राष्ट्रवादाचे प्रकार वा वर्गीकरण:- राज्यशास्त्राच्या अभ्यासात राष्ट्रवाद ही
अत्यंत गुंतागुंतीची आणि शक्तिशाली संकल्पना मानली जाते. राष्ट्रवाद संकल्पनेचा विकास फ्रेंच राज्यक्रांतीपासून सुरू झाला. या प्रक्रियेत राष्ट्रवादाविषयी लेखन
करणाऱ्या अभ्यासकानी राष्ट्रवादाचे विविध प्रकारांत वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हॅन्स कोहन यांनी पाश्चिमात्य राष्ट्रवाद आणि गैर पाश्चिमात्य वा पौर्वात्य राष्ट्रवाद हे
राष्ट्रवादाच्या विकासावर आधारित राष्ट्रवादाचे दोन प्रकार पाडलेले आहेत. हेस यांनी राष्ट्रवादाच्या विकासाच्या पाच अवस्था स्पष्ट केलेल्या आहेत. मानवतावादी राष्ट्रवाद, पारंपरिक राष्ट्रवाद, जॅकोबीन राष्ट्रवाद, उदारमतवादी राष्ट्रवाद आणि एकात्म राष्ट्रवाद. या पाच
अवस्थांमधील राष्ट्रवादापैकी चार अवस्था १८ व
१९ व्या शतकात अस्तित्वात होत्या, तर पाचवी
व शेवटोची अवस्था विसाव्या शतकात अस्तित्वात होती. विक्नूसी राइट यांनी मध्ययुगीन, राजसत्तात्मक, क्रांतिकारक, उदारमतवादी आणि सर्वकष असे शासनप्रणालीच्या आधारावर राष्ट्रवादाचे पाच प्रकार विशद केले. प्रो. लुई स्नायडर यांनी एकीकरण घडविणारा राष्ट्रवाद, विघटन घडविणारा राष्ट्रवाद, आक्रमक राष्ट्रवाद आणि विद्यमान राष्ट्रवाद या राष्ट्रवादाच्या विकासाच्या चार
अवस्था विशद केलेल्या आहेत. राष्ट्रवादाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी विविध दृष्टिकोन व विचारांच्या आधारावर राष्ट्रवादाचे विविध
प्रकारांत वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणाच्या आधारावर राष्ट्रवादाचे प्रागतिक वा
पुरोगामी राष्ट्रवाद आणि प्रतिगामी वा प्रतिक्रियावादी राष्ट्रवाद हे
मुख्य दोन प्रकार पाडले जातात.
अ) पुरोगामी वा प्रागतिक राष्ट्रवाद :- प्रागतिक राष्ट्रवाद हा
विधायक कार्यावर भर देणारा
आणि आपल्या राष्ट्राच्या कल्याणासोबत इतरांच्या कल्याणाचा विचार करणारा राष्ट्रवाद मानला जातो. राष्ट्र विकासासाठी राष्ट्रवाद हा प्रकार
वैधानिक, सनदशीर आणि शांततेच्या मार्गाला महत्त्व देतो.
ब)
प्रतिगामी राष्ट्रवाद :- प्रतिगामी राष्ट्रवाद विघातक
स्वरूपाचा राष्ट्रवाद मानला जातो. राष्ट्राच्या प्रगतीसाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास मान्यता देतो. हिंसा, युद्ध, आक्रमकता, कूटनीती इत्यादी मार्गांनी राष्ट्राची प्रगती करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून राष्ट्रवादाचा हा प्रकार
इतर राष्ट्रांसाठी घातक मानला जातो. राष्ट्र-विकासासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची तयारी ह्या प्रकारच्या राष्ट्रवादात असते.
