जिल्हा प्रशासनाचा उद्देश आणि कार्ये-
जिल्हा प्रशासनाचे उद्देश
बहुमुखी
आणि
व्यापक
आहेत.
हे उद्देश
पूर्ण
करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विविध प्रकारची कार्ये पार
पाडावी
लागतात.
केंद्र
आणि
राज्य
प्रशासनानंतर जिल्हा प्रशासन
हा लोकप्रशासनातील महत्त्वपूर्ण घटक
मानला
जातो.
केंद्र
आणि
राज्य
शासनाने
दिलेले
आदेश
आणि
कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा
प्रशासनाला पार पाडावी
लागते.
जिल्हा
प्रशासनाला पुढील कामे
पार
पाडावी
लागतात
१)
जन सुरक्षा- कायदा
आणि
सुव्यवस्थेचे रक्षण करणे
हे जिल्हा
प्रशासनाचे प्रमुख काम
असते.
कायद्याने जनतेला बहाल
केलेल्या स्वातंत्र्याच्या रक्षणाची जबाबदारी जिल्हा
प्रशासनाकडे सोपविलेली असते.
कायदा
व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक
उपाययोजना करणे, कायदा
व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करणे
इत्यादीसाठी आवश्यक अधिकार
जिल्हा
प्रशासनाला प्रदान केलेले
आहेत.
सुरक्षा
ही मानवाची
प्राथमिक गरज आहे.
जन सुरक्षा
असेल
तर प्रशासन
चालविणे
आणि
विविध
कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे
सोयीचे
जाते.
जिल्हा
प्रशासनाचे प्रमुख लक्ष्य
जन सुरक्षा
असते.
२)
कर संकलन करणे-कर संकलन
हे जिल्हा
प्रशासनाचे प्रमुख काम
असते.
कर संकलनाचे कार्य योग्य
पद्धतीने पार पाडण्यासाठी संपूर्ण महसूल
यंत्रणा
जिल्हा
प्रशासनाकडे सोपविलेली असते.
जिल्ह्यातील सर्व महसूल
जमा
करून
शासकीय
कोषागारात जमा करण्याचे कार्य जिल्हा
प्रशासन
पार
पाडत
असते.
शासनाचा
डोलाराहा कर व महसुलावर चालत असतो.
जिल्हा
प्रशासनाने योग्य पद्धतीने कर वसुली
केल्यास
राज्याच्या तिजोरीत मोठ्या
प्रमाणावर महसूल जमा
होईल
आणि
ही रक्कम
राज्यातील विकास कार्ये
राबविण्यासाठी उपयोगी ठरेल.
कर वसुली
कर मूल्यमापन व संग्रहण
ही जिल्हा
प्रशासनाची महत्त्वपूर्ण कार्ये
मानली
जातात.
स्टॅम्प
व कोर्ट
फी घर नियंत्रण ठेवणे, वस्तू
आणि
सेवा
कर वसुली, अबकारी
कर, सिंचन
कर, कृषी
कर जिल्हा
प्रशासनाकडून वसूल केले
जातात.
३)
वित्तीय कार्ये- जिल्हा
कोषागार
व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा
प्रशासनाकडे सोपविलेली असते.
जिल्हा
कोषागार
अधिकारी
हा जिल्हाधिकारीच्या नियंत्रणाखाली कार्य
करत
असतो.
कोषागार
व्यवस्थेसंबंधीची सर्व कार्ये
जिल्हा
कोषागार
अधिकान्याच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली चालत असतात.
विविध
प्रकारची कर वसुली
करणे, कर कोषागार
जमा
करणे
आणि
त्याबद्दलची माहिती राज्यशासनाला कळविणे हे कोषागार
विभागाचे काम जिल्हा
प्रशासनाचा एक भाग
मानले
जाते.
४)
विकासविषयक कार्ये- जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी आवश्यक
कार्ये
जिल्हा
प्रशासनाकडे सोपविलेली असतात.
जिल्हा
नियोजन
समितीत
जिल्हा
विकासाचा आराखडा तयार
केला
जातो.
जिल्हाधिकारी हा जिल्हा
नियोजन
समितीचा
सचिव
असतो.
जिल्हा
नियोजन
समितीने
मंजूर
केलेल्या आराखड्यानुसार विकास
कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
हे जिल्हा
प्रशासनाचे कार्य असते.
५)
स्थानिक संस्थांवर नियंत्रण- लोकशाही विकेंद्रीकरणाच्या उद्देशाने शहरी आणि
ग्रामीण
स्थानिक
स्वराज्य संस्थेची स्थापना
केलेली
आहे.
या संस्थांकडे अनेक लोककल्याणकारी कार्याची जबाबदारी सोपविलेली आहे.
स्थानिक
स्वराज्य संस्थांकडून केल्या
जाणाऱ्या कार्यावर जिल्हा
प्रशासनाचे नियंत्रण असते.
