राजकीय सामाजीकरणाची साधने, अभिकरणे किंवा माध्यमे :-
समाजातील कुटुंबसंस्था, शैक्षणिक संस्था, मित्रमंडळी, राजकीय
पक्ष, स्वयंसेवी संस्था अशा अनेक घटकाकडून व्यक्ती राजकीय
सामाजीकरण घडत असते. त्या सर्वांना राजकीय सामाजीकरणाची माध्यमे असे म्हटले जाते.
राजकीय व्यवस्था ज्या सामाजिक पर्यावरणात कार्यरत असते त्यावरून राजकीय
सामाजीकरणाचे स्वरूप ठरत असते. स्थिर राजकीय व्यवस्थामध्ये राजकीय सामाजीकरणाची
माध्यमे सुस्पष्ट व लवचिक स्वरूपाची असतात. अस्थिर व अप्रगत राजकीय व्यवस्थेत
राजकीय सामाजीकरणाची माध्यमे विस्कळीत व अंतविरोधी स्वरूपाची आढळून येतात. खुल्या
समाजात राजकीय भूमिकेबाबत ताठरता नसते. नागरिकासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात तेथे
राजकीय सामाजीकरण प्रक्रियेत विविधता आढळून येते. सर्वकष व्यवस्थेत राजकीय
सामाजीकरणाच्या माध्यमावर शासनाचे प्रभावी नियंत्रण असते. जनतेला पर्याय उपलब्ध
नसतो अशा ठिकाणी साचेबंद वा एकजिनशी राजकीय सामाजीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न केला
जात असतो. राजकीय सामाजीकरणाची विविध माध्यमे पुढील प्रमाणे दिसून येतात.
१) कुटुंब संस्था :- राजकीय सामाजीकरण प्रक्रियेत
कुटुंबसंस्थेस प्रथम स्थान दिले जाते. कुटुंब संस्था ही ज्ञानाची पहिली खिडकी
मानली जाते. प्रत्यक्ष सत्तेचा संबंध लहानपणी कुटुंबात येत असतात. आई वडिल आणि
कुटुंबातील इतर सदस्य लहान मुलावर प्रभाव टाकत असतात. आज्ञापालन, निष्ठा इ. अनेक गुण कुटुंबातून मुलांमध्ये विकसित
केले जातात. हे गुण व्यक्तीत मोठे वा परिपक झाल्यावर राजकीय वर्तनात दिसून येतात.
वडिलाबद्दल आदर असेल तर समाजातील नेत्याबद्दल देखील आदर निर्माण होतो.
राष्ट्राध्यक्ष व वडील यासंबंधीच्या मुलांच्या मनातील प्रतिमा सुसंगती असल्याचे व
दोन्ही अधिकारी असल्याची जाणीव असते असे ईस्टन व हेस अभ्यासकांनी सिद्ध करून दिलेले
आहे. रॉबर्ट लेन यांनी राजकीय श्रद्धा व निष्ठा यांचा कुटुंबाद्वारे तीन मार्गानी
घातला जातो. मुलांना उघड किंवा गुप्त शिकवणुकीद्वारे, विशिष्ट
अशा सामाजिक संदर्भात मुलाला सोडून आणि मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला वळण लावून
राजकीय निष्ठा विकसित केल्या जात असतात. कुटुंबाचे संस्कार इतके मजबूत असतात की
त्यांचे अस्तित्व दीर्घकाळ पर्यंत असते. म्हणून आई वडिलांची राजकीय मते मुलामध्ये
निर्माण होतात. उदा. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत वडिलाचा कल ज्या पक्षाकडे
असेल त्याच पक्षाला ७०% मुलांनी मतदान केलेले दिसते. म्हणून साम्यवादी देशात
हेतूपुरस्कर कुटुंबात राजकीय शिक्षण दिले जाते. भारतात देखील बहुसंख्य मुले-मुली आपल्या
पालकांच्या पसंतीच्या राजकीय पक्षांशी संलग्नित वा संबंधित संघटना सदस्य बनतात.
