लोकशाही व समाजवाद यांतील परस्परसंबंध वा समन्वय-
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतुःसूत्रीवर लोकशाहीची
संकल्पना आधारलेली आहे. व्यक्ती ही लोकशाहीचा केंद्रबिंदू मानली जाते.
व्यक्ती-जीवनाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण
लोकशाहीत मालमत्तेचा अधिकार आणि विभिन्न प्रकारचे स्वातंत्र्य देणे आवश्यक मानले
जाते. समाजवाद हा विचार खाजगी मालमत्तेच्या विरोधी आहे. मालमत्तेच्या अधिकारामुळे
विषमता निर्माण होते, असे तो मानतो. खाजगी मालमत्तेचा अधिकार
नष्ट करण्यासाठी उत्पादनाची सर्व साधने समाजाच्या मालकीची केली जावी, तरच समानता निर्माण होईल असे समाजवाद्याना वाटते. स्वातंत्र्याच्या जोरावर
समाजातील सबल लोक प्रगती करून • घेतात, तर दुर्बलांच्या
वाट्याला काहीही येत नाही, म्हणून समाजवादी
व्यक्तिस्वातंत्र्याला विरोध करतात. लोकशाही व्यक्तिस्वातंत्र्य मूल्याला सर्वाधिक
महत्त्व देते, तर समाजवाद हा समता मूल्याला सर्वाधिक महत्त्व
देतो. स्वातंत्र्य आणि समता ही परस्परविरोधी मूल्य आहेत. एकाच्या अंमलबजावणीतून
दुसन्यावर आघात होत असल्यामुळे लोकशाही आणि समाजवादाचा मेळ होणे शक्य नाही. असे
मानले जात होते.
समाजवाद व लोकशाही यांतील काही तत्त्वे एकमेकांच्या विरोधी दिसून येतात.
समाजवाद व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व देत नाही, तर लोकशाही व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व देते. लोकशाहीत
खाजगी मालमत्तेचा हक्क दिला जातो, तर समाजवाद खाजगी मालमना
नष्ट करण्याचा विचार मांडतो. लोकशाही आणि समाजवाद या दोन्ही विचारसरणीमध्ये काही
तत्त्वे परस्परविरोधी असली, तरी त्यात समन्वय निर्मितीचा
प्रयत्न आधुनिक काळात वेगाने सुरू आहे. ब्रिटन, भारत,
इतर अनेक देशांत लोकशाही व समाजवाद तत्त्वांमध्ये समन्वय साधण्याचा
प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीतील स्वातंत्र्य व समाजवादातील समता या परस्परविरोधी
तत्त्वांमध्ये लोकशाही समाजवादाच्या माध्यमातून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला
जातो. लोकशाही समाजवाद दुहेरी निष्ठा व्यक्त करणारे तत्त्वज्ञान आहे. एका बाजूला
स्वातंत्र्याला महत्त्व तर दुसऱ्या बाजूला समतेला महत्त्व दिले जाते. लोकशाही
समाजवादात स्वातंत्र्य आणि समता या दोन संकल्पना एकमेकांशी निगडित आहेत, असे मानले जाते. लोकशाहीत नैतिक प्रेरणा आणि मूल्य यांना महत्त्व असते,
तर समाजवादात भौतिकतेला महत्त्व असते. लोकशाही समाजवादात दोन्ही
गोष्टींना महत्त्व दिले जाते. पुढील मुद्द्यांच्या आधारावर लोकशाही आणि समाजवाद
विचारसरणीत समन्वय साधला जातो.
१) लोकशाहीत व्यक्ती - विकासाला महत्त्व असते. नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी
मूलभूत स्वातंत्र्य दिलेले असते. या स्वातंत्र्याचा उपयोग करून समाजातील बलवान घटक
आर्थिक, राजकीय सत्ता हस्तगत करतात.
लोकशाहीतील स्वातंत्र्यामुळे सत्ता व संपत्तीचे केंद्रीकरण झाल्यामुळे सामाजिक व
आर्थिक विषमता निर्माण होते. ही विषमता नष्ट करण्यासाठी लोकशाही असलेल्या देशांनी
समता तत्त्वाला प्राधान्य देऊन, स्वातंत्र्यावर नियंत्रण
ठेवण्यासाठी लोकशाही समाजवाद विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे.
२) लोकशाहीत समानतेला महत्त्व असते. लोकशाहीत कायद्यासमोर सर्व व्यक्तींना समान
मानले जाते. सर्वांना समान अधिकार दिलेले असतात, पण प्रत्यक्षात या समानतेचा लाभ सर्व वर्गांना घेता येत नाही.
समाजातील बलवान वर्ग प्रकारच्या समानतेचा लाभ घेऊ शकतो. समाजात समता निर्माण
होण्यासाठी आवश्यक परिस्थिती असल्याशिवाय समता निर्माण होऊ शकत नाही. म्हणून
व्यवस्थेत समताप्रधान वातावरण व परिस्थिती निर्माण करण्यासाठी लोकशाही विचारसरणीला
समाजवादाची जोड दिली जाते. लोकशाही
३) लोकशाही ही संकल्पना फक्त राजकीय नसून ती जीवनप्रणाली मानली जाते.लोकशाहीला
जीवनप्रणालीचे स्वरूप प्राप्त करून द्यावयाचे असेल, तर ती समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. हे
सर्व आर्थिक समतेशिवाय शक्य नाही. म्हणून लोकशाहीला व्यापक पाया उपलब्ध करून
देण्यासाठी लोकशाहीला समाजवादाची जोड उपलब्ध करून दिली जात असते.
४) लोकशाहीत स्वातंत्र्य संकल्पनेला महत्त्व दिले जात असले, तरी कोणत्याही देशात अनिर्बंध स्वातंत्र्य
दिले जात नाही. १००% स्वातंत्र्य देणे लोकशाहीतही शक्य नाही. समाजहितासाठी
स्वातंत्र्यावर योग्य बंधने वा मर्यादा लादलेल्या असतात. लोकशाही समाजवादातही
कोणत्याही व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य दिले जात नाही. समाजाचा घटक या नात्याने
व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर समाजहितासाठी काही बंधने टाकली जातात, याचा अर्थ स्वातंत्र्य देण्यासही काही मर्यादा दिसतात. सर्व व्यक्ती
जन्मतः समान आहेत. या तत्त्वांच्या आधारावर समाजवादात समता निर्माण करण्याचा
प्रयत्न केला जातो. मात्र व्यक्तीमधील नैसर्गिक विषमता नष्ट करता येत नाही.
म्हणजेच समता प्रस्थापित करताना समतेवर मर्यादा येतात. १००% समता निर्माण करणे
शक्य होत नाही. स्वातंत्र्य आणि समता प्रस्थापित करताना येणाऱ्या अडचणी लक्षात
घेऊन लोकशाही समाजवादात समता व स्वातंत्र्य या तत्त्वांत समन्वय साधला जातो.
अशा प्रकारे लोकशाही समाजवादाचा क्रांतीवर विश्वास नाही. घटनात्मक मार्गाने
समाजवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. भारत, अमेरिका इ. देशांनी प्रखर मार्गाचा अवलंब न करता, शांततेच्या मार्गाने समाजवाद निर्माण केला. त्यात लोकशाहीतील चांगली
तत्त्वे व समाजवादातील चांगली तत्त्वे यांच्यात समन्वय करून लोकशाही समाजवादाची
निर्मिती केली. यावरून दिसते की, लोकशाही आणि समाजवाद यांत
परस्परविरोध नसून परस्पर समन्वय दिसून येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.