राष्ट्रवाद संकल्पनेचा विकास आणि आधारभूत घटक:-
राष्ट्रवाद संकल्पनेचा विकास १८ व्या शतकात राष्ट्रवाद युरोपमध्ये झाला असे मानले जात असले, तरी १४ व्या शतकात युरोपमध्ये घडलेल्या राजकीय व लष्करी घटनांमधून राष्ट्रवादाच्या उदयाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, त्यात ब्रिटिश व फ्रेंच यांतील शंभर वर्षांच्या युद्धाचा अंत ही घटना महत्त्वपूर्ण मानली जाते. १६ व्या व १७ व्या शतकातील युरोपमध्ये आधुनिक राज्याच्या उदयामुळे राष्ट्रवादाच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण झाले. आधुनिक राज्याच्या उदयामुळे चर्च आणि सामंतांच्या सत्तेला उतरती कळा लागली. धार्मिक शक्ती आणि सामंतशाहीच्या अस्तामुळे आधुनिक राज्याकडे सत्ता केंद्रित झाली. सार्वभौमत्वाच्या सिद्धान्तामुळे राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था बनली. नव्याने उदयाला येत असलेल्या व्यापारी व उद्योजक वर्गांच्या मदतीने आधुनिक राज्यव्यवस्था निरंकुश राजेशाहीच्या ताब्यात गेली. निरंकुश राजसत्तेमुळे सरंजामशाहीची पाळेमुळे उखडली गेली. राजाच्या वाढत्या सत्तेमुळे धार्मिक सत्तेचे महत्त्व कमी होत गेले. चर्चच्या वाढत्या सत्तेला लगाम घालण्यासाठी राजांनी धार्मिक सुधारकांना पाठिंबा दिला. उदा. मार्टिन ल्यूथर यांना जर्मनीतील अनेक राजांनी पाठिंबा दिला होता. धार्मिक सुधारणांमुळे कॅथॉलिक चर्चचे महत्त्व कमी झाले. निरंकुश राजांनी राजनिष्ठा विकसित करण्यासाठी प्रादेशिक सीमांची आखणी केली. रहिवास, संचार, धर्म, शिक्षण आणि भाषांबाबत समान कायदे व नियम तयार केले. प्रादेशिक सीमांमुळे सांस्कृतिक, भाषिक, वांशिकदृष्ट्या समान असलेल्या समुदायांत एकात्मतेची भावना निर्माण होऊ लागली. नव्याने उदयाला आलेल्या व्यापारी व उद्योजक वर्गांनी राजकीय समावेशन व सहभागासाठी राजकीय अधिकार व प्रतिनिधित्वाची मागणी केली. या मागणीवरून राजा व राजकीय सहभागाची मागणी करणारा वर्ग (पार्लमेंट) यांत संघर्ष निर्माण झाला. उदा. इंग्लंडमधील १६८८ ची वैभवशाली क्रांती.
औद्योगिक
क्रांतीनंतर संरजामशाहीचे उरलेसुरले अवशेषदेखील नष्ट होण्यास सुरुवात झाली.
औद्योगिक क्रांतीतून उदयाला आलेल्या व्यापारी, उद्योजक, बुद्धिजीवी आणि मध्यवर्गाला एकसंध करण्यास राष्ट्र
संकल्पनेने महत्त्वाची भूमिका बजावली. राजकीय सत्तेला विरोध करण्यासाठी राष्ट्रवाद
ही संकल्पना उपयुक्त आहे, हे सामान्य जनतेच्या लक्षात येऊ लागल्यामुळे राजेशाहीला
प्रखर विरोध होऊ लागला. उदा. १७७९ ची फ्रेंच राज्यक्रांती. युरोपमध्ये १८ व्या व
१९ व्या शतकात झालेल्या क्रांती वा बंडामध्ये राष्ट्रवाद संकल्पनेचा वारंवार
पुर्नउच्चार होऊ लागला. १९ व्या शतकात राष्ट्रवादाच्या प्रभावामुळे निरंकुश
राजेशाहीचे संवैधानिक लोकशाहीत रूपांतर होऊ लागले. युरोपातील राष्ट्रवादाच्या
प्रसारामुळे युरोपियन वसाहती असलेल्या आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांतदेखील
राष्ट्रवादाचा प्रसार प्रचार होऊ लागला. वसाहतीवादी देशांवर होणाऱ्या
अन्याय-अत्याचारांच्या विरोधात प्रतिध्वनी उमटू लागला. वसाहतीवादी देशांमध्ये
राष्ट्रवादाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू झाली. सुरुवातीला
पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीने पुढे आलेल्या सुशिक्षित व मध्यवर्गीय नेत्यांनी
राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. नंतरच्या काळात सामान्य जनतादेखील स्वातंत्र्य
