वस्तुनिष्ठता अर्थ व व्याख्या, महत्व, आवश्यकता,समस्या वा प्राप्तीतील अडथळे आणि साधने
(Objectivity)
सामाजिक
संशोधनात व्यक्तिनिष्ठ अभ्यास
आणि
वस्तुनिष्ठ संशोधन हे दोन
प्रकार
आहेत. व्यक्तिनिष्ठता ही एक विचारशक्ती असते. ती शैक्षणिक पार्श्वभूमी, प्रशिक्षण, बौद्धिक
क्षमता
आणि
तात्त्विक दृष्टीकोन या घटकातून विकसित होते. या सर्व
घटकांच्या प्रभावामुळे प्रत्येक समस्येकडे बघण्याचा आणि अर्थ
लावण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन व्यक्तीत विकसित झालेला
असतो.
व्यक्तिनिष्ठ संशोधनात संशोधकाच्या विकसित झालेल्या दृष्टीकोनाचा प्रभाव पडत असतो
त्यासोबत संशोधकाचा पूर्वग्रहाचा देखील प्रभाव
पडत
असतो.
पूर्वग्रहाचे अस्तित्व अभ्यास
विषयातील लक्षात आलेले सत्य लपविण्याचा प्रयत्न
करते.
संशोधन
कार्य
पूर्वग्रहावर आधारित असता
कामा
नये.
वस्तुनिष्ठता पूर्वग्रहाचा प्रभाव
कमी
करण्याचा प्रयत्न केला
जातो.
वस्तुनिष्ठताचा अर्थ व व्याख्या- वस्तुनिष्ठता म्हणजे
नेमके
काय
हे जाणून
घेण्यासाठी अभ्यासकांनी केलेल्या व्याख्याचा अभ्यास करणे आवश्यक
आहे.
उदाहरणासाठी काही विचारवंतांनी केलेल्या वस्तुनिष्ठतेच्या व्याख्या पुढील
प्रमाणे होत.
१.ग्रीन-निष्पक्षपणे घटनेचे, समस्येचे परीक्षण म्हणजे
वस्तुनिष्ठता होय.
२.जे कार- सत्याची वस्तुनिष्ठता म्हणजे असाधारण किंवा अद्भुत जग कोणत्याही विश्वास, आशा. एक वास्तविकता आहे. ज्याचा शोध आपण अंतःदृष्टी किंवा कल्पनाद्वारे नाही तर वास्तविक निरीक्षणातून घेतो.
३.फेअरचाईल्ड- तथ्यांच्या प्राप्तीत पक्षपात, पूर्वग्रह यांचा अवलंब
न करता
प्रमाण
व तर्क
यांच्या
आधाराव
डण्याची
योग्यता
म्हणजे
वस्तुनिष्ठता होय.
४.पूर्वप्रभाव न पडू
देता
संशोधन
समस्येचा अभ्यास करणे
म्हणजे
वस्तुनिष्ठता होय.
५.मोझस आणि कॅटलन- एकसारख्या परिस्थितीत पुन्हा
पुन्हा
चाचण्या
केल्यानंतर तेच परिमाण
वा निष्कर्ष निघत असतील तर त्याला वस्तुनिष्ठता मानता येईल.
साधनाचा वापर करून एकसारखेच निष्कर्ष प्राप्त
करण्याला वस्तुनिष्ठ मानले
जाते.
वस्तुनिष्ठतेच्या माध्यमातून संशोधन समस्येतील स्थेतील प्रमाण कमी
केले
जाते.
संशोधनाला अधिक शास्त्रीय बनविण्याचा प्रयत्न
केला
जातो
वस्तुनिष्ठतेच्या समस्या वा वस्तुनिष्ठता प्राप्तीतील अडथळे- शास्त्रीय संशोधनात निष्पक्षपातीपणा व पुराव्याच्या आधारावर काढलेले निष्कर्ष
वस्तुनिष्ठतेची साक्ष देतात परंतु सामाजिक
संशोधनात नैसर्गिकशास्त्र आणि
विज्ञानासारखी वस्तुनिष्ठता निर्माण करणे अनेकदा शक्य
होत
नाही.
सामाजिक
घटनाचे
सर्व
पैलू
संशोधकाच्या दृष्टोत्पतीला येत
नाही.
विशिष्ट
परिस्थिती निर्माण करून
प्रयोग
देखील
करता
येत
नाही.
संशोधक
हा समाजव्यवस्थाचा एक घटक
असतो.
