स्त्रीवादाचे विविध दृष्टिकोन
स्त्रीवादाचे
परंपरागत आणि शरीरशास्त्रीय हे प्रमुख दोन दृष्टिकोन आहेत. परंपरागत
दृष्टिकोनानुसार पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रिया सामाजिक, आर्थिक, राजकीय
क्षेत्रात कनिष्ठ वा दुय्यम दर्जाच्या मानल्या जातात. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान प्राप्त करून देण्यासाठी
पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक अधिकार, राजकीय
सहभागाची संधी, राजकीय आरक्षण मालमतेचा अधिकार आणि आर्थिक आरक्षण देऊन
स्त्रीपुरुष समानता साध्य करता येईल, असे मानतो.
शरीरशास्त्रानुसार स्त्री पुरुष यांच्या शरीररचनेत फरक आहे. त्या नैसर्गिक फरकाचा
गैरफायदा घेऊन खियांना दुय्यमत्व बहाल करण्यात आले. निसर्ग नियमानुसार मातृत्व या
घटकांमुळे ती दुय्यम ठरत नाही. भांडी आणि कृषी संस्कृतीचा शोध श्रीनेच लावला होता.
पूर्वीच्या काळी अनेक स्त्री राज्य अस्तित्वात होती. मानवी संस्कृतीच्या विकासात
स्त्रियांनी पुरुषाच्या बरोबरीने योगदान दिलेले आहे. मात्र पुरुषप्रधान
श्रमविभागणीच्या तत्वामुळे स्त्रियांना दुय्यमत्व मिळालेले दिसते. स्त्री ही
जैविकदृष्ट्या कनिष्ठ नाही. हे मान्य झाल्यानंतर स्त्री मुक्ती संकल्पनेला वेगाने
चालना मिळाली. स्त्री स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करून विविध विचारवंतांनी प्रमुख
सिद्धांत वा दृष्टिकोन मांडलेले आहेत. ते पुढील प्रमाणे होत.
१) परंपरावादी वा सनातनी स्त्रीवाद-
परंपरावादी
स्त्रीवादी दृष्टिकोनानुसार स्त्रियांना दिली जाणारी भेदभावपूर्ण वागणूक ही
स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक वा जैविक भिन्नतेशी निगडित आहे. निसर्गानेच
स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव केलेला असल्यामुळे दोन्हीही गट समाजव्यवस्थेत पार पाडत
असलेल्या भूमिका भिन्न राहणार,
त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. समाजव्यवस्थेने ही भिन्नता
कायम ठेवण्यासाठी पुरुषांना सार्वजनिक क्षेत्र आणि स्त्रियांना कुटुंब हे
कायक्षेत्र वाढून दिलेले आहे. ही भिन्नता कार्यक्षमरीतीने कार्यरत राहण्यासाठी
कायदेशीर तरतूदी केल्या पाहिजेत,
स्वी आणि पुरूषामधील भेदभाव दोघांमध्ये असलेल्या विषम
क्षमतेमुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांना विषम वागविण्यात
वावगे काही नाही. परंपरावादी स्त्रीवादाने स्त्री-पुरुष समानतेच्या संकल्पनेला
नाकारलेले आहे. समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या मर्यादित भूमिकेचे हा दृष्टिकोन
समर्थन करतो. स्त्री पुरुषांमधील विषमता नैसर्गिक आणि आदर्श आहे असे मानतो.
स्त्रियांच्या पारंपरिक भूमिकेला योग्य ठरवतो म्हणून हा विचार स्त्रीवादी
अभ्यासकांच्या टीकेचा विषय ठरतो.
