष्ट्ये-

पुढीलप्रमाणे सांगता येतात.

 ·      नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला पर्याय निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य वा पर्याय निवडीवर बंधनाचा अभाव असणे होय. पर्याय निवडीत हस्तक्षेप झाल्यास स्वहिताची जाणीव होऊन आपल्या जीवनाचा मार्ग स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य असणे. नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे बाह्य अडथळ्यांची अनुपस्थिती असणे होय.बर्लिन यांनी मांडलेली नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना पारंपरिक उदारमतवादातील मुक्त व्यक्ती व व्यक्तिवाद्यातील व्यक्तिस्वातंत्र्य संकल्पनेशी जुळणारी आहे. नकारात्मक स्वातंत्र्यात शासन किंवा समाजातील इतर व्यक्ती वा संस्थांच्या दडपणापासून व्यक्ती पूर्णपणे मुक्त असणे.नकारात्मक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी व्यक्ती कृतिशील असेल तर सुरक्षित राहू शकते.

 ·      सकारात्मक स्वातंत्र्य व्यक्तीकडे उपलब्ध असलेली साधनसंपत्ती आणि संधीवर अवलंबून असते.सकारात्मक स्वातंत्र्य अंतर्गत अडथळ्यांवर मात करण्याची प्रवृत्ती यावर आधारित असते. सकारात्मक स्वातंत्र्य हे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मूल्य ठरू शकते, परंतु त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते.

    अशा प्रकारे बर्लिन यांनी व्यक्तिविविधतेवर भर देणारा स्वातंत्र्याचा अर्थ गृहीत मानलेला आहे. इसाया बर्लिन यांनी सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्याचे विश्लेषण केलेले असले तरी त्यावर अनेक आक्षेप घेतलेले जातात. नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे बाह्य अडथळ्यांची अनुपस्थिती आणि सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे अंतर्गत अडळ्यांवर केली जाणारी कृतिशील मात असा फरक तो करतो. परंतु या घटकांच्या आधारे स्वातंत्र्य संकल्पनेतील फरक समजून घेताना अनेक अडचणी जाणवतात. सकारात्मक स्वातंत्र्याच्या मर्यादा विशद करताना बर्लिन स्वतः सांगतो की, माणूस हा स्वतःचा स्वामी आहे हे सकारात्मक स्वातंत्र्यात अभिप्रेत केले जात असले तरी माणूस निसर्गशक्तीला शरण जातो. वासनांच्या आहारी जातो तेव्हा त्यातून बाहेर काढण्यासाठी सक्ती करावी लागते. याचा अर्थ बर्लिनच्या विचारात वैचारिक विसंगती आढळून येते. सकारात्मक व नकारात्मक स्वातंत्र्य हे स्वातंत्र्याचे बर्लिन यांनी केलेले वर्गीकरण प्रत्यक्षात अशक्य व अग्राह्य आहे. कारण स्वातंत्र्य हे शेवटी स्वातंत्र्य असते ते नकारात्मक किंवा सकारात्मक नसते. बर्लिनच्या विचारांवर काही अभ्यासकांनी टीका केलेल्या असल्या तरी २० व्या शतकाच्या परिस्थितीनुसार स्वातंत्र्य संकल्पनेचे विश्लेषण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे बर्लिनचे योगदान कमी लेखता येणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.