आंदोलनात सहभागी होऊ लागली. रशियासारख्या बलाढ्य देशाचा जपानसारख्या चिमुकल्या
देशाने केलेल्या पराभवामुळे वसाहतीवादी देशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण
झाले. आशिया आणि आफ्रिका खंडांतील देशांतील राष्ट्रीय आंदोलनांच्या प्रभावामुळे
वसाहतींवरचे वर्चस्व टिकवणे पाश्चिमात्य देशांना कठीण होऊ लागले. युरोपियन
देशांतदेखील वसाहतीवरील होणाऱ्या अन्याय-अत्याचारांचे पडसाद उमटू लागले. दुसऱ्या
महायुद्धामुळे युरोपियन देशांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे आणि वसाहतीतील
राष्ट्रवादी चळवळीचा जोर वाढल्यामुळे, वसाहतींना स्वातंत्र्याचा दर्जा देण्याशिवाय
दुसरा पर्याय राहिला नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर बहुसंख्य आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देश स्वतंत्र झाले
आणि त्यांनी राष्ट्र राज्याची स्थापना केली. अशा प्रकारे राष्ट्रवाद ही संकल्पना
जगभर विकसित झालेली आढळते.
राष्ट्रवादाचे आधारभूत घटक : राष्ट्रवाद ही भावनिक संकल्पना आहे. राष्ट्रवाद
निर्माण होण्यासाठी विशिष्ट घटकांची आवश्यकता असते. समान इतिहास, परंपरा, भाषा, आणि समान संस्कृती असलेल्या समूहामध्ये
एकात्मतेची भावना विकसित होणे आणि आपण इतर समुदायांपेक्षा भिन्न आहोत ही भावना
म्हणजे राष्ट्र होय. राष्ट्र हा एक भावनिकदृष्ट्या एकात्म असलेल्या व्यक्तींचा
समूह असतो. या समूहाला राजकीय स्वातंत्र्य वा राजकीय अधिमान्यता मिळाली की, त्यांचे राष्ट्र-राज्यात रूपांतर होते. राष्ट्र
राज्याची स्थापना वा संरक्षण हा राष्ट्रवादाचा मध्यवर्ती आशय मानला जातो.
राष्ट्रवाद आपोआप | निर्माण होत नसून त्यासाठी काही घटकांची आवश्यकता असते.
राष्ट्रवादाचे पुढील काही महत्त्वपूर्ण आधारभूत घटक मानले जातात.
१. समान भूप्रदेश : राष्ट्रवादी भावना निर्माण होण्यास भौगोलिक एकता वा समान
भूप्रदेशाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. एकाच भूप्रदेशात वास्तव्य करणाऱ्या लोकांची
शरीर प्रकृती, मानसिक प्रवृत्ती, आहार, राहणीमान, लोकांचे हितसंबंध, सवयी समान असतात. हवामान, पर्जन्यमानदेखील सारखे असते. या सारखेपणामुळे समुदायातील
घटकांमध्ये आपोआप मानसिक एकता निर्माण होते. दीर्घकाळ एकाच र वास्तव्य केल्यामुळे
समूहांच्या संस्कृतीतदेखील एकजिनसीपणा निर्माण भूप्रदेशावर होतो. आपण राहत
असलेल्या भूमीबद्दल एक प्रकारची आत्मीयता निर्माण होते. ा आत्मीयतेमुळे आपण त्या
भूमीला मातृभूमी असे म्हणतो. मातृभूमीविषयी प्रेम असल्याने लोक तिच्या
संरक्षणासाठी व विकासासाठी एकत्र येतात. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व
वेचण्याची तयारी ठेवतात. एकाच भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये आपण सर्व एक आहोत
ह्या भावनेसोबत परस्पर सहकार्याची आणि जवळीकतेची भावना विकसित होते. या उलट
भूप्रदेश सलग नसेल तर राष्ट्रवादाच्या निर्मितीत अडथळे येतात. उदा. पूर्व व पश्चिम
पाकिस्तानात इस्लाम धर्म समान असूनही भूप्रदेशाच्या अलगतेमुळे पूर्व पाकिस्तान अवघ्या
२० वर्षांत पाकिस्तानमधून बाहेर पडला आणि बांगलादेश नावाचा स्वतंत्र देश निर्माण
झाला. समान भूप्रदेश आणि निश्चित भौगोलिक मर्यादांमुळे लोकांना राष्ट्राची प्रतिमा
उभी करता येते. या प्रतिमांच्या माध्यमातून भावनिक आत्मीयता विकसित करता येते.