२) उदारमतवादी स्त्रीवाद (Liberal
Feminism)-
उदारमतवादी
विचारसरणीचा उदय १८ व्या शतकात झाला. ही विचारधारा व्यक्तीस्वातंत्र्य व
व्यक्तिप्रतिष्ठेवर भर देणारी आहे. व्यक्तीप्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी
राज्यव्यवस्थेने अवाजवी बंधने लादू नये, कारण मानव
हा विवेकशील प्राणी असल्यामुळे स्वतःचे हित चांगल्या पद्धतीने जाणू शकतो. त्याच्या
उत्तम जीवनाची कल्पना स्वतः निर्धारित करू शकतो हा विचार प्रस्तुत केला.
व्यक्तीच्या खाजगी जीवनाच्या
विकासासाठी स्वातंत्र्य दिले पाहिजे याचे समर्थन उदारमतवादी करतात.
उदारमतवाद्यांनी पुरुषांबरोबर स्त्रियांनादेखील स्वातंत्र्य दिले पाहिजे यावर भर
दिला. मेरी बुलस्टोनक्राफ्टच्या 'दि व्हिडीकेशन ऑफ राईट्स ऑफ वुमन' (१९७२)
ग्रंथात पुरुष विवेकी, विचारप्रधान व धाडसी आहे तर स्त्रिया भावनाप्रधान, दुबळ्या
आहेत हा परंपरागत विचार नाकारला. स्त्रियांना समाजाने स्वातंत्र्य बहाल केले तर
त्या देखील धाडसी व विवेकी बनू शकतात हा विश्वास व्यक्त केला फ्रेंच राज्यक्रातीने
बहाल केलेले अधिकार स्त्रियांना प्रदान केले पाहिजे यावर भर दिला. जॉन मिल यांनी 'सब्जेक्शन
ऑफ वुमन' (Subjection of (Woman) हा ग्रंथ लिहिला. त्यांच्यावर उपयुक्ततावादी विचारवंत
जेरॅमी बेथंमचा प्रभाव होता. मिलचा ग्रंथ स्त्रीवादी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा
मानला जातो.. या ग्रंथात स्त्रियांच्या कुटुंबातील भूमिकेचे केल्या जाणाऱ्या
उदात्तीकरणावर जोरदार प्रहार केलेले आहेत. विवाहसंस्था व कुटुंबसंस्थेमुळे
स्त्रियाच्या स्वातंत्र्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल चर्चा केलेली आहे. स्त्रीमध्ये
कोणत्याही प्रकारची कमतरता नसतांना ती प्राचीन परंपरेचा बळी ठरली आहे. पुरूषप्रधान
व्यवस्थेद्वारे केलेले कायदे व परंपरा यांच्या साहाय्याने पुरुषांनी स्त्रियांना
मानसिक व बौद्धीक दृष्ट्या कमकुवत ठरविण्याचा प्रयत्न केला. तो नैसर्गिक दृष्ट्या
स्त्रियांना कमकुवत मानत नाही. लिया ह्या परंपरेच्या बळी ठरलेल्या आहेत. स्त्री
मुक्तीसाठी स्त्रियाचे प्रबोधन करणे गरजेचे मानतो. त्यामुळे स्त्रियांची प्रतिष्ठा
वाढून त्यांच्यात आत्मभान जागे होऊन त्या स्वतंत्र जीवन व्यतीत करू शकतील.