समाजव्यवस्थाचा एक घटक या नात्याने समाजातील संस्कृती, पूर्वग्रह, परंपरा, श्रद्धा
व भावनेचा
त्यांच्यावर प्रभाव पडत
असतो.
या प्रभावामुळे समाजात संशोधत
वस्तुनिष्ठतेपेक्षा व्यक्तिनिष्ठेकडे जास्त झुकते. शंभर टक्के बिनचूक संशोधन
पद्धती
वापरणे
अशक्य
आहे.
वस्तुनिष्ठतेवर परिणाम करणान्या घटकावर नियंत्रण ठेवणे शक्य
होत
नाही.
सामाजिक
संशोधनात संशोधन समस्येचा अभ्यास करताना
पुढील
गोष्टीमुळे वस्तुनिष्ठता जोपासणे कठीण बनते
१.समस्या निवडीवर मूल्यांचा प्रभाव
पडणे.
२.
संशोधकाला अध्ययन विषयाशी
संपूर्णपणे अलिप्त राहता
येत
नाही.
सामाजिकशास्त्रात निवडलेला अध्ययन
विषया
समाजाशी
निगडीत
असतो.
संशोधक
हा समाजाचा
एक घटक
असल्यामुळे त्यांच्या मनात
कळतनकळत
पक्षपाताची भावना निर्माण
होते.
सामाजिकशास्त्रात वस्तुनिष्ठता प्राप्त
करणे
जिकरीचे
बनते.
३.
सामाजिकशास्त्रात मानवी व्यवहाराचा अभ्यास केला
जात
असल्यामुळे संशोधकाच्या भावनात्मक दृष्टीचा संशोधनावर प्रभाव पडतच
असतो.
संशोधकाला मानवी व्यवहार
परिचित
असतात.
आपल्या
पूर्वानुभवाच्या आधारावर तो निष्कर्ष काढण्याची शक्यता
असते.
संशोधकाच्या भावनात्मक दृष्टीच्या प्रभावामुळे वस्तुनिष्ठता राखणे अवघड
बनते.
४.
संशोधक
सामान्य
ज्ञानला
वास्तविक ज्ञान मानतो.
वास्तविक ज्ञानापासून दूर
जातो
परिणातः
संशोधनातील वस्तुनिष्ठता संपते.
५.
संशोधन
साधनाचा
वापर
करताना
वापरल्या जाणाऱ्या भाषेतील
संग्दिधता संशोधनाच्या वस्तुनिष्ठेतवर परिणाम करते.
६.
संशोधन
तंत्राचा वापर करताना
संशोधकाने रचनेत बदल
केला
तरी
सुरूवातीचा प्रतिसाद आणि
नंतरच्या प्रतिसादात फरक पडतो.
उदा.
मुलाखतीच्या प्रश्नाचे स्वरूप
बदलल्यास
७.
प्रतिसादक आणि संशोधकाच्या मानसिकतेचा देखील
वस्तुनिष्ठतेवर प्रभाव पडतो.
८.
संशोधन
साधनाचा
अयोग्य
पद्धतीने वापर केल्यास
वस्तुनिष्ठता धोक्यात येते.
९.
सामाजिकशास्त्रातील संशोधनात संशोधकाला तटस्थता राखता
येत
नसल्यामुळे तो अनेकदा
पूर्वग्रह वा पक्षपातील बळी पडतो. ही संशोधकाची वृत्ती वस्तुनिष्ठतेवर परिणाम करते.
११.
संशोधनावर बाहा आणि
अहितकारक प्रभाव व हस्तक्षेपामुळे वस्तुनिष्ठता राखणे
अवघड
बनते.
संशोधन
समस्येत हितसंबंध गुंतलेले लोक
वस्तुनिष्ठ माहिती बाहेर
येऊ
नये
म्हणून
प्रयत्न
करतात.
१२.
सामाजिक
घटकांची
अमूर्तता व जटिल
प्रवृत्तीमुळे वस्तुनिष्ठता न राखता
येणे.
१३.
व्यक्तिगत मताच्या प्रभावामुळे एखादया कारकावर
अधिक
भर देणे.
संशोधक
हा आपल्या
व्यक्तिगत स्वार्थासाठी वस्तुनिष्ठेपासून दूर राहतो.
१४.
वास्तविक ज्ञान व सामान्य
याबाबतच्या संशोधकाच्या द्विधा
परिस्थितीचा संशोधनावर परिणाम
होणे.
१५.
