https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

हमीद दलवाई जीवन आणि कार्य


  हमीद दलवाई जीवन आणि कार्य

     मुस्लीम समाजात बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार व्हावा आणि न्यायावर आधारित समाज निर्मितीची स्थापना व्हावी यासाठी प्रयत्न करणारे हमीद दलवाई हे मुस्लीम समाजातील प्रथम व्यक्ती होते. समाजातील सामाजिक आणि धार्मिक पूर्वग्रह नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या अल्पायुष्यात अथक प्रयत्न केले. भारतातील प्रसिद्ध इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा यांनी संपादित केलेल्या 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' या ग्रंथात भारतातील एकवीस मान्यवरांमध्ये हमीद दलवाई यांचा समावेश फैला यातून त्यांच्या कार्यातील महानता लक्षात येते. त्यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मिरजोळी गावी झाला. माध्यमिक शिक्षण चिपळूण येथे झाले. मुंबईच्या युसूफ व रूपारेल कॉलेजमध्ये इंटरमिजियेट आईसचे शिक्षण घेतले. 

    १९५४ ते १९६३ या काळात विविध ठिकाणी छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या. नोकऱ्यांसोबत राष्ट्रीय सेवादल व समाजवादी पक्षात काम करत राहिले. या काळात त्यांच्यावर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव होता. परंतु, मुस्लीम समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष कार्य करीत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर राजकीय क्षेत्रातून बाहेर पडले. मुस्लीम समाजात प्रबोधन घडवून आणण्यासाठी लेखन करत राहिले. 'लाट' (१९६१) कथासंग्रह, 'इंधन' (१९६५) कादंबरी, मुस्लीम जातीचे स्वरूप, कारणे व उपाय (१९६८), 'इस्लामचे भारतीय चित्र मुस्लीम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया' (१९७०) आणि 'इस्लामचे भारतीय चित्र' (१९८२) इत्यादी पुस्तके लिहिली पुस्तकाशिवाय विविध वर्तमानपत्रे, नियतकालिके, मासिके यांत वैचारिक लेखन करून मुस्लीम समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. १९६३ ते १९६८ पर्यंत 'मराठा' दैनिकात पत्रकारिता केली. मुस्लीम स्त्रियांची दयनीय परिस्थिती समाजापुढे आणण्यासाठी १८ एप्रिल १९६६ रोजी त्यांनी कौन्सिल हॉलवर सात मुस्लीम स्त्रियांचा मोर्चा काढला. हा मोर्चा मुस्लीम प्रबोधनवादी चळवळीची नांदी ठरला. समाजसुधारणेच्या कार्याला पूर्ण वेळ देण्यासाठी १९६८ साली नोकरी सोडली. अ. भि. शहांसोबत 'इंडियन सेक्यूलर सोसायटी' स्थापन केली. या संस्थेचे कार्य करताना 'मुस्लीम सत्यशोधक समाज' स्थापन करण्याचा विचार सूचला. २२ मार्च १९७० रोजी दलवाई यांच्या प्रयत्नाने मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. स्वातंत्र्य, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेच्या आधारावर मुस्लीम समाजाची पुनर्घटना करणे आणि मुस्लीम मुस्लिमेतरात, धर्मनिरपेक्ष राज्याच्या चौकटीत समतेच्या आधारावर सुसंवाद घडवून आणणे ही दोन प्रमुख उद्दिष्टे मंडळाची होती. हिंदू धर्माप्रमाणे मुस्लीम धर्मामध समाजसुधारकांची परंपरा त्यांना सुरू करावयाची होती. मंडळाच्या कार्यात डॉ. ब आढाव, भाई वैद्य, अ.भि.शहा, नरहर कुरूंदकर, मोईन शाकिर, प्रा. असफ ए.ए. यदुनाथ थत्ते, अन्वर शेख, अशीर तांबोळी यांचे सहकार्य लाभले. हमीद दल म्हणतात की, “भारतातील मुस्लीम संस्कृतीने मला घडविले आहे. या संस्कृती ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, त्यांचा मला अभिमान आहे आणि ज्य विद्रूप गोष्टी आहेत त्या बदलल्या पाहिजेत.” वरील भूमिका घेऊन त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. मुस्लीम समाजाचे आकलन करून घेण्यासाठी ते भारतभा फिरले. परंपरेच्या जोखडात अडकलेल्या मुस्लीम समाजात सुधारणा घडवून आणण्याच्य तळमळीने ते कार्य करीत राहिले.