स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करावा. स्त्रीयांना संधी मिळाली तर त्या
पुरुषाच्या बरोबरीने आपली योग्यता सिद्ध करू शकतात. त्याकरिता स्त्रियांना
मालमत्तेत कायदेशीर हक्क द्यावा अशी मागणी जॉन मिल करतो. मिलने स्त्रीला व्यक्ती
म्हणून पुरुषांच्या बरोबरीने आपली भूमिका ठरविण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे याचे
समर्थन केले. स्त्रियांवर समाज व्यवस्थेने लादलेल्या जाचक निर्बंधांना मिल विरोध
करतो. स्त्रियांच्या उन्नतीसाठी जननक्षमतेवर नियंत्रण असले पाहिजे. अपत्य
संगोपनाची जबाबदारी कुटुंबामध्ये विभागली पाहिजे. स्त्री स्वातंत्र्य संकल्पनेत
पुरुष स्वातंत्र्याचा समावेश आहे. स्त्री स्वातंत्र्यामुळे काही स्वातंत्र्यांना पुरुषांना
मुकावे लागेल हे खरे असले तरी सार्वजनिक आणि कुटुंबाबाहेरील जबाबदारीतून काही
प्रमाणात सुटका होईल कारण काही जबाबदाऱ्या स्त्रिया आपल्या हातात घेतील असे मिलला
वाटते. हा दृष्टिकोन स्त्री-पुरुष समानता, स्त्री
शिक्षण व समान दर्जा यांना प्राधान्य देतो. मिल स्त्रीमुक्तीसाठी प्रबोधनाची गरज
विशद करतो. प्रबोधनाच्या माध्यमातून स्त्रियांचे आत्मभान विकसित होऊन त्या
स्वतंत्रपणे जीवन जगू शकतील. आपल्या विवेकाचा वापर करून आपल्या क्षमता सिद्ध करू
शकतील. मिलने स्त्री शिक्षण, नैतिक सुधारणा कायदेशीर सुधारणा आणि खियांच्या मतदान हकांचे
समर्थन: केलेले आहे. उदारमतवादाच्या मते स्त्री वर्ग हा दबावगटाची भूमिका पार पाडू
शकतो. हा दबावगट सी हक, शिक्षण आणि सेवा प्राप्त करण्यासाठी सरकारवर दबाव आणू शकतो.
उदारमतवादी बहुल समाज व्यवस्थेचे समर्थन करतात. उदारमतवादी सनदशीर मार्गाने आपले
हक प्राप्त करण्यासाठी श्री संघटनानी प्रयत्न करावेत. आणि श्री पुरुष समानता
प्रस्थापित व्हावी याबाबत आग्रही आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेने केलेल्या लैंगिक
पक्षपातावर हा दृष्टिकोन टीका करतो. परंतु हा दृष्टिकोन स्त्री स्वातंत्र्याचे
सनदशीर मार्गाने समर्थन करत असल्याने स्त्रीवादामध्ये या दृष्टिकोनाबद्दल असमाधान
दिसून येते. उदारमतवादी संघर्षाऐवजी • सहमतीस प्राधान्य देतात. व्यवस्थेला विरोध
करण्याऐवजी उत्क्रांतीच्या मार्गाने परिवर्तनाची भाषा करतो. स्त्री
स्वातंत्र्यासाठी संपूर्ण समाजव्यवस्थेत बदलाचा आग्रह धरत नाही. सर्व स्त्रियांच्या
हक्कांचे समर्थन करण्याऐवजी समाजातील विशिष्ट वर्गातील स्त्री स्वातंत्र्याबद्दल
आग्रह धरतो. सामूहिक मार्गातून स्त्रीमुक्तीचा विचार मांडण्याऐवजी वैयक्तिक
पातळीवर स्त्रीमुक्तीचा विचार मांडतात. खाजगी जीवनात स्त्रियांवर होणाऱ्या
अन्यायाकडे दुर्लक्ष करतात. वर्ग,
वंश, वर्ण इत्यादी आधारावर होणाऱ्या शोषणाची दखल घेत नाही.
स्त्रियांना स्वातंत्र्य प्रदान केल्यानंतर आपोआप त्या मुक्त होतील, असा व्यर्थ
आशावाद प्रकट करतात. उदारमतवादी स्त्रीवादावर अनेक आक्षेप घेतले जात असले तरी या
स्त्रीवादाने सर्वप्रथम स्त्रियांच्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधले हे नाकारता
येणार नाही.
