लोकशाही समाजवाद अर्थ, मूलतत्त्वे वा वैशिष्ट्ये वा तत्त्वज्ञान
लोकशाही समाजवाद म्हणजे काय? :-
समाजवाद विचारसरणीची विविध रूपे वा प्रकार अस्तित्वात आहेत.
या विविध प्रकारांत लोकशाही आणि समाजवाद यांच्यात समन्वय प्रस्थापित करणारा
लोकशाही समाजवाद नावाचा समाजवादाचा नवा प्रकार इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर
उदयाला आला. या प्रकारात लोकशाहीतील चांगली तत्त्वे आणि समाजवादातील तत्त्वे यांचा
समन्वय आहे. समाजवादातील भौतिक प्रेरणा आणि लोकशाहीतील नैतिक प्रेरणेतून लोकशाही
समाजवादाची पायाभरणी केलेली आहे. लोकशाही समाजवादाची तत्त्वे व वैशिष्ट्ये निश्चित
करण्यात आली असली तरी त्यांची निश्चित व्याख्या करता येत नाही. कारण लोकशाहीच्या
अनेक व्याख्या आहेत. समाजवादाच्यादेखील अनेक व्याख्या आहेत. तसेच लोकशाही समाजवाद
विचार परिस्थितीप्रमाणे बदलणारा असल्यामुळे निश्चित व्याख्या करता येत नाही. मात्र
लोकशाही समाजवाद शब्दाचा आशय व्यक्त करता येतो. साधारणतः व्यक्तीचे स्वातंत्र्य व
आत्मविकासक्षमता सुरक्षित ठेवून समाजात सामाजिक, आर्थिक, राजकीय समता, न्याय आणि शोषणमुक्त समाज प्रस्थापित करण्याचे स्वप्न पाहणारी विचारसरणी
म्हणजे लोकशाही समाजवाद होय. थोडक्यात असे सांगता येईल की, लोकशाही
समाजवाद एका बाजूला समाजवाद स्थापन करण्याचा प्रयत्न करतो, तर
दुसऱ्या बाजूला लोकतंत्रात्मक व्यवस्थेवर विश्वास प्रकट करून लोकशाही मार्गाने
समाजवाद आणण्याचा प्रयत्न करतो. लोकशाही समाजवादी एकदम समाजवाद स्थापनेची भाषा करत
नाही, तर क्रमाक्रमाने समाजवादाची स्थापना करण्याचा मानस
व्यक्त करतात. पूँजीवाद नष्ट न करता त्यात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करतात.
उत्पादन आणि प्राकृतिक संसाधनाच्या न्यायपूर्ण वा समान वितरणाचा आग्रह धरतात,
त्यासाठी अवाजवी व मोठ्या उद्योगाचे राष्ट्रीयीकरण आणि संमिश्र
अर्थव्यवस्थेचे समर्थन करतात.
लोकशाही समाजवादाची मूलतत्त्वे वा वैशिष्ट्ये वा
तत्त्वज्ञान : लोकशाही
समाजवादाची वैचारिक पाळेमुळे समाजवाद विचारसरणीत आढळून येतात. लोकशाही समाजवादाची
तात्त्विक व सविस्तर मांडणी एखादा ग्रंथ वा पुस्तकात आढळून येत नाही. विविध
देशांतील समाजवादी विचारवंतांनी लोकशाही मार्गाने समाजवाद प्रस्थापित करण्यासाठी
विविध प्रकारचे सांगितलेले समाजवाद, इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली पुस्तके आणि
पक्षाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेले जाहीरनामे, ऍटली सरकारने राबविलेल्या
समाजवादी कार्यक्रमपत्रिका आणि १९५१ मध्ये फ्रैंकफूर्ट येथे भरलेल्या
"आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेस च्या जाहीरनाम्यात समाविष्ट तत्त्वे आणि
कार्यक्रमाचा विचार करून लोकशाही समाजवादाची मूलतत्त्वे स्पष्ट करता येतात.