हमीद दलवाईंना मुस्लीम समाजात समाजसुधारणा करण्याच्या ध्यासाने पछाडलेले होते. ते सांगतात की, "मुस्लीम समाजात माझा जन्म झाला आहे. मुस्लीम समाज व धर्मांची चिकित्सा करणे हे माझे कर्तव्य व ध्येय आहे. जेव्हा हिंदू उदारमतवादी हिंदू जमातवादाबरोबर मुस्लीम जमातवादासंदर्भात चिकित्सा करतील तेव्हा माझे मुस्लीम चिकित्सेचे काम थांबवेन." मुस्लीम जमातवादाचा प्रतिकार करणारे हिंदू हे हिंदूंना सनातनी बनविण्याचे प्रयत्न करत आहेत आणि जे हिंदू देशाला आधुनिकतेकडे नेण्याची भाषा करत आहेत ते मुस्लीम जमातवाद्यांना मिठ्या मारत आहेत हे चित्र बदलण्यासाठी हमीद दलवाई यांनी कार्य सुरू केले. या अल्पावधीत त्यांनी मुस्लीम समाजाला हादरा देऊन जागतिक इस्लामच्या इतिहासातील क्रांतिकारी चळवळ सुरू केली. १९६६ ते १९७७ या काळात भारतभर दौरे केले. सभा, संमेलने, परिषदा, मोर्चे यांच्या माध्यमातून मुस्लीम समाजात जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या कार्यात सय्यदभाई, मुनीर सय्यद, मकबूल तांबोळी, अमीर शेख, अन्वर शेख, रफीऊद्दीन सय्यद, बशीर तांबोळी, हुसेन जमादार, एन. आर. बारगीर, महंमदगौस नाईक, आय.एन.बेग, मुमताज रहिमतुरे यांच्या सहकार्याने आपले कार्य चालू ठेवले. हमीद दलवाई यांना १९६६ ते १९७७ अशी अकरा वर्षे काम करायला मिळाले त्यातील दोन वर्षे तर आजारपणात वाया गेली. त्यांनी सुरू केलेल्या कार्यामुळे मुस्लीम जमातवादी चिडले. जमातवाद्यांनी त्यांना इस्लामविरोधक, काफीर, हिंदूंचा एजंट इत्यादी आरोप लावून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. धमक्या आणि हल्ल्याचे प्रयत्न झाले. मृत्यूनंतर मुंबई व पुणे महानगरपालिकेतील मुस्लीम नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहण्यास विरोध केला. 

नरहर कुरूंदकर यांच्यासारखा अभ्यासक सांगतो की, "तेराशे वर्षांच्या परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या हमीद दलवाईंसारख्या बंडखोराला पाहता पाहता तीन-चारशे अनुयायी मिळाले." यातून त्यांच्या कार्यातील अडचणींची जाणीव होते. आपल्या भूमिकेला योग्य प्रतिसाद मिळत नसतानाही आपले कार्य चालू ठेवले. इस्लामला चिकित्सा मान्य नाही. इस्लाम धर्मात 'अल्ला' हा एकमेव ईश्वर आहे आणि महंमद पैगंबर हा अल्लाचा दूत आहे. अल्लाने दिलेले संदेश पैगंबराने कुराणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविले ही इस्लामची अधिकृत भूमिका आहे. या भूमिकेला आव्हान करण्याची हिम्मत कुणीही दाखविली नाही. हमीद दलवाई यांनी इस्लामच्या अधिकृत भूमिकेला आव्हानित करण्याचा प्रयत्न केला. महंमद हा देवाचा दूत नसून मनुष्य आहे. कुराण हा देवाने लिहिलेला ग्रंथ नसून महंमदाने लिहिलेला आहे. त्या काळात कुराणातील नियम योग्य असले तरी बदलत्या परिस्थितीत त्यात बदल केला पाहिजे. कुराणातील चुकीचे वा कालबाह्य नियम रद्द केले पाहिजेत ही भूमिका त्यांनी घेतल्यामुळे इस्लाम जगत त्यांच्या विरोधात गेले. कुराणातील कालबाह्य गोष्टींना सोडण्याचे आव्हान केले. कुराणातील आज्ञांचे पालन करताना आजच्या परिस्थितीचा संदर्भ लक्षात घ्यावा हा आग्रह बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेची साक्ष देणारा आहे.