३) जहाल स्त्रीवाद (Redical
Feminism)-
केल मिलेट, ख्रिस्तीनी डेल्फाय, जर्मेनी ग्रीअर, शुलामिथ फायरस्टोन यांनी जहाल स्त्रीवादाचे सिद्धांकन केलेले आहे. जहाल स्त्रीवाद ही स्त्रीमुक्तीबद्दल टोकाचा विचार मांडणारी विचारधारा मानली जाते. ही विचारधारा स्त्रीमुक्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी संपूर्ण समाजव्यवस्थेत सर्वांगीण परिवर्तन केले पाहिजे यावर भर देते. जहाल स्त्रीवादाच्या मते समाजाची विभागणी ही वर्गव्यवस्थेवर आधारित नसून तिचा आधार लिंगभेद आहे. पुरुषवर्गाच्या लैंगिक शोषणामुळे स्त्री दुय्यम ठरली आहे. पुरुषी वर्चस्व प्राचीन काळापासून प्रभावी असून सर्व प्रकारच्या शोषणाचे मूळ पुरुषी वर्चस्व आहे. जगाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास नसून लिंगभेदाच्या संघर्षाचा इतिहास आहे. या संघर्षातील स्त्री आणि पुरुष हे प्रमुख दोन वर्ग आहेत. स्त्री आणि पुरुष शारीरिकदृष्ट्या भिन्न आहेत. त्यांचा संबंध पुनर्निर्मितीशी आहे. शरीर शास्त्राने स्त्रीला पुरूषावर अवलंबून केल्यामुळे तिच्या वाट्याला अन्याय आलेला आहे. शारीरिक भेद आणि अपत्य निर्मितीसाठी पुरुषांवर असलेल्या अवलंबित्वामुळे स्त्रीच्या वाट्याला शोषणयुक्त जीवन आले.विवाह, गर्भारपण, मातृत्व इत्यादी गोष्टींच्या उदात्तीकरणातून पुरुषांनी स्त्रियांवर गुलामी लादलेली आहे. पण संतती नियमन साधने व वैज्ञानिक शोधामुळे स्त्रिया या मर्यादितून बाहेर पडतील म्हणून जहालवादी वैज्ञानिक क्रांतीचे स्वागत करतात. कृत्रिमरीत्या गर्भधारणेच्या तंत्रामुळे लैंगिकता म्हणजेच श्री ह्या समीकरणातून मुक्ती मिळेल. गर्भधारणा आणि अपत्यसंगोपन कार्यापासून मुक्ती म्हणजे पुरुषांच्या संगोपन आणि पालनपोषणाच्या कार्यापासून मुक्ती हा अर्थ राहील. पुरुषावरचे अवलंबित्व कमी झाल्यामुळे कुटुंबसंस्था नष्ट होईल. त्यातून स्त्री-पुरुषांचे साचेबंद स्वरूप नाहीसे होईल. शारीरिकतेवर आधारलेली कुटुंबसंस्था नष्ट झाल्यामुळे लैंगिक दडपणापासून स्त्रीला मुक्ती मिळेल आणि स्त्रिया निर्मितीक्षम आयुष्य जगू शकतील. स्त्रियांवरील बलात्कार, सक्तीची बाळंतपणे, सक्ती विवाह इत्यादींपासून सुटका करण्यासाठी लैंगिकतेचा जननेंद्रियाशी संलग्न केलेल्या अर्थाला छेद दिला पाहिजे. या नवीन बदलामुळे प्रस्थापित संस्था व मूल्यांचे वर्चस्व नष्ट होऊन स्त्री स्वतंत्र होईल असे त्यांना वाटते. शुलामिथ फायरस्टोनसारख्या जहालवादी स्त्रीच्या जुलुमाचे कारण अपत्य निर्मिती व अपत्य संगोपनाचे कार्यात आहे असे मानते. मातृत्वात स्त्री जीवनाची इतिकर्तव्यता मानणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेवर हल्ला करून मातृत्वाशिवाय असलेली स्त्रीजीवनाची अर्थगर्भता विशद करतात. केल मिलेट यांनी 'Sexual Politics' या ग्रंथात जहाल स्त्रीवादाची सविस्तर मांडणी केलेली आहे. स्त्रियांच्या शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेविरूद्ध जहाल स्त्रीवाद आक्रमक लढा देण्याची भाषा करतो. प्रस्थापित व्यवस्थेत स्त्रियांना न्याय मिळण्याची शक्यता नसल्यामुळे संपूर्ण समाजव्यवस्था बदलण्याचा आग्रह धरून समतेच्या पायावर नव समाज उभारणीची मागणी करतो. स्त्रीच्या शोषणाचे खरे कारण पुरुषसत्तेची सर्वंकषता मानतो. वंश, जात, वर्गीय शोषणाच्या मर्यादा उल्लंघून पुरुषसत्ताक लैंगिक श्रेष्ठत्वाचा प्रतिकार करते. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लिंगाधिष्ठित व्यवहाराला प्रश्नांकित करते. लैंगिक शोषणाद्वारे होणारे सामाजिक शोषणाचे विश्लेषण करून स्त्रीच्या निर्मितीक्षमतेला वाव देणाऱ्या समाजव्यवस्थेची उभारणी करण्याचा मानस मिलेट व्यक्त करतो.