पुरोगामी वा प्रागतिक आणि प्रतिगामी राष्ट्रवादातील फरक वा भेद :- पुरोगामी राष्ट्रवाद आणि प्रतिगामी राष्ट्रवाद ह्या दोन्ही प्रकारांत स्वरूप व लक्षणे
भिन्न भिन्न आढळून येतात. खालील मुद्द्यांच्या माध्यमातून ह्या दोन्ही राष्ट्रवादांतील फरकाचे चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण करता येऊ शकेल. ते मुद्दे
पुढीलप्रमाणे होत.
१. पुरोगामी राष्ट्रवादात राष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा विकास
टप्प्याटप्पाने व शांततेच्या मार्गाने झाला
पाहिजे हा भर
दिला जातो. पुरोगामी राष्ट्रवाद साधनशुचितेवर भर देणारा
आहे. आपल्या राष्ट्राच्या विकासासोबत इतर राष्ट्रांचाही विकास व्हावा असा मानवतावादी उद्देश बाळगणारा आहे. इतर राष्ट्रांचे हितसंबंध लक्षात घेऊन विकासाची रूपरेषा तयार केली जाते. आपल्या राष्ट्राचा विकास होताना इतर राष्ट्रांच्या हितसंबंधाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते. याउलट प्रतिगामी राष्ट्रवाद साधनशुचितेला अजिबात महत्त्व देत नाही. राष्ट्राचा विकास साधणे हे एकमेव
उद्दिष्ट मानतात आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणत्याही मार्गाच्या वापराला मान्यता देतात.
आक्रमण, हिंसा, दडपशाही, रक्तपात इत्यादींपैकी कोणत्याही मार्गाने राष्ट्राचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. आपल्या राष्ट्राचा विकास घडवून दुसऱ्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावरदेखील गदा आणण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आपल्या राष्ट्राच्या हितसंबंधांच्या परिपूर्तीसाठी इतर राष्ट्रांच्या हितसंबंधांना धक्का लागला तरी चालेल, पण राष्ट्राची प्रगती
झाली पाहिजे यावर भर देतात.
प्रतिगामी राष्ट्रवाद हा जहालमतवादावर विश्वास व्यक्त
करणारा राष्ट्रवाद मानला जातो.
२. पुरोगामी राष्ट्रवाद हा काळानुरूप बदलणारा असतो.
राष्ट्राचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी नवीन नवीन विचार व कल्पनांचे स्वागत
असते. कालबाह्य झालेल्या जुन्या रूढी, परंपरा व प्रथांचा त्याग
करण्यासही तयार होतो. राजकीय संस्थांचेआधुनिकीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न करतो तर प्रतिगामी राष्ट्रवाद से
सोने या वृत्तीवर विश्वास ठेवणारा असल्यामुळे जुन्या
रूढी, परंपरावा महत्त्व देतो. जुन्या राजकीय संस्थांचे जतन केले जाते वा त्या
दिला जातो. नवीन बदल व विचारांना विरोध
केला जातो. जुने विचार झाले असतील तरी ते टिकवून
ठेवण्याचा प्रयत्न केला जातो,
३. पुरोगामी राष्ट्रवादात सातत्याने विधायक स्वरूपाच्या कार्यावर भर दिला
जातो. विधायक कार्याला अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले • जाते. विधायक मागांनी राष्ट्राचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो प्रतिगामी राष्ट्रवाद विध्वंसक कार्यावर भर देतो.
राष्ट्राच्या उन्नतीसाठी हिंसा, जबरदस्ती अन्याय-अत्याचाराला मान्यता दिली जाते. विघटनात्मक कार्यावर भर देऊन
समाजात फूट घडवून आणली जाते. लोकांमध्ये आक्रमक वृत्ती निर्माण करून युद्धाला प्रोत्साहन दिले जाते. प्रतिगामी राष्ट्रवाद हा युद्धज्वर वाढविण्यास आणि
विस्तारवादी वृत्ती निर्माण करण्यास कारणीभूत मानला जातो.
४. पुरोगामी राष्ट्रवाद राष्ट्राचा विकास हळूहळू वा टप्प्याटप्प्याने व्हावा
यावर भर देतो.