संशोधक
हा समाजाचा
घटक
असल्यामुळे समाजातील मूल्ये
व आदर्शाचा त्यांच्यावर प्रभाव
पडत
असतो.
नैतिक
पर्यावरणापासून तो स्वतःला
अलिप्त
ठेवू
शकत
नाही.
समाजाच्या नैतिक पर्यावरणाच्या आधारावर आपले
नैतिक
मापदंड
निश्चित
करतो.
अध्ययन
करताना
आपल्या
मापदंडाच्या आधारावर निर्णय
घेत
असल्यामुळे वस्तुनिष्ठता राखणे
शक्य
होत
नाही.
१६.
पक्षपात, पूर्वग्रहाच्या प्रभावामुळे वस्तुनिष्ठता पाळता न येणे.
समाजिकशास्त्रातील संशोधनात वरील
मुद्यांमुळे वस्तुनिष्ठता जोपासणे
अवघड
असते.
परंतु
व्यक्तिनिष्ठतेपासून अलग राहून वस्तुनिष्ठता निर्माण
करण्याचा प्रयत्न संशोधकाने करणे गरजेचे
असते.
वस्तुनिष्ठता हे एक शास्त्रीय मूल्य आहे.
हे मुल्य संशोधनाच्या दर्जा वाढीसाठी उपयुक्त मानले
जाते.
वस्तुनिष्ठता प्राप्तीची साधने- संशोधनाला वैज्ञानिक व शास्त्रीय दर्जा मिळवून
देण्यासाठी ते वस्तुनिष्ठतेच्या कसोटी केले पाहिजे.
मॅक्स
वेबरसारख्या अभ्यासकांच्या मतानुसार सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता राखणे
अवघड असते तर दुर्खीमच्या मतानुसार सामाजिक संशोधन
हे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केली
जाऊ
शकते.
वस्तुनिष्ठता प्राप्तीसाठी खालील मार्गाचा अवलंब करणे आवश्यक
असते.
१.संशोधनात वस्तुनिष्ठता प्राप्त
करण्यासाठी अधिकाधिक प्राथमिक साधनाचा वापर
करणे
गरजेचे
असते. प्राथमिक साधनातून झालेले तथ्यसंकलनात पूर्वग्रहाचा प्रभाव
कमी
असतो.
२. सामाजिकशास्त्रात वस्तुनिष्ठता प्राप्त
करण्यासाठी प्रश्नावली व अनुसूची
तंत्राचा उपयोग करणे
योग्य
असते.
या तंत्रा मध्ये पूर्वग्रहाचे अस्तित्व फार
कमी
असते.
३. सामाजिकशास्त्रातील संशोधनात पारिभाषिक शब्द आणि
संकल्पनाचे प्रमाणीकरण वस्तुनिष्ठतेसाठी आवश्यक जाते.
संकल्पनाचे प्रमाणीकरणामुळे शब्दाचा
अर्थ
सर्व
स्थानावर समान असतो.
अर्थावरून संदिग्धता निर्माण शक्यता नसल्यामुळे वस्तुनिष्ठता प्राप्त करणे
सहज
शक्य
होते.
४. वस्तुनिष्ठता प्राप्त करण्यासाठी नमूना निवडीच्या यादृच्छिक पद्धतीचा वापर करणे
आवश्यक
असते.
या समग्रातील प्रत्येक घटकाच्या निवडीची शक्यता
असते.
या तंत्रामुळे नमूना निवड
मानवी
पक्षपातापासून लांब ठेवता
येते.
५.सामाजिकशास्त्रात वस्तुनिष्ठता प्राप्त
करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा उपयोग करणे
योग्य
ठरते.
प्रायोगिक नियंत्रित परिस्थितीत प्रयोग करून
बाह्य
कारकांचा प्रभाव रोखता
येतो.
६.संशोधनात आधुनिक साधनाचा
वापर
संशोधनात जास्तीत जास्त
यांत्रिक व आधुनिक
साधनाचा
वापर
करू मानवी हस्तक्षेप कमी करता
येतो.
त्यामुळे पूर्वग्रहाचे प्रमाण
देखील
कमी
करता
येऊ
शकते.
७.
संशोधनात सांख्यिकीय मापन
पद्धतीत
पूर्वग्रहाचा प्रभाव पडण्याची शक्यता खूप
कमी
असते. संशोधनात सांख्यिकीकरणावर भर दिल्यास
वस्तुनिष्ठ संशोधन करता
येऊ
शकते.
८.
