https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

लोकशाही समाजवाद विचारसरणीचा विकास


 

लोकशाही समाजवाद विचारसरणीचा विकास :-

इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीतून भांडवलशाहीचा उदय व विकास झाला. भांडवलशाहीच्या अविवेकी शोषणाची प्रतिक्रिया म्हणून समाजवाद विचारधारा निर्माण झाली. समाजवादी विचारधारा मांडणाऱ्या पहिल्या टप्प्यातील विचारवंतांनी भांडवलशाहीतून निर्माण झालेले शोषण व विषमता नष्ट करण्यासाठी नैतिक आणि वैधानिक मार्गाने समाजवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यात सेंट सायमन, फोरियन, रॉबर्ट ओवेन, सिस्मंडी इत्यादी प्रमुख विचारवंतांचा समावेश होता. समाजवादाची नैतिक आणि वैधानिक अंगाने मांडणी करणाऱ्या विचारवंतांना कार्ल मार्क्सने कल्पितादर्शवादी वा स्वप्नरंजक समाजवादी म्हटले. समाजवादाच्या दुसऱ्या टप्प्यात कार्ल मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधारावर समाजवादाची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला. आपल्या विचारांतील वेगळेपणा प्रदर्शित करण्यासाठी मार्क्सने समाजवादाऐवजी साम्यवाद हा शब्द वापरला. समाजवाद ही ऐतिहासिक अपरिहार्यता मानली. समाजवाद प्रस्थापित करण्यासाठी क्रांतीची आवश्यकता प्रतिप्रादित केली. मार्क्सच्या विचारांचा आधार घेऊन लेनिन यांनी रशियात क्रांती घडवून आणली.

    इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सने शास्त्रीय समाजवादाची मांडणी केली. परंतु इंग्लंडसारख्या संसदीय लोकशाहीची दीर्घ परंपरा लाभलेल्या देशात मार्क्सवाद रुजला नाही. मार्क्सवादातील क्रांतिकारी तत्त्वे इंग्लंडच्या कामगारांना मानवणारी नव्हती. वैधानिक आणि सनदशीर मार्गाने आपले हितसंबंध जपणाऱ्या जनतेला मार्क्सवादापेक्षा लोकशाहीशी जवळीक साधणाऱ्या समाजवादाविषयी आकर्षण जास्त होते. मार्क्सवादाला पर्याय म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या समाजवादी विचारधारा इग्लडच्या भूमीत अवतीर्ण झाल्या. उदा. फेबियन समाजवाद, व्यवसाय झाले. संघवाद. मात्र, या समाजवादी विचारसरणीला मर्यादित प्रमाणात यश लाभले. भांडवलशाहीच्या दोषातून मुक्त करणाऱ्या समाजवादाविषयी चिंतन सुरू चितनातून भांडवलशाहीतील दोषांना टाळून लोकशाही मार्गाने समाजवाद आणणारी लोकशाही समाजवादी विचारसरणी इंग्लंडमध्ये जन्माला आली. 

    लोकशाही समाजवादाने आपली वैचारिक बांधिलकी मार्क्सवादाशी न ठेवता मार्क्सपूर्व समाजवादाशी ठेवली.  मार्क्सपूर्व समाजवादी कल्पनारम्य जगात वावरणारे विद्वान नव्हते, तर भविष्याचा अदमास घेऊन व्यावहारिक मांडणी करणारे तत्त्वचिंतक होते. त्यांच्या विचारांना कालबाह्य मानून सोडून दिल्यास समाजवादी विचारांची अपरिमित हानी होईल, म्हणून त्यांच्या विचारांतील समकालीन काळात उपयुक्त ठरणारे विचार लोकशाही समाजवादाने स्वीकृत केले. भांडवलशाहीच्या दोषांची सर्वप्रथम ओळख करून देण्याचे कार्य मार्क्सपूर्व समाजवाद्यांनी केले होते हे कोणालाही विसरता येणार नाही. सिस्मंडी यांनी आर्थिक व्यक्तिवादावर टीका केली आणि भांडवलशाहीतील नफ्याद्वारे होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. सेंट सायमन यांनी खाजगी मालमत्तेच्या विभाजनाची शिफारस केली. संपत्तीच्या वारसा हक्काला विरोध केला. रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकार्यावर आधारित सहकारी तत्त्वांवर नवीन समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वतः भांडवलदार असूनही त्यांनी ‘न्यू लॅनार्क' ही आदर्श वसाहत निर्माण केली. या वसाहतीत कामगारांना आदर्श जीवन उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रयोग केले. या प्रयोगांमुळे त्यांना इंग्लंडमधील लोकशाही समाजवादाचे जनकदेखील म्हटले गेले. जी. डी. एच. कोलसारख्या अभ्यासकाने लुई ब्लॅकला लोकशाही समाजवादाचा खरा प्रर्वतक मानले आहे. त्यांनी सर्वप्रथम प्रातिनिधिक •लोकशाही आणि सहकारी समाजवादाचा पुरस्कार केला. बर्नस्टाइन यांनी 'Evolutionary .Socialism' या ग्रंथात क्रांतिकारक मार्गाने समाजवादी व्यवस्था स्थापन करता येईल, हा विश्वास व्यक्त केला. लोकशाही व्यवस्थेच्या अंतर्गत भांडवलशाही व्यवस्थेत सुधारणा करून समाजवाद प्रस्थापित करता येईल. इंग्लंडमधील बहुसंख्य समाजवादी विचारवंतांनी लोकशाही मार्गाने समाजवाद स्थापनेवर भर दिल्यामुळे लोकशाही समाजवादास पूरक वातावरण निर्माण झाले. इंग्लंडमधल्या लोकशाही समाजवाद विचारधारेवर एखाद्या विशिष्ट समाजवादी विचारवंताचा प्रभाव पडला असे मानता येणार नाही, असे प्रो. वुइल्यम इबेन्स्टिन यांनी म्हटले आहे. याचा अर्थ इंग्लंडमधील सर्वच समाजवादी विचारवंतांच्या प्रभावातून लोकशाही समाजवादाचा विकास झाला असे मानता येईल.