     हमीद दलवाई १९७६ मध्ये अमेरिकेत भरलेल्या 'वर्ल्ड युनिटी कॉन्फरन्स'ला हजर राहिले. या परिषदेत आपली भूमिका मांडली. हमीद दलवाई यांनी तलाक बंदी, तोंडी तलाकवर बंदी, मुस्लीम स्त्रियांना पोटगीचा अधिकार, घटस्फोटित मुस्लीम स्त्रियांचे पुनर्वसन, मुस्लीम समाजात शिक्षण प्रसार, मुस्लीम पर्सनल कायदा रद्द व्हावा आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी इत्यादी क्षेत्रात आपले कार्य सुरू केले. वक्फ या मुस्लीम धार्मिक इस्टेटीच्या चौकशीची मागणी केली. या इस्टेटीचा विनियोग गरीब मुलांच्या शिक्षणासाठी करावा. उर्दू माध्यमांच्या शाळा बंद करून ही भाषा ऐच्छिक विषय म्हणून शिकवावी. अशा क्रांतिकारी मागण्या त्यांनी केल्या. रूढी आणि परंपरेच्या जंजाळात सापडलेल्या मुस्लीम समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या हमीद दलवाई यांना मुस्लिमांमधील फुले वा आंबेडकर मानले जाऊ लागले. समाजाकडून उपहास वाट्याला येऊनही त्यांनी आपल्या कार्याचा वसा सोडला नाही. मंडळाच्या माध्यमातून मोर्चे, शिबिरे, परिषदा, सभा आणि संभाषणे चालू ठेवले. प्रादेशिक भाषेतून मुस्लिमांना शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले.

     धर्मचिकित्सा आणि धर्मसुधारणेचा विरोध असलेल्या इस्लाम धर्मात सुधारणेचा खडतर मार्ग हमीद दलवाईंनी प्रशस्त केला. आपले विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी इतरांच्या सहकार्याने सेक्युलर फोरम स्थापन करून 'सेक्युलॅरिस्ट' हे नियतकालिक काढले. त्यांच्या कार्यानि मुस्लीम समाजात खळबळ माजली. कुराण व शरीयत ईश्वरी कायदे आहेत त्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही या इस्लाम भूमिकेला विरोध करून त्यात काळानुरूप बदल करण्याची भाषा करणारे ह दलबाई हे बंडखोर समाजसुधारक होते. नरहर कुरूंदकर म्हणतात की, दलवाईच्या रूपाने मुस्लीम समाजाला नवे सुधारणावादी नेतृत्व मिळाले. ते त्यांचे वर्णन 'उगवत तारा' असे करतात. मुस्लीम समाजाला स्वरचित कोषातून बाहेर काढण्याचा विचार त्यांनी मांडला. देशाला शक्तिमान बनविण्यासाठी समाजाला शास्त्रीय आणि विज्ञाननि पायावर उभे करणे आवश्यक असते. प्रगतीच्या मार्गात आडवी येणारी धार्मिक मते या कल्पना दूर सारण्याची प्रक्रिया समाजात सुरू झाली की तो समाज प्रबोधनाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. इस्लामसारख्या सुधारणेला विरोध करणाऱ्या धर्मात प्रबोधनाची ज्योत पेटविणारे हमीदभाई अवघ्या ४५ व्या वर्षी ३ मे १९७७ रोजी वारले. अल्पवयात झालेल्या निधनामुळे त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य त्यांची पत्नी मेहरून्निसा दलवाई आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. दलवाई है। विसाव्या शतकातील मुस्लीम प्रबोधनाचे खरे प्रतिनिधी होते. मुस्लीम समाजाला आधुनिक आणि विज्ञानवादी बनविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. मानवी मूल्ये ही धार्मिक मूल्यांपेक्षा श्रेष्ठ मानली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.