राष्ट्र विकास घडवून आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची दडपशाही करत नाही. याउलट प्रतिगामी राष्ट्रवादात राष्ट्राचा जलद गतीने विकास व्हावा यावर भर दिला
जातो. विकासासाठी कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध मानत नाही. वेळप्रसंगी हिंसेचा वापर करूनदेखील विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करतात.
५. पुरोगामी राष्ट्रवादात धर्मनिरपेक्ष विचारांचा अवलंब केला जातो. सर्व धर्माना समान स्थान दिले जाते. धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्व धर्मीयांना विकासाची समान संधी उपलब्ध करून दिली जाते, तर प्रतिगामी राष्ट्रवादात विशिष्ट धर्माला राजधर्माची मान्यता असते.
उदा. मुस्लीम धर्म पाकिस्तानाचा अधिकृत धर्म आहे. इतर धर्मीयांना दुय्यम दर्जा दिला जातो. इतर धर्मीयांबाबत सहिष्णू वृत्ती दाखविली जात नाही, त्यांच्या रास्त अधिकारांना मान्यता दिली जात नाही.
७. पुरोगामी राष्ट्रवाद हा राष्ट्र विकासाची रूपरेखा निश्चित करताना
अल्पसंख्यक आणि बहुसंख्याक यांत फरक करत नाही. बहुसंख्याकांच्या विकासासोबत अल्पसंख्याकांचादेखील विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. 'सबका साथ सबका विकास' हा पुरोगामी राष्ट्रवादाचा नारा
आहे. म्हणून अल्पसंख्याकांच्या हितरक्षणासाठी हा राष्ट्रवाद उपयुक्त मानला
जातो, तर प्रतिगामी राष्ट्रवादात अल्पसंख्याकांना शत्रू
समजून वागणूक दिली जाते. त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. अल्पसंख्याकांना दुय्यम स्थान दिले जाते. राष्ट्र विकासाच्या कक्षेतून त्यांना वगळले जाते. त्यांच्या राष्ट्रनिष्ठेबद्दल शंका घेतल्या जातात. हा राष्ट्रवादाचा प्रकार
अल्पसंख्याकांसाठी घातक मानला जातो.
८. पुरोगामी राष्ट्रवाद आंतरराष्ट्रीय शांतता व विश्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी
मानला जातो. या राष्ट्रवादात जागतिक
शांतता, परस्पर सहकार्य, सहअस्तित्व इत्यादींना महत्त्वाचे स्थान असते. युनो व जागतिक
पातळीवरील संस्थांचे नियम व कायदे
याविषयी आदराची भावना असते. इतर राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला जातो. अनाक्रमण तत्त्वांच्या आधारावर राष्ट्रा-राष्ट्रांतील संघर्षाचे मुद्दे विचारविनिमय करून सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. प्रतिगामी राष्ट्रवाद हा जागतिक
शांततेला मान्यता देत नाही. विस्तारवादी व साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कार करतो.
इतर राष्ट्रांच्या सार्वभौमत्वावर आक्रमण करण्यास मागेपुढे पाहत नाही. युद्धाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो. युनो व जागतिक
संस्थांच्या नियमांचा आदर करत नाही.
राष्ट्रवादाचे मुख्य दोन प्रकारांत वर्गीकरण केले जात असले, तरी हे दोन्ही
प्रकार एकमेकांपासून पूर्णपणे विलग करता येत नाहीत; कारण ते एकमेकांमध्ये मिसळलेले वा
गुंतलेले आहेत. अनेकदा दोन्ही प्रकारच्या राष्ट्रवादाचे दर्शन एकाच राष्ट्रातदेखील दिसून येते. एखाद्या घटनेनुसार वा प्रसंगानुसार राष्ट्रवादाचे वेगवेगळ्या प्रकारांत वर्गीकरण करता
येते. त्यामुळे अभ्यासाच्या सोईसाठी उपरोक्त मुद्द्यांच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादांतील स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.