मार्क्स तत्त्वज्ञान इंग्लंडच्या भूमीवर फारसे रुजणार नाही, ही सुरुवातीपासून जाणीव असलेल्या सिडने वेब, श्रीमती वेब, आर. एच. टोनी, जी. डी. एच. कोल, बर्नाड शॉ, प्रा. हेरॉल्ड लास्की इ. विचारवंतानी फेबियन सोसायटीच्या माध्यमातून लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला. फेबियन समाजवादाचा विचार मध्यवर्गीयांना समाजवादाकडे आकर्षित करू शकला, परंतु श्रमिकांमध्ये फारसा लोकप्रिय होऊ शकला नाही. फेबियन समाजवादातील उणिवा लक्षात घेऊन इंग्लंडमधील मजूर पक्षाने आपल्या धोरण व कार्यक्रमात व्यापक बदल करून लोकशाही समाजवादास अनुकूल भूमिका घेतली. १९२१ साली आर. एच. टोनी यांनी प्रसिद्ध केलेल्या The Acquisitive Society' या ग्रंथामुळे लोकशाही समाजवादी तत्त्वज्ञानाला वैचारिक पाया उपलब्ध झाला. मध्ये डर्बिन यांचा The Politics of Democratic Socialism' असे म्हटले १९४० की, इंग्लंड लोकशाही समाजवादाच्या चौकटीत राहूनच आपले आर्थिक प्रश्न सोडवेल आणि राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक समतेच्या मागनि चालणाऱ्या नव्या समाजाची  निर्मिती करेल. जगाला नव्या मार्गावर घेऊन जाण्यासाठीचे आवश्यक नेतृत्व करेल. क्लेमंट ऍटलीनी स्पष्ट केले की, इंग्लंड मास्को किंवा बर्लिनच्या मार्गाने जाणार नाही, तर समाजवादी मार्गाने जाईल. इंग्लंडमध्ये भांडवलशाहीच्या विरोधातील वाढत्या असंतोषामुळे अनेक बुद्धिवान नागरिक मजूर पक्षात सहभागी होऊ लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये मजूर पक्षाची सत्ता आली. या पक्षाने लोकशाही समाजवादी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली. त्यास जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळाला. 

फ्रेंन्सिस बुइल्यम्य यांनी The Moral Case for Socialism' या ग्रंथात म्हटले की, लोकशाही समाजवादामुळे एकमेकांच्या सहकार्याने कार्य करून सहकार आणि सहजीवनापासून मिळणाऱ्या फायद्यापर्यंत पोहोचविण्याचे आणि माणसांच्या माणुसकीला जिंवत करणारे तत्त्वज्ञान म्हणून समाजवादाकडे पाहिले पाहिजे, समाजवादातील गुणांचा ऊहापोह दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वत्र होऊ लागला. इंग्लंडमध्ये लोकशाही समाजवादाच्या यशाने प्रभावित होऊन इंग्लंडच्या वसाहती असलेल्या भारत, अमेरिका व कॅनडा या देशांनी ही विचारसरणी स्वीकारली. क्रांतीच्या मार्गाऐवजी सनदशीर मार्गाने समाजवाद निर्माण होऊ शकतो, हे बहुसंख्य देशांना पटल्यामुळे आधुनिक काळात अनेक देशांनी लोकशाही समाजवाद स्वीकारला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.