या संस्थांनी योग्य पद्धतीने कार्य न केल्यास
त्यावर
कारवाई
करण्याचा अधिकार जिल्हाधिकान्याला असतो. या संस्थांनी केलेल्या कामाची
चौकशी
करण्याचा व निरीक्षण करण्याचा अधिकार
जिल्हाधिकाऱ्यांना असतो.
६)
संकटकालीन कार्ये- जिल्हा
प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी पार
पाडावी
लागते.
दुष्काळ, भूकंप, पूर, अतिवृष्टी, आग ही संकटे
सांगून
येत
नसतात.
नैसर्गिक संकटे केव्हाही येऊ शकतात
म्हणून
या संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जाते.
त्यासाठी जिल्हा प्रशासनात आपत्ती व्यवस्थापन नावाचा स्वतंत्र विभाग निर्माण
केला
जातो.
या विभागाकडून नैसर्गिक संकटांच्या काळात घ्यावयाच्या दक्षतांबाबत जनतेला
सूचना
केल्या
जातात.
जनतेचे
प्रबोधन
केले
जाते.
संकटकाळात सर्व प्रकारची मदतदेखील उपलब्ध
करूनदिली जाते. कमीत
कमी
मनुष्य
आणि
वित्तहानी होईल याकडे
लक्ष
पुरविण
जिल्हा
प्रशासनाचे कार्य असते.
७)
निवडणूक विषयक कार्ये - भारतात केंद्र
आणि
राज्य
पातळीवर
निवडणूक
आयोगाची
स्थापना
केलेली
आहे.
परंतु, आयोगाकडे निवडणुका घेण्यासाठी आवश्यक यंत्रणा
दिलेली
नाही.
राज्य
व केंद्रीय आयोगाला निवडणुका घेण्यासाठी सर्व
प्रकारची मदत व सहकार्य
जिल्हा
प्रशासनाने उपलब्ध करून
द्यावे
लागते.
मतदार
यादी
तयार
करण्यापासून ते निकाल
घोषित
करण्यापर्यंतची सर्व कामे
जिल्हा
प्रशासनाकडून पार पाडली
जातात.
जिल्हाधिकारी हा जिल्हा
निवडणूक
अधिकारी
असतो.
त्याच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक
विषयक
सर्व
कार्ये
पार
पाडली
जातात.
८)
जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणे- नागरिकांना जीवनावश्यक वस्तू
योग्य
किमतीत
आणि
योग्य
प्रमाणात पुरविणे हे जिल्हा
प्रशासनाचे काम असते.
जीवनावश्यक वस्तू पुरवठा
करण्यासाठी जिल्हा पुरवठा
अधिकान्यांच्या मार्गदर्शनाखाली रेशनिंगची व्यवस्था केलेली
असते.
रेशनिंगच्या माध्यमातून गहू, तांदूळ, रॉकेल, खाद्यतेल आणि आवश्यक
वस्तू
कमी
किमतीत
नागरिकांना उपलब्ध करून
दिल्या
जातात.
९)
अंमलबजावणीविषयक कार्ये- केंद्रीय आणि राज्य
कार्यकारीमंडळ आखलेली धोरणे
व कार्यक्रम आणि संसद
आणि
विधिमंडळाने केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपविलेली असते.
अंमलबजावणीच्या कार्यासाठी आवश्यक
वित्तीय
मदत
उपलब्ध
करून
दिलेली
असते.
अंमलबजावणीचे कार्य व्यवस्थित पद्धतीने पार
पाडण्यासाठी आवश्यक अधिकार
जिल्हा
प्रशासनाला बहाल केलेले
आहेत.
१०)
इतर कार्ये-वरील
कार्याशिवाय कृषी, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, सिंचन
व उद्योग
क्षेत्रांशी निगडित अनेक
कार्ये
जिल्हा
प्रशासनाकडे सोपविलेली आहेत.
या क्षेत्रातील कार्ये पार
पाडण्यासाठी आवश्यक साधनसामग्री जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून
दिली
जाते.
वरील
कार्यांचा विचार करता
जिल्हा
प्रशासनाकडे अत्यंत व्यापक
स्वरूपाची कार्ये सोपविलेली आहेत. कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे जिल्हा प्रशासनावरील कामाचा व्याप
दिवसेंदिवस वाढत चाललेला
आहे.
जनतेचा
जिल्हा
प्रशासनाशी अत्यंत निकटचा
संबंध
असतो.
जनता
जिल्हा
प्रशासनाकडून अधिकाधिक कामाची
अपेक्षा
करत
असते.
या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी जिल्हा
प्रशासनावर येऊन पडलेली
आहे
यादृष्टीने लोकप्रशासनातील हा महत्त्वपूर्ण विभाग बनलेला
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.