१. स्वार्थी व्यक्तिवादाला विरोध : औद्योगिक क्रांतीच्या काळात इंग्लंड व युरोपियन
देशांत व्यक्तिवादाचा बोलबाला होता. व्यक्तिवाद व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि
क्षमतेवर आपला विश्वास प्रकट करतो. प्रत्येक व्यक्तीला आपले हित कळत असते. ते हित
साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असावे. या स्वातंत्र्याच्या
जोरावा व्यक्ती आपल्या स्वतःचे कल्याण साधू शकते. प्रत्येक व्यक्तीचे कल्याण झाले
की, आपोआप समाजाचे कल्याण होईल हा
व्यक्तिवादी विचार आहे. लोकशाही समाजवादाला हा व्यक्तिवादी विचार मान्य नाही.
व्यक्तीचे स्वातंत्र्य समाजहिताला मारक ठरू शकते. समाजात बलवान व दुर्बल हे दोन्ही
घटक अस्तित्वात असतात. मुक्त वातावरणात बलवानगट सामर्थ्यशाली बनतात. दुर्बल
घटकांच्या वाट्याला फारसे काहीही येत नाही. परिणामतः मुक्त वातावरणात विषमता
निर्माण होते. व्यक्तीच्या कल्याणातून समाजकल्याण साध्य होण्याची शक्यता नसते.
समाजातील दुर्बल घटकांच्या विकासाचे उत्तरदायित्व राज्याला घ्यावे लागते. राज्य
समाजातील दुर्बल घटकांच्या हितसंबंध रक्षणासाठी व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा
लादते; कारण स्वातंत्र्यातून स्वार्थी व्यक्तिवादाला चालना
मिळते. लोकशाही समाजवाद हा स्वार्थी व्यक्तिवादाला विरोध करतो.
२. भांडवलशाहीला विरोध : भांडवलशाही ही मुक्त स्पर्धेवर आधारलेली असते.
भांडवलदार मुक्त बाजारपेठांचा वापर करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न
करतात. श्रमिक हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मूलभूत घटक असूनही त्यास योग्य वेतन
मिळत नाही. भांडवलशाही समाजातील मूठभर लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होते.
भांडवलशाहीच्या विकासासोबत भांडवलदार अधिक श्रीमंत होतात आणि श्रमिक अधिक गरीब होत
जातात. भांडवलशाहीतील व्याज ही संस्था भांडवलदारांना अधिक श्रीमंत बनविण्यास मदत
करते. भांडवलशाही श्रमिकांचे आर्थिक व मानसिक शोषण करणारी व्यवस्था आहे. या व्यवस्थेतून
आर्थिक विषमता वाढत असते, म्हणून लोकशाही समाजवाद भांडवलशाहीला विरोध करतो. लोकशाही समाजवाद्यांना
भांडवलशाही अर्थव्यवस्था नष्ट करणे आवश्यक वाटते. परंतु ते हिंसक व क्रांतिकारक
मार्गाने भांडवलशाही नष्ट करण्याची भाषा न करता सनदशीर मार्गाने नष्ट करण्यावर भर
देतात. त्यासाठी श्रीमंतावर अवाजवी कर, राष्ट्रीयीकरण,
कामगारांना वेतनवाढ व सोयी-सवलती आणि सुविधांची उपलब्धता, उत्पादन साधनावर शासनाचे नियंत्रण, न्यायपूर्ण
वितरणाचा आग्रह इत्यादी मार्गांनी भांडवलशाहीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा
प्रयत्न करतात.
३. खाजगी उत्पादनक्षेत्रावर नियंत्रण : लोकशाहीत
खाजगी उत्पादनाला मान्यता दिली जाते. खाजगी उद्योग नफा कमावण्यासाठी कामगारांची
पिळवणूक करतात. • श्रमिकांची पिळवणुकीपासून मुक्तता करण्यासाठी लोकशाही समाजावादात
खाजगी उत्पादनक्षेत्रावर नियंत्रण ठेवले जाते. वस्तूची निर्मिती, मूल्य, वस्तू
विक्रीचे अधिकार इत्यादींवर सरकारचे नियंत्रण असते. महत्त्वपूर्ण क्षेत्रात सरकारी
उद्योगाकडून उत्पादन केले जाते. किरकोळ वस्तू-निर्मितीचा अधिकार खाजगी क्षेत्राला
दिला जातो. लोकशाही समाजवादात संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला जातो. संपूर्ण राष्ट्रीयीकरणाऐवजी
मर्यादित प्रमाणात राष्ट्रीयीकरणाला मान्यता दिली जाते. सरकारी उद्योगांसोबत खाजगी
उद्योगांचे अस्तित्व कायम ठेवले जाते. मात्र त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण असते.