जहाल
स्त्रीवादी कुटुंबसंस्थेला शोषणाचे प्रतीक मानतात. कुटुंबात स्त्रियांचे लैंगिक व
शारीरिक दोन्ही प्रकारचे शोषण होते. कुटुंबातील घरकामाबद्दल मोबदला दिला जात नाही.
त्या कामाला उत्पादन मानले जात नाही तर कर्तव्याशी जोडले जाते. मोबदला मिळत
नसल्यामुळे त्यांना पुरुषावर अवलंबून राहणे भाग पडते. विवाहाच्या नावाने
स्त्रियांचे शारीरिक व मानसिक शोषण केले जाते म्हणून जहाल श्रीवादी कुटुंबसंस्था व
विवाहसंस्थेला विरोध करतात. काही जहालवादी मातृसत्ताक व्यवस्थेचा आग्रह धरतात.
शरीरशास्त्राच्या नियमानुसार पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ अवल्याने मातृसत्ताक व्यवस्थेत खियाचे वर्चस्व वाढेल.
कुटुंब व्यवस्थेच्या बदलातून समाजव्यवस्थेत आपोआप बदल होईल. सर्वच जहाल श्रीवादी
कुटुबव्यवस्थेला विरोध करत नसून कुटुंब व्यवस्थेतील लैंगिक शोषण, लैंगिक •
विषमता आणि लैंगिक तत्त्वावर आधारित श्रमविभागणीला विरोध करतात.
कुटुंबसंस्थेप्रमाणेच राज्य व्यवस्थेने सत्तापदे आणि सर्वोच्च स्थानापासून
स्त्रियांना वंचित केले. 'जे जे वैयक्तिक आहे ते ते राजकीय (Personal is Politics) ही भूमिका घेऊन राजकीय क्षेत्रात अधिकार मिळविण्यासाठी
संघर्षाची भूमिका घेतात. जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्रियांच्या योगदानाची दखल
पुरुषकेंद्री इतिहासाने घेतली नाही. म्हणून स्त्रीवादी दृष्टिकोनातून मानवी
इतिहासाचे पुनर्लेखनाची गरज विशद करतात. लिंगभेदाच्या आधारावरील प्रतिमा, वाङ्मय
संहिता, भाषेचे
व्याकरण, संकेत
नाकारून स्त्रियांचे आत्मभान विकसित करणाऱ्या नव्या प्रतिमा वा संकेत निर्मितीचे
प्रतिपादन करतात. पुरुषप्रधान व्यवस्थेने निर्माण केलेल्या वर्चस्ववादी
मूल्यसंस्कृतीला आव्हानित करतात. जहाल स्त्रीवादी स्त्री वर्चस्वाची वकिली करत
असले तरी स्त्रीयांच्या आर्थिक शोषणाकडे दुर्लक्ष करतात. वैज्ञानिक प्रगती व
कुटुंब नियोजनाच्या साधनांच्या वापराने कुटुंब व्यवस्थेचे विघटन होईल याकडे
दुर्लक्ष करतात. जहालवादाच्या मते स्त्रिया स्वतंत्र जन्माला आलेल्या असून त्यांना
पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार असावेत. स्त्रियांना फाशीवर जाण्याचा अधिकार आहे
तसा संसदेत जाण्याचा अधिकार असावा. काही जहालवादी समलिंगी संबंधाचे समर्थन आणि
कुटुंब व्यवस्थेला विरोध या सारख्या जहाल पर्यायाचे समर्थन करतात. जहालवाद्यांच्या
मांडणीत विसंगती व विरोधाभास मोठ्या प्रमाणावर आढळतो. स्त्री अधिकारांची भाषा
करतांना पुरुषांना आपला शत्रू मानतात. पुरुषाशिवाय एकला चला रे ची भाषा करतात.