सामाजिकशास्त्रातील विविध घटना
एकमेकांशी संबंधित व निगडीत
असतात.
सामाजिकशास्त्रात संशोधन विविध
ज्ञानशाखांनी एकमेकांच्या मदतीने
म्हणजे
आंतरविद्याशास्त्रीय पद्धतीने अध्ययन
केले
तर वस्तुनिष्ठ निष्कर्ष येऊ
शकतात.
९.
सामूहिक
संशोधन
पद्धतीचा उपयोग करून
वस्तुनिष्ठता प्राप्त करता
येते.
सामुहिक
संशोधनात संशोधक दोन किंवा दोनापेक्षा
जास्त
संशोधकर्त्याद्वारे एकाच पद्धतीने संशोधन करू
शकतो.
या संशोधनातून प्राप्त निष्कर्षाची स वस्तुनिष्ठ अध्ययन करू
शकतो.
वरील
तंत्र
आणि
साधनाचा
वापर
करून
वस्तुनिष्ठता प्राप्त करता
येऊ
शकते.
वस्तुनिष्ठतेचे महत्त्व व आवश्यकता- अनुभवाधिष्ठित आणि
शास्त्रीय संशोधनात वस्तुनिष्ठता अत्यंत महत्वाची मानली
जाते.
वस्तु, घटना
आणि
समस्या
जशी
आहे
तशी
पाहणे
किंवा
चितारणे
म्हणजे
वस्तुनिष्ठता होय. वस्तुनिष्ठता म्हणजे पूर्वग्रहाचा प्रभाव
पडू
न देता
संशोधन
समस्येचा अभ्यास करणे
होय.
पक्षपात, पूर्वग्रह आणि व्यक्तिगत मताचा संशोधनावर प्रभाव पडत असतो.
सामाजिकशास्त्रातील संशोधनात वस्तुनिष्ठता सांभाळणे अनेकदा
कठीण
बनते, अध्ययन
करताना
कळतनकळत
संशोधकाच्या वैयक्तिक कल,विचार, पूर्वग्रह याचा प्रभाव
पडण्याची शक्यता असते. वारंवार
केलेल्या चाचण्या आणि
निरीक्षणातून हाती आलेले
अनुमान
वा निष्कर्ष सारखे येणे
म्हणजे
वस्तुनिष्ठता होय. वूल्फ यांच्या मते,
"घटनेचे सकृतदर्शनचे स्वरूप, प्रचलित
कल्पना
व व्यक्तिगत इच्छा आदींनी
प्रभावित न होता
निश्चय व खरीखुरी वस्तुस्थिती स्वीकारण्याची वृत्ती हीच
गाढ
ज्ञानाची पहिली गरज
आहे. " सामाजिकशास्त्रात सत्याचा
शोध घेण्यासाठी वस्तुनिष्ठतेची नितांत
गरज
असते.
संशोधनावरील व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव
कमी
करून
संशोधन
शास्त्रीय बनवण्यासाठी वस्तुनिष्ठतेचा आधार घेतला
जातो.
सामाजिक
संशोधनात एखादया घटनेचा
किंवा समस्एच विचार हा वैज्ञानिक
दृष्टिकोनातून होणे आवश्यक
असते.
वस्तुस्थितीदर्शक दृष्टिकोन समजून
घेताना
पूर्वग्रह व घटनेबाबत खात्री न करता विचारांचा प्रभाव पडण्याची शक्यता असते.
अनेक
संशोधनकर्त्यांनी एकाच घटनेचा
अभ्यास
करून
सामान्य
निष्कर्ष काढलेले असतात
त्याला
वस्तनिष्ठता असे म्हणतात.
१. राज्यशास्त्राला वैज्ञानिक दर्जा प्राप्तीसाठी- वैज्ञानिक पद्धतीत
वस्तुनिष्ठतेला सर्वाधिक महत्त्व
असते.
वैज्ञानिक पद्धतीच्या प्रभावामुळे सामाजिकशास्त्रात देखील वस्तुनिष्ठतेचे महत्त्व वाढत
चाललेले
आहे.
राज्यशास्त्रात सामाजिक आणि राजकीय वर्तनाचा अभ्यास केला
जातो.
त्यामुळे राज्यशास्त्रात वस्तुनिष्ठ संशोधन करणे
अवघड
आहे
असते.
परंतु
राजकीय
घटनाचा
अभ्यास
करताना
वस्तुनिष्ठता राखणे अवघड
असले
तरी
अशक्य
मात्र
नाही.