४. अनिर्बंध आर्थिक स्पर्धेला विरोध : भांडवलशाही व्यवस्थेत आर्थिक क्षेत्रात अनिर्बंध
स्पर्धा असते. या स्पर्धेतून श्रम व संपत्तीचा अपव्यय होतो. योग्य आणि आवश्यक
वस्तूंचे उत्पादन होत नाही. श्रमिकांना नफा मिळविण्याचे साधन मानले जाते. समाजाची
गरज लक्षात न घेता, नफा देणाऱ्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. प्रा. लास्कीसारख्या अभ्यासक
मानतात की, समाजाला अन्नाची गरज असताना भांडवलशाही व्यवस्था
चित्रपटगृहे उघडते. चैनीच्या वस्तू निर्माण करण्यावर भर देते. लोकशाही समाजवादाचा
उद्देश अनिर्बंध स्पर्धा नष्ट करून सहकार्यावर आधारित उत्पादन करण्यावर भर देतो.
उत्पादन आणि वितरण न्याय्य मार्गांनी होण्यासाठी राज्याने प्रयत्न करावा. राज्य ही
आपत्ती नसून अनिष्ट स्पर्धा नष्ट करण्याचे एक साधन मानले जाते. वस्तूंचे उत्पादन
किती असावे, किंमत किती असावी यांवर राज्याचे नियंत्रण असते.
लोकांच्या गरजा लक्षात घेऊन वस्तूंचे उत्पादन आणि वितरण केले जात असल्यामुळे
अनिर्बंध स्पर्धेला लगाम लावता येतो, असे लोकशाही समाजवादी
विचारवंतांचे मत आहे.
५. समतेचा पुरस्कार : लोकशाही स्वातंत्र्यावर जास्त भर देते. अमर्याद
स्वातंत्र्यामुळे समाजातील मूठभर लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होते.
समाजातील इतर व्यक्तींना प्राथमिक गरजादेखील पूर्ण करता येत नाहीत. म्हणून लोकशाही
समाजवाद स्वातंत्र्याबरोबर समतेलाही महत्त्व देतो. समतादेखील पूर्णपणे निर्माण
करता येत नाही. नैसर्गिक विषमता नष्ट करणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे लोकशाही
समाजवाद मानवनिर्मित विषमता नष्ट करून समता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
६. मूलभूत हक्कांचे रक्षण : लोकशाही समाजवादात समतेला महत्त्व असले, तो स्वातंत्र्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले
जात नाही. व्यक्तिविकासासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले असते. त्यासाठी
लोकशाही समाजवादी देशाच्या घटनेत म हक्कांचा समावेश केलेला असतो. हक्क संरक्षणाची
जबाबदारी न्यायालयाकडे । दिलेली असते. हक्कावर कुणीही आक्रमण वा उल्लंघन केल्यास न्यायालयात
दाद मागता येते.
७. लोकशाहीचा पाया व्यापक : लोकशाही समाजवादात स्वातंत्र्य, समता यांचा योग्य समन्वय असल्याने
लोकशाहीचा पाया व्यापक बनतो. आर्थिक विषमता कमी झाल्यामुळे अधिक लोक राजकीय
प्रक्रियेत सहभागी होतात. त्यामुळे लोकशाहीचे स्वरूप केवळ राजकीय न ठरता, इतर क्षेत्रातही लोकशाही निर्माण होऊ शकते.
८. लोकशाही ही एक जीवनपद्धती : लोकशाही समाजवादात लोकशाहीला राजकीय व्यवस्था न
मानता जीवनपद्धती मानले जाते. सुखी व समाधानी समाजाच्या निर्मितीसाठी लोकशाहीला
समाजवादाची जोड दिली जाते. भांडवलशाही लोकशाहीतील भौतिकता आणि खाजगी मालमत्तेच्या
निर्बंध अधिकारामुळे स्वार्थ, नफेखोरी, शोषण व विषमता फोफावते. म्हणून लोकशाहीला
नैतिक पाया उपलब्ध करून देण्यासाठी समाजवादाशी सांगड घातली जाते. मानवी प्रगतीतून
सुख, समाधान आणि आनंद निर्माण व्हावा, हा
उद्देश असतो.