उदा. भारतीय जनता पक्षाशी संबंधित नेत्यांची मुले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असतांना दिसतात. काही विचारवंत कुटुंबात
होणाऱ्या राजकीय सामाजीकरणाचा सखोल व व्यापक परिणाम होता असे मानतात. कारण
व्यक्तीचे प्रदीर्घ काळ कुटुंबात वास्तव्य असते. व्यक्तीच्या गरजा कुटुंबात पूर्ण
होतात. कुटुंब हे व्यक्तीच्या प्राथमिक व भौतिक गरजांची परिपूर्ती करणारे केंद्र
असते. व्यक्ती अनेक गोष्टींच्या बाबतीत कुटुंबावर अवलंबून असतो. व्यक्ती अनुकरणाची
प्रवृत्ती असल्यामुळे अनेक व्यक्ती कुटुंबातील राजकीय मूल्याचे अनुकरण करत असतो.
पालक हे मुलांसाठी आदर्शाचे प्रतीक असते. कुटुंबातील सदस्य एकत्र राहत असल्याने
सर्वांना समान पर्यावरणाचा लाभ मिळत असतो. म्हणून कुटुंबातील सदस्यांच्या
मूल्यव्यवस्थेत सारखेपणा निर्माण होतो. कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक
व सांस्कृतिक दर्जा व्यक्तीला जन्माबरोबर आपोआप लाभत असल्यामुळे कुटुंबाची राजकीय
भूमिकाही व्यक्तीच्या अगवळणी पडत असते. व्यक्तीच्या भावी राजकीय व्यक्तिमत्त्वाची
पायाभरणी कुटुंबात होत असते. कुटुंबात विकसित झालेल्या अधिसत्तेबाबतच्या धारणा
पुढे देखील कायम राहिलेल्या दिसतात. मात्र कुटुंबात होणारे राजकीय सामाजीकरण बहुतांशी
परंपराप्रधान व जैसे थे-वादी स्वरूपाचे असते. कुटुंबात परंपरा, रितीरिवाज, प्रथा टिकविण्याच्या प्रयत्नातून राजकीय
परिवर्तनास प्रतिरोध करतात. लोकशाहीप्रधान वातावरणात कुटुंबे जातीयता, वंश श्रेष्ठत्व टिकविण्याचे संस्कार करण्यात धन्यता मानते. कुटुंबाद्वारे
होणारे राजकीय सामाजीकरण व्यापक असले तरी व्यक्ती प्रौढ़ झाल्यावर किंवा अनुभवातून
राजकीय जीवनाचे आकलन करू लागल्यास तिच्या धारणा बदलू शकतात. त्यामुळे सर्व
व्यक्तीच्या मतावर कुटुंबाचा प्रभाव असेलच असे नाही. कुटुंब हे समाजातील ज्ञान
मिळविण्याचा प्रथम मार्ग असतो परंतु इतर घटकांच्या प्रभावाखाली मुले येऊ लागल्यावर
कुटुंब घटकाचा प्रभाव कमी जातो.
२) मित्रमंडळी व सहकारी- वाढत्या वयाबरोबर मुल स्वतंत्र
वृत्तीचे बनत जातात. कुमार अवस्थेत मुल मोठ्या प्रमाणावर मित्रमंडळीत वावरत असतात.
शाळा, खेळ, मनोरंजन आणि विविध
उपक्रमाच्या माध्यमातून मुल हे इतर मुलांच्या संपर्कात येत असतात. समवयस्क मुलांचा
प्रभाव अनेकदा कुटुंबाच्या प्रभावाला छेद देण्याचे कार्य करत असते. मित्रमंडळीत
समवयस्क एकत्र येत असतात त्यामुळे सर्वांचे स्थान समान असते. समानतेच्या भूमिकेतून
होणारे सामाजीकरण अधिक प्रभावशाली आहे. बदलत्या राजकीय पर्यावरणात व्यक्तीला
आपल्या भूमिकेची साधेजोड करावी लागते. व्यक्तीची ही गरज मित्रमंडळी व सहकारी पूर्ण
करत असतात. कुटुंबातील उतरडीच्या रचनेत मनमोकळी चर्चा होऊ शकत नाही ही कसर भरून
काढली जाते. मित्रमंडळीत व्यक्तीला असणान्या समान स्थानामुळे वैचारिक आदानप्रदान
आणि मुक्त चर्चा मुळे राजकीय सामाजीकरण हातभार लागत असतो. मित्र परिवाराचा राजकीय
सामाजीकरणात बाटा त्यांना राजकारणात बाबत असलेल्या रसावर अवलंबून असतो. मित्र
परिवार आणि सहकान्याच्या जोरावर व्यक्तीच्या राजकीय आकांक्षाची पूर्ती होत असते.