स्त्री स्वातंत्र्यासाठी समलिंगी संबंध, विवाह व
कुटुंबसंस्था नष्ट करणे, पुरूषांशी उघड उघड संघर्षाची भूमिका जहालवादी घेतात.
थोडक्यात
जहाल स्त्रीवाद बहुकेंद्री लैंगिकतेचे समर्थन करतो. राज्यसंस्था, कुटुंबसंस्था, अर्थव्यवस्था
आणि लिंगभेद व लैंगिक शोषणाशी संबंधित सर्वच पारंपरिक संकल्पनांना आव्हानित करून
पर्यायी कार्यक्रमाची मांडणी करतात.
४) मार्क्सवादी स्त्रीवाद (Socialist
Feminism)
मार्क्सवादी
आर्थिक नियामकवादाच्या आधारावर स्त्री प्रश्नाचे विश्लेषण करतात. खाजगी
मालमत्तेच्या निर्मितीत स्त्रियांच्या शोषणाची कारणे शोधतात. मार्क्सवादी
स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचे विश्लेषण ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधारे करतात.
त्यांच्यामते स्त्रियांचे दुय्यम स्थान आणि स्त्री-पुरुष भेद कृत्रिम स्वरूपाचे
असून स्त्रियांना कनिष्ठ दर्जाचे मूळ कुटुंब व्यवस्थेत आहे. उत्पादनाच्या खाजगी मालमतेचा परिणाम म्हणजे कुटुंब व्यवस्था होय. उत्पादनाच्या
खाजगी मालकी हक्कांचे निर्मूलन झाल्याशिवाय स्त्रियांना संपूर्ण समानता मिळणार नाही.
आदिम अवस्थेत स्त्री मातृत्वामुळे दुय्यम मानली जात नव्हती. मातृसत्ताक व्यवस्थेत
ती समाज व्यवस्थेच्या उच्च स्थानी विराजमान होती. समाजव्यवस्थेची सर्व सूत्रे
तिच्या हातात होती. परंतु मालमत्तेच्या हक्कांच्या उदयामुळे तिचे स्थान पसरले.
कार्ल
मार्क्सचा मित्र एंजेल्सने 'Origin
of Private Property and State' या ग्रंथात
कुटुंब व्यवस्थेचा उदय वा विकास कसा झाला? उत्पादन
साधनातील बदलामुळे कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांचे वर्चस्व नष्ट होऊन ती कनिष्ठ
स्थानी आली आणि पुरुषाची गुलाम बनली. जमीन व उत्पादन साधनांचे मालकी हक पुरुष
वर्गाकडे गेले. त्यास पुरुषप्रधान विवाह संस्थेने मदत केली. विवाह संस्थेद्वारे
स्त्रिया पुरुषांच्या दावणीला बांधल्या गेल्या. संपत्तीचा वारस असलेली मुले ही
पतीपासून निर्माण झालेली असली पाहिजेत ह्या बंधनामुळे स्त्रियांनी शुद्ध, पवित्र
राहिले पाहिजे हे नीतीमत्तेचे मापदंड विकसित केले गेले. मात्र पुरुषांसाठी दुहेरी
मापदंड निर्माण करून त्याला नीतिनियमांपासून सवलती देण्यात आल्या. संपत्तीचे
विभाजन होऊ नये म्हणून स्त्रियांवर एकपतीत्व लादले पण पुरुषांना अनेक विवाहांची
परवानगी दिली. स्त्री ही चूल आणि मूल यात सीमित झाली. स्त्रियांच्या वाट्याला
घरातील कामे आली. भांडवलशाहीच्या उदयामुळे स्त्रियांचे वेगाने अवमूल्यन सुरू झाले.