अर्थात राष्ट्र निर्माण करण्यासाठी भौगोलिक एकात्मता वा समान भूप्रदेश हा एकमेव
निकष नाही. युरोपातील अनेक राष्ट्रांमध्ये समान भूप्रदेश असूनही राष्ट्र निर्माण
झालेले दिसून येत नाही. ज्यू लोकांकडे समान भूप्रदेश नसतानाही त्यांनी दीर्घकाळ
आपल्या राष्ट्रीयत्वाची भावना टिकवून ठेवली आणि अखेर १९४८ मध्ये इस्लाईल ह्या
जगातील एकमेव ज्यू राष्ट्राची स्थापना केली. अर्न्स्ट रेनान म्हणतात की, केवळ भूमीमुळे राष्ट्र तयार होत नाही. माणूस हा
राष्ट्रवादाचा आत्मा आहे. राष्ट्र हे आध्यात्मिक तत्त्व आहे. इतिहासाच्या
गुंतागुंतीच्या घडामोडींचा परिणाम आहे, एक आध्यात्मिक कुटुंब आहे; केवळ जगाच्या भौगोलिक रचनेने ठरलेला समूह म्हणजे
राष्ट्र नव्हे. निव्वळ भौगोलिक एकात्मता वा समान भूप्रदेशामुळे राष्ट्रवाद निर्माण
होत नाही, तर त्यासाठी
आणखी काही घटकांची आवश्यकता असते.
२. वांशिक एकता : राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी वंश हा घटकदेखील महत्त्वपूर्ण मानला जातो. राष्ट्रात एकाच वंशाचे लोक राहत असतील तर त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना लवकर निर्माण होते. बर्नार्ड जोसेफ यांच्या मते, 'वंशाची जाणीव अगर राष्ट्रातील लोकांमध्ये आपण एकवंशीय आहोत असा विश्वास असणे, ह्याचा राष्ट्र निर्मितीवर प्रभाव पडलेला दिसून येतो'. बर्जेस व लिकॉक यांनी वंश हा घटक एक राष्ट्रीयत्व निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला आहे. एकाच वंशाच्या लोकांमध्ये परस्परांबद्दल आपुलकीची भावना असल्याने, ते लोक लवकर एकत्र येतात. वंशशुद्धता, वंशश्रेष्ठता वा वंशाभिमान राष्ट्रीयत्व विकसित करत असतो. वंशश्रेष्ठत्वाच्या आधारावर जनतेत एकता निर्माण करता येते. राष्ट्र निर्माण करण्यासाठी वंशाभिमानाचा उपयोग केल्याची अनेक उदाहरणे आहेत. उदा. हिटलरने वंशश्रेष्ठत्वाच्या आधारावर जर्मन जनतेत राष्ट्रवाद निर्मितीचा प्रयत्न केला होता. वांशिक एकतेसंदर्भात परस्परविरोधी भूमिका विचारवंतांमध्ये आहेत. मॅझिनी जोसेप जे. एच. रोज, लाई ब्राईससारखे अभ्यासक राष्ट्रवाद निर्मितीसाठी वांशिक एकतेला महत्त्व देत नाहीत तर झिमर्न, बर्नार्ड जोसेफ हे विचारवंत वांशिक एकता राष्ट्रवादासाठी आवश्यक मानतात. वांशिक एकात्मता ही राष्ट्रवादासाठी पूरक मानली जाते. वांशिक •भिन्नता राष्ट्रीय एकात्मतेसाठी बाधक ठरू शकते. उदा. भिन्न वंशीयांना एकत्र राहणे अशक्य झाल्यामुळे तुर्क साम्राज्याचे तुकडे पडले. अमेरिकेतदेखील गोरे विरुद्ध निग्रो हा संघर्ष उफाळून येतो. राष्ट्रीयत्वाच्या निर्मितीसाठी वंश हा घटक उपयुक्त घटक असला, तरी आधुनिक काळात या घटकाचे महत्त्व कमी झालेले दिसते. वांशिक शुद्धता वर्णसंकरामुळे आधुनिक काळात सापडणे शक्य नाही. वंशश्रेष्ठत्वाचा अभिमान हा घटक मानवाच्या आणि मानव जातीच्या विकासाच्या प्रक्रियेतील अडथळा आहे, असे आधुनिक काळात मानले जाऊ लागले आहे.