कुटुंब व अनौपचारिक समवयस्कांचे गट यांच्यावर शासनाची फारशी सत्ता चालत नसते.
राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया बऱ्याच अंशी कुटुंब व समवयस्कांचे गट यात घडत असते
व त्याबाबतीत जलद गतीने बदल घडवून आणणे कठीण असते. प्रत्येक देशात समविचारी
तरुणांच्या राजकीय संघटना निर्माण झालेल्या असतात. राजकीय शक्ती म्हणून तरूणांकडे
प्रत्येक देशात पाहिले जाते. तरुणांकडे असलेल्या नवनिर्मितीचा दृष्टिकोन व
पुरोगामी विचार, बेघडक कृती करण्याचे सामर्थ्य या गुणांमुळे
प्रत्येक राजकीय पक्ष तरुणांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. जगात विविध
देशात झालेल्या क्रांतीमध्ये तरुणांनी दिलेले योगदान लक्षणीय मानले जाते.
३) शिक्षण संस्था- कुटुंबात औपचारिक शिक्षण दिले जाते पण
शिक्षण संस्थेत औपचारिक व आनौपचारिक शिक्षण दिले जाते. लहानपणी मुलाच्या
विचारसरणीला वळण लावणारे शाळा हे प्रभावी माध्यम असते. शालेय जीवनातील अनुभव
व्यक्तीच्या राजकीय क्षमतेवर प्रभाव पाडू शकतात. कुटुंबातील अधिकारविषयक पारंपरिक
कल्पनांनाच्या विरोधात भावना शाळा हे माध्यम निर्माण करू शकते. म्हणून सर्वकष
व्यवस्थेत कुटुंबाचा प्रभाव कमी करण्यासाठी शाळा या माध्यमाचा वापर केला जात असतो.
अमेरिकत करण्यात आलेल्या एका अध्ययनात आठव्या इयत्तेतील मुलांच्या शासनविषयक
कल्पना ह्या शिक्षकविषयक कल्पनांशी मिळतेजुळते आढळून आलेले आहे. शिक्षण संस्थेतून
होणारे राजकीय सामाजीकरण शास्त्रीय पद्धतीने होत असते. शाळा, महाविद्यालयात विशिष्ट पद्धतीने संस्कार केले जातात.
शिक्षणातून शिकविले जाणारे विविध विषयातून राजकीय सामाजीकरण केले जात असते.
त्यातून त्यांची मनोवृत्ती तयार होत असते. अभ्यासक्रमांची आखणी व पाठयपुस्तकांची
निर्मिती करतांना राष्ट्रीय निष्ठा व राष्ट्रीय मूल्यांचे बीजारोपणाचा प्रयत्न
केला जातो. राष्ट्राने निश्चित केलेल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक
गोष्टी अभ्यासक्रमात समावेश केला जातो. शिक्षकांना देखील प्रशिक्षण देऊन
व्यवस्थानुकूल बनविण्याचा प्रयत्न केला जातो. आल्मंड आणि व्हच्या मते व्यक्तीचे
शिक्षण जितके अधिक तितके राजकीय ज्ञान अधिक असते. शिक्षित व्यक्तीचा राजकीय चर्चत
सहभाग अधिक असतो. शाळेत प्रत्यक्ष राजकीय शिक्षण दिले जात नाही तर
अप्रत्यक्षरीत्या म्हणजे राष्ट्रीय नेत्या जयंत्या सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंमेलने, क्रीडा उपक्रम, अध्यापन इत्यादी माध्यमातून सामाजीकरण केले जात असते. शाळा माध्यमातून
होणारे सामाजीकरण मुख्यतः भावनाशिलतेवर आधारित असते याउलट महाविद्यालयात केले
जाणारे राजकीय सामाजीकरण अधिक चिकित्सक व विश्लेषणात्मक स्वरूपाचे असते, कारण महाविद्यालयातील विद्याथ्र्यांवर कुटुंबाचा प्रभाव ओसरून स्वतंत्रपणे