संशोधनाच्या आधुनिक पद्धती आणि
तथ्यसंकलनाची योग्य तंत्र
वापरून
राज्यशास्त्रीय संशोधन देखील
वस्तुनिष्ठ बनविता येईल. राज्यशास्त्राला शास्त्र वा विज्ञानाचा दर्जा प्राप्त
करून
देण्यासाठी वस्तुनिष्ठ संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. वस्तुनिष्ठ संशोधनानाच्या वाढत्या
प्रमाणातून राज्यशास्त्राचा दर्जा
उंचावण्यास मदत प्राप्त
होऊ
शकते.
२.निष्पक्ष निष्कर्ष प्राप्ती- वस्तुनिष्ठतेचा वापर
करून
संशोधकाला निष्पक्षपाप्तीपणे निष्कर्ष काढता येतात.
वस्तुनिष्ठता एक साधन
आहे
की ज्याच्या माध्यमातून सामाजिकशास्त्रातील घटनाचा शास्त्रीयपणे अभ्यास करता
येतो.
संशोधनाची विश्वसनियता टिकवून
ठेवण्यासाठी वस्तुनिष्ठतेची आवश्यकता असते. वस्तुनिष्ठ अध्ययनातून संशोधक पूर्वग्रह, पक्षपात, मूल्ये
आणि
आदर्शापासून दूर राहून
निष्पक्ष पद्धतीने निष्कर्ष काढू शकतो.
३. योग्य व प्रतिनिधिक तथ्य प्राप्ती- तथ्य संकलनावर संशोधनाचा दर्जा
अवलंबून
असतो.
सामाजिकशास्त्रात वस्तुनिष्ठतेच्या मार्गाने योग्य
व प्रतिनिधिक स्वरूपाची तथ्य
संकलित
केली
तर सामाजिकशास्त्र विषयातील संशोधनाचा दर्जा उंचावण्यास मदत मिळेल.
योग्य
व प्रतिनिधिक तथ्य संकलनासाठी वस्तुनिष्ठतेचा वापर आवश्यक
मानला
जातो.
४.वैज्ञानिक पद्धतीचा वापर यशस्वी करणे- सामाजिकशास्त्रातील संशोधनात वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्याशिवाय वस्तुनिष्ठता प्राप्त
करता
येणार
नाही.
वस्तुनिष्ठता आणि वैज्ञानिक पद्धती एकाच
नाण्याच्या दोन बाजू
आहेत.
वैज्ञानिक पद्धतीची प्राप्ती वस्तुनिष्ठतेद्वारा करता
येते.
सामाजिकशास्त्रात योग्य वैज्ञानिक पद्धतीचा वस्तुनिष्ठपणे उपयोग केला तर सत्यापर्यंत पोहचणे कठीण नाही.
वस्तुनिष्ठेशिवाय सामाजिकशास्त्रात वैज्ञानिक पद्धती यशस्वी
होऊ
शकत
नाही.
५.पडताळणी करणे- संशोधनात निष्कर्षांची पडताळणी
ही आवश्यक
बाब
मानली
जाते.
पडताळणीच्या माध्यमातून वस्तुनिष्ठतेची
तपासणी
करता
येते.
निष्कर्षात वस्तुनिष्ठता आढळून
आली
नाही
तर त्यांची
पुनर्पडताळणी करावी लागते. वारंवार पडताळा
घेऊन
सिद्ध
झालेले
निष्कर्ष वस्तुनिष्ठ मानले
जातात.
निष्कर्षाचा खरेखोटेपणा वस्तुनिष्ठतेच्या कसोटीवर तपासता येतो.
६. नवीन संशोधनाला चालना- वस्तुनिष्ठ अध्ययनामुळे नवीन संशोधन
शक्यतेला वाव मिळतो.
वस्तुनिष्ठतेच्या प्राप्तीसाठी संशोकाक घटनेची
तथ्ये
जाणून
घेण्याचा प्रयत्न करतो.
या तथ्यांची तपासणी करताना
संशोधन
विषयाशी
संबंधित
अनेक पैलूचे दर्शन होते. या पैलूविषयी अध्ययन करण्यास
प्रेरणा
मिळते.
समस्येसंदर्भातील नवीन पैलू
नव्याने
संशोधन
करण्यासाठी नवा विषय पुरविण्याचे काम करतो.
वस्तुनिष्ठता नवीन संशोधनाला चालना देण्यासाठी देखील उपयुक्त
मानली
जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.