३. भाषिक एकता : युरोपातील राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेमुळे भाषिक एकता हा
राष्ट्रनिर्मितीतील प्रमुख घटक मानला जाऊ लागला. आधुनिक पाश्चिमात्य राष्ट्र राज्य
ही भाषिक तत्त्वाच्या आधारावर निर्माण झालेली एकभाषिक राज्ये आहेत. उदा. इंग्लिश
भाषा-इंग्लंड देश, जर्मनी भाषा जर्मन देश. भाषिक एकात्मतेच्या बाबतीत
युरोपमध्ये परस्परविरोधी प्रक्रिया आकाराला आलेला आहेत. जर्मन आणि इटालियन
भाषिकांना एकत्र आणून जर्मनीच्या एकीकरण आणि इटलीच्या • एकीकरणाची प्रक्रिया तर
दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रिन साम्राज्यात हंगेरियन्स, पोल, माग्यार, सॅलाव्ह इत्यादी भाषिक व सांस्कृतिक भेदामुळे
आस्ट्रियन साम्राज्याची विघटनाची प्रक्रिया होत. भाषा हे संवाद साधण्याचे प्रभावी
माध्यम आहे. भाषेच्या माध्यमातून साहित्य, वाड:मय, संस्कृती, मूल्य, आचारविचारांचा प्रचार-प्रसार होत असतो. समान
भाषेमुळे नागरिक एकमेकांचे आचारविचार समजू शकतात. समान भाषिकांमध्ये विचारांची
देवाणघेवाण सुलभ होत असल्यामुळे भावनिक जवळीक लवकर निर्माण होते, म्हणून रॅम्से मूरसारखा अभ्यासक भाषेला
राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात महत्त्वपूर्ण स्थान देतो. भाषेमुळे आचार-विचार, संस्कार, संस्कृती इत्यादींची ओळख होऊन लोकांमध्ये
ऐक्याची भावना वृद्धिंगत होत असते. राष्ट्रीयत्व निर्माण करण्यासाठी भाषा हा घटक
महत्त्वपूर्ण असला तरी तो एकमेव घटक नाही. एकच भाषा बोलणाऱ्या लोकांची राष्ट्र जशी
जगात आढळून येतात तशी भिन्न भिन्न भाषा बोलणाऱ्यांचीदेखील राष्ट्रे आढळून येतात.
उदा. स्वित्झर्लंड, भारत, कॅनडा, भाषिक विविधता ही राष्ट्रवादाच्या निर्मितीत अडथळे आणण्याचे
कार्य करते, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. उदा. दक्षिण भारतीय लोक राष्ट्रभाषा हिंदीला
भारतात विरोध करतात. भाषिक विविधता असलेल्या राष्ट्रामध्ये विविध भाषिकांना एकत्र
बांधून ठेवण्यासाठी संघराज्य शासनपद्धतीचा अवलंब केला जातो. उदा, स्वित्झर्लंड, भारत या देशांत विविध भाषिकांना एकत्र जोडून
ठेवण्यासाठी संघराज्य निर्माण केलेले आहे. संघराज्याच्या माध्यमातून विभिन्न
भाषिकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण केली जाते. अनेकदा भाषिक एकतेपेक्षा
एकत्र राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती हादेखील राष्ट्रवादाचा पाया ठरत असल्यामुळे
आधुनिक काळात एका राष्ट्रात अनेक भाषेचे लोक राहताना आढळतात.