कमी वेतनात स्त्रिया काम करण्यास तयार झाल्यामुळे त्यांना नोकरीवर ठेवणे
भांडवलदाराला लाभदायक ठरले. कुटुंबातील कामाला मूल्य नसणे ही गोष्ट भांडवलशाही
व्यवस्थेला लाभदायक ठरली. एंजेल्सच्या मते उत्पादन व्यवस्थेतील खाजगी मालक
हक्कांचे उच्चाटन केले की, कुटुंब व्यवस्था आपोआप लयास जाईल. स्त्री बंधनमुक्त होऊन
तिचा विकास करील. उत्पादन व्यवस्थेतील खाजगी मालकी हक्क नष्ट करण्यासाठी
वर्गसंघर्ष अपरिहार्य आहे. त्या वर्गसंघर्षात स्त्रियांचा सहभाग असेल म्हणून ते
स्वतंत्र स्त्री मुक्ती चळवळीच्या विरोधी भूमिका घेतात. स्त्रीमुक्ती हा साम्यवादी
समाज निर्मिती लढ्याचा एक भाग मानतात. स्त्रीमुक्तीसाठी भांडवलशाहीच्या विरोधात
स्त्रियांना उभे राहण्याचे आव्हान करतात. साम्यवादी क्रांतीत स्त्रियांनी स्वतंत्र
व समान पातळीवर सहभाग घेतला पाहिजे यावर भर देतात. साम्यवादी व्यवस्थेत बालसंगोपन, कुटुंबातील
उत्पादक कामाची जबाबदारी घेतली जाईल, असे आश्वासन
देतात. भांडवलशाही व्यवस्थेतील वर्गलढा आणि स्त्री-पुरुष विषमता यांची सांगड
घालण्याचा प्रयत्न ऐतिहासिक द्रवादाच्या आधारावर करण्याचा मार्क्सवादी प्रयत्न
करतात. समान काम, समान वेतन,
घरकामाचे वेतन, सार्वजनिक
जीवनातील सहभागामुळे स्त्रियांचे शोषण थांबेल
हा आशावाद व्यक्त करतात. या सर्व मांडणीत समाजवादी आर्थिक घटकाला प्राधान्य देतात, परंतु ते
ऐतिहासिक घटक वंशभेद, सांस्कृतिक मूल्ये, धार्मिक
दृष्टिकोन इ.कडे मार्क्सवादी दृष्टिकोन दुर्लक्ष करतो. स्त्रियाच्या शोषणाला पुरूष
वर्चस्व कारणीभूत आहे हे वर्चस्व फक्त आर्थिक घटकामुळे निर्माण होत नसून सामाजिक
घटकामुळे निर्माण होते हे वास्तव मार्क्सवादी लक्षात घेत नाही. स्त्रियाच्या
शोषणाचे मूळ आर्थिक घटकात शोधण्याचा प्रयत्न करतात. साम्यवादाच्या स्थापनेतून शोषण
संपेल हा भाबडा आशावाद व्यक्त करतात. परंतु साम्यवादाच्या स्थापनेनंतरही शोषण
संपले नाही या वास्तवतेकडे दुर्लक्ष करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.