९. वर्गसंघर्षाऐवजी वर्गसमन्वयावर भर : मार्क्सवादातील वर्गसंघर्षाची कल्पना लोकशाही
समाजवादाला मान्य नाही. ते वर्गसंघर्षाऐवजी वर्गसमन्वय व वर्गसहकार्यावर जास्त भर
देतात. समाजातील सर्व वर्गांनी परस्परांना सहकार्य करून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ
घडवून आणावी आणि त्या वाढीव राष्ट्रीय उत्पन्नाचे न्याय्य वितरण समाजात करावे. ना
नफा ना तोटा या तत्त्वावर उत्पादन करावे. त्यासाठी उत्पादन प्रक्रियेवर समाजाचे
नियंत्रण असावे.
१०. कल्याणकारी राज्याची संकल्पना : मार्क्सवादाचा राज्य हे कामगार वर्गाचे शोषण
करण्याचे भांडवलदाराच्या हातातील साधन आहे. मार्क्सवादी क्रांतीनंतर राज्य नष्ट
करून कामगारांची हुकूमशाही स्थापन करावी यावर भर देतात. लोकशाही समाजवाद्यांना ही
भूमिका मान्य नाही. त्यांच्या मते राज्य ही लोककल्याणकारी आणि समाजाची सेवा करणारी
संस्था आहे. त्यामुळे राज्य नष्ट करणे अशक्य आहे. त्याऐवजी राज्यकल्याणकारी मार्ग
वापरून जनतेचे कल्याण घडवून आणावे. लोकशाही समाजवादी कल्याणकारी राज्याच्या
अंमलबजावणीसाठी कामगारांच्या हुकूमशाहीऐवजी लोकशाहीला प्राधान्य देतात.
१९.
आर्थिक नियोजनाचा स्वीकार : राष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकशाही समाजवादात आर्थिक नियोजनाचे धोरण स्वीकारले
जाते. आर्थिक नियोजन विशिष्ट हेतूने केले जाते. समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, लोकांचे राहणीमान सुधारावे, बेकारीचे प्रमाण कमी व्हावे, आर्थिक विषमता कमी
व्हावी या हेतूंसाठी आर्थिक नियोजन केले जाते. लोकशाही समाजवादात नियोजनाचे
उद्दिष्ट सर्वांना समान न्याय व संधी, समता प्रस्थापना हे
असते. लोकशाही समाजवादातील नियोजन हे लोकसहकार्यावर आधारित असते. साम्यवाद
राष्ट्रासारखे जबरदस्तीने लादलेले नियोजन नसते.
१२. उत्क्रांती तत्त्वावर विश्वास : लोकशाही समाजवादी उत्क्रांती तत्त्वाद्वारे
परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. समाजव्यवस्थेतील मूल्यव्यवस्था ही
कालातीत असते. त्यात कालानुरूप बदल घडवून आणण्यासाठी उत्क्रांती तत्त्व योग्य
असते. समाजव्यवस्थेतील सर्व मूल्ये कालबाह्य झालेली नसतात. समाजव्यवस्थेच्या
परिवर्तनासाठी उपयुक्त जुन्या मूल्यांचे संगोपन केले जाते. कालबाह्य मूल्य सनदशीर
आणि वैधानिक मार्गाने टप्प्याने बदलली जातात. कोणत्याही प्रकारची जोरजबरदस्ती वा
हिंसेचा वापर केला जात नाही. संघर्षाऐवजी समन्वयावर भर दिला जातो.
१३. समता आणि स्वातंत्र्य यात समन्वय : लोकशाही समाजवाद स्वातंत्र्य आणि समता या
दोन्ही तत्त्वांचा पुरस्कार करतो. स्वातंत्र्य आणि समता यांच्या अमर्यादित
वापरातून परस्परविरोध निर्माण होतो. लोकशाही समाजवाद मर्यादित स्वातंत्र्य आणि
मानवनिर्मित समतानिर्मितीचा प्रयत्न करतो. मर्यादित स्वातंत्र्याच्या माध्यमातून
व्यक्तिविकासाला वाव मिळतो, तर समतेच्या माध्यमातून सर्वांच्या विकासाला संधी प्राप्त होते. लोकशाही
समाजवाद स्वातंत्र्य आणि समता या परस्परविरोधी तत्त्वांमध्ये समन्वय प्रस्थापित
करण्याचा प्रयत्न करतो.
अशा प्रकारे लोकशाही समाजवादाची तत्त्वे ही समाजवादापेक्षा
भिन्न आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.