४.धार्मिक एकात्मता : समाजाला संघटित करणारी धर्म ही मोठी शक्ती आहे. धर्म ही
व्यक्तीच्या जीवनातील आत्मीयता व जिव्हाळा निर्माण करणारी प्रमुख शक्ती मानली
जाते. धर्माबाबत मानवी संवेदना अतिशय तीव्र असल्यामुळे प्राचीन काळी समाजाला
संघटित करण्यासाठी धर्माचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. प्रत्येक धर्माचे
सण-समारंभ व उत्सव, चालीरिती, पूजाअर्चा, रूढी व परंपरा, श्रद्धा समान असल्याने एकाच धर्मातील लोकांमध्ये
लवकर ऐक्य निर्माण होते. धार्मिक समानतेतून विशिष्ट घटकांबद्दल त्यांच्याबद्दल
स्वाभिमान वाढीस लागतो. धार्मिक आधारावर राष्ट्रवाद निर्मितीचा प्रयत्न अनेक
देशांत झालेला दिसतो. उदा. पाकिस्तानची निर्मिती धर्म या एकमेव कारणामुळे झाली.
धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया अनेक देशांत घडलेली आहे.
उदा. ज्यू लोकांमध्ये धर्माच्या आधारावर भावनिक ऐक्य साधले गेले. पश्चिम व मध्य
आशियातील अनेक देशांत राष्ट्रवादाचा आधार धर्म असल्याचे दिसते. जगातील अनेक देश
धर्माधिष्ठित आहेत. उदा. पाकिस्तानचा अधिकृत धर्म इस्लाम आहे. धार्मिक एकात्मतेतून
राष्ट्रवाद विकसित होत असला, तरी याच तत्त्वांच्या आधारावर राष्ट्रवादी भावना जागृत होत
असतेच असे नाही. धर्मयुद्धानंतर आधुनिक काळात धर्म आणि राज्य यांच्यात फारकत करून
धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना पुढे आली आहे. धार्मिक राष्ट्रवादातून विविध धर्म
व पंथांमध्ये संघर्षाचे वातावरण तयार होते. अल्पसंख्याकांच्या अधिकारावर गदा येत
आहे. उदा. इस्लामिक राष्ट्रांमध्ये विविध पंथांमध्ये होत असलेला संघर्ष, त्यामुळे आधुनिक काळात सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता यांसारख्या मानवी कल्याणाच्या
विचार करणाऱ्या तत्त्वांना महत्त्व प्राप्त होत आहे. बहुधार्मिक देशात
धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या आधारावर राष्ट्रवादाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला जात
आहे. उदा. भारत.
६. समान राजकीय हितसंबंध : वंश, भाषा, धर्म, संस्कृती इत्यादींबाबत विविधता असूनही समान
राजकीय हितसंबंधांमुळे राष्ट्रीयत्व भावनेचा विकास होतो. विशेषतः परकीय अमलाखाली
असलेले लोक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आपसातील भेद विसरून एकत्र येतात. उदा.
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात अनेक जाती-धर्माच्या लोकांनी भाग घेतलेला दिसतो.
परकीय राजवटीकडून केल्या जाणाऱ्या अन्याय अत्याचार व दडपशाहीमुळे लोकांमध्ये राष्ट्रवादाला
पूरक वातावरण निर्माण होते. झिमर्नसारखा अभ्यासक मानतो की, राजकीय दडपणशाहीमुळे राष्ट्रवादी भावना बळावते व
स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन मिळते. युरोपमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना राजकीय
दडपशाहीच्या परिणामातून आत्म-चेतनेच्या रूपात विकसित झालेली होती. आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील युरोपियन
वसाहतीमध्येदेखील आपला देश स्वतंत्र व सार्वभौम व्हावा या अपेक्षेने लोकांनी परकीय
सत्तेच्या विरोधात संघर्ष सुरू केला. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि
मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी, तसेच देशाची सर्वच क्षेत्रांत प्रगती घडवून
आणण्यासाठी समान राजकीय हितसंबंध उपयुक्त ठरतात. तसेच राष्ट्रीयत्वाची भावना दृढ
करण्यासही साहाय्यकारी ठरतात.
७. समान आर्थिक हितसंबंध : आधुनिक काळात समान आर्थिक हितसंबंधामुळे
राष्ट्रवादाला प्रोत्साहन मिळते. जास्तीत जास्त वेगाने आर्थिक प्रगती साधून
दारिद्र्य दूर करणे हे प्रत्येक देशाचे उद्दिष्ट असते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी
धर्म, भाषा, वंश हे राष्ट्रवादाचे पारंपरिक घटक बाजूला सारून
आर्थिक विकासासाठी एकत्र येण्याची भावना वाढत चाललेली आहे. भारतीय घटक राज्यांना
परस्परांच्या मदतीची नितांत गरज आहे. उदा. पंजाबचा गहू, आसामचा चहा, दक्षिण भारतातील तांदूळ सर्वांना हवा आहे.
त्यामुळे भारतीय समाजात अनेक भेद असूनही परस्परांच्या गरजेपोटी एकतेची भावना निर्माण
होऊन, भारतात
राष्ट्रवाद विकास होत आहे. समान आर्थिक हितसंबंधांतून राष्ट्रवादाच्या निर्मितीस
अनुकूल परिस्थिती निर्माण होत असते. आर्थिक हितसंबंध समाजव्यवस्थेत परस्पर सहकार्य
विकसित करण्यात प्रभावी भूमिका बजावतो. परस्पर सामंजस्यातून आपण सर्व एक आहोत ही
भावना बळावते. आर्थिक प्रगतीचे स्वप्न राष्ट्राचा आर्थिक उत्कर्ष साधण्यास
साहाय्यक ठरते. राष्ट्र आर्थिकदृष्ट्या समृद्ध व बलवान बनल्यास राष्ट्राला
प्रतिष्ठा प्राप्त होईल, आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढेल ही भावना जनतेत
सुखकारक प्रतिमा निर्माण करते. राष्ट्राला आर्थिक आघाडीवर यशस्वी करण्यासाठी
राष्ट्रातील जनता आपआपसांतील मतभेद विसरून एकत्र येऊ लागते. उदा. विविध भाषिक, वांशिक समुदाय अस्तित्वात असूनही व्यावसायिक व
आर्थिक हितसंबंधांमुळे स्वित्झर्लंड हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आलेले
आहे. अर्थात समान आर्थिक हितसंबंध राष्ट्रवाद निर्मितीला पूरक असला, तरी तो एकमेव घटक नाही. आर्थिक हितसंबंधांतून
राष्ट्र निर्माण झाल्याची उदाहरणे फारशी आढळून येत नाहीत. समान आर्थिक
हितसंबंधांतून राष्ट्र निर्माण झाली असती तर भांडवलदार आणि कामगारांची स्वतंत्र
राष्ट्रे उदयाला आली असती. रेनानसारखा अभ्यासक सांगतो की, आर्थिक संबंधातील एकात्मतेमुळे जकातीचा संघ
निर्माण होतो, राष्ट्र नव्हे. समान आर्थिक हितसंबंध राष्ट्रवादास पूरक असला तरी
राष्ट्रनिर्मितीसाठी अपुरा आहे असे अभ्यासकांना वाटते.
९. एकत्र राहण्याची वृत्ती : राष्ट्रनिर्मितीसाठी लोकांमध्ये एकत्र राहण्याची प्रवृत्ती असणे आवश्यक मानले जाते. अरनाल्ड टायनबीच्या मते, 'राष्ट्र बनण्यासाठी इच्छा हा सर्वांत मोठा घटक असतो'.
लोकांमध्ये धर्म, वंश, जात,
लिंग, भाषा, वंश
इत्यादींबाबत विविध प्रकारची भिन्नता असूनही एकत्र राहण्याची प्रवृत्ती प्रबल असेल,
तर राष्ट्र निर्माण होण्यास कोणतीही अडचण नसते. उदा. अमेरिका हा देश
विविध देशांतून स्थलांतरित झालेल्या लोकांनी निर्माण केलेला आहे. सक्ती नव्हे तर
संमती वा इच्छा हा राष्ट्राचा आधार असतो असे टी. एच. ग्रीनसारख्या राज्यशास्त्रज्ञाने
अनेक दशके आधी नमूद केलेले होते. आपल्या प्रगतीसाठी व संरक्षणासाठी आपण एकत्र
राहिले पाहिजे ही भावना राष्ट्रवादाला आकार देण्याचे कार्य करीत असते.
अशा प्रकारे विविध कारणांच्या परिणामातून राष्ट्रवाद
भावनेचा विकास होत असतो. राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी सर्वच घटक प्रत्येक
राष्ट्रात अस्तित्वात असतीलच असे नाही. म्हणून प्रत्येक देशात राष्ट्रवादाच्या
विकासासाठी विविध घटकांनी योगदान दिलेले आहे, हे नाकारता येणार नाही. कोणत्या देशात कोणत्या घटकांमुळे
राष्ट्रवाद निर्माण झाला हे ठामपणे सांगता येत नाही. राष्ट्रवाद हा शेवटी अनेक
घटकांच्या परिणामातून घडणारी सामूहिक भावनिक कृती असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.