जीवन जगण्याची वृत्ती विकसित होऊ लागते. शिक्षण संस्थेवर जर सरकारचे नियंत्रण असेल
तर सरकारला हवी असलेली विचारसरणी अमलात आणली जाते. उदा. साम्यवादी देशात
साम्यवादाला पूरक विचार शाळेत शिकविले जातात. याउलट लोकशाहीत मुक्त व खाजगी शिक्षण
असल्याने वेगवेगळ्या विचाराना वाव दिला जातो. शिक्षण वेगवेगळ्या विचाराची ओळख करून
देणारी आणि इतिहासाचे मर्म सांगणारी प्रक्रिया असल्याने सामाजीकरणात तिचे मोलाचे
योगदान आहे. ज्या देशात शिक्षणाचे प्रमाण जास्त असते तेथे परिवर्तनाची गती जास्त
असते. तरीही शिक्षणाचा प्रभाव हा विशिष्ट स्वरूपाचा नसून सर्वसाधारण स्वरूपाचा
असतो. तो प्रत्यक्ष असण्यापेक्षा परिस्थितीजन्य असतो. कारण शाळेत शिकणारी मूले इतर
घटकांच्या प्रभावाखाली आल्याने त्यांचे दृष्टिकोन दृढ होतात. त्यामुळे त्यांच्या
राजकीय संघर्ष निर्माण होतात. तरीही राजकीय व्यवस्थेतील मूल्ये नवीन पिढयांना
शिकविण्याचे कार्य शिक्षणसंस्था करत असतात. चारित्र्य, कर्तव्य
भावना, राष्ट्रप्रेम, गटनिष्ठा व शिस्त
या राजकारणासाठी उपयुक्त गोष्टींचे ज्ञान शिक्षणाद्वारे होत असते. शिक्षण संस्था
या माध्यमाचा प्रभाव लक्षात घेता प्रत्येक शासनव्यवस्था अभ्यासक्रमाची मोडतोड करून
आपल्या अनुकूल प्रतीक, प्रतिमा विकसित करण्याचा प्रयत्न केला
जातो. थोडक्यात राजकीय सामाजीकरण प्रक्रियेत शाळा हे महत्त्वपूर्ण माध्यम मानले
जाते.
४) राजकीय पक्ष- आधुनिक काळात राजकीय पक्षाद्वारे होणारे
सामाजीकरण सर्वात प्रभावी आणि विस्तृत स्वरूपाचे असते. विशिष्ट राजकीय मूल्यांचा
प्रसार व प्रचार करणे, लोकांना
राजकीयदृष्ट्या कृतिप्रवण बनविणे, राजकीय कार्यकर्त्यांची व
नेत्यांची भरती करणे, अन्य राजकीय पक्षाशी स्पर्धा करून
सत्ता मिळविणे आणि मिळविलेली सत्ता कायमस्वरूपी टिकविणे या उद्दिष्टयांच्या
पूर्तीसाठी राजकीय पक्षाची स्थापना झालेली असते. लोकांच्या पाठिव्यावर राजकीय पक्षांना
निवडणुकीत यश मिळवून सत्ता मिळत असते. त्यामुळे राजकीय एकत्र येत असले तरी आणि
घडविण्याचे कार्य राजकीय पक्ष कुशलतेने पार पाडत प्रत्येक लोकमतांचा मिळविण्यासाठी
आपल्या विचारसरणीचा करीत निवडणुकीच्या काळात व मिळविण्याकरिता प्रचार, जाहीरनामा अधिवेशन मार्गाचा अवलंब राजकीय पक्ष प्रकट अप्रकट मागनि
सामाजीकरण घडवून असतात. राजकीय लोकानुयायाचे राजकारण करून सामाजीकरण करत असतात. या
व्यक्तीला राजकीय जाणीव व जागृती निर्माण होते व त्यांचे सामाजीकरण होते. जनता व
शासन यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून राजकीय पक्ष कार्य मतदारांच्या हितसंबंधाना
आपल्या जाहीरनाम्यात स्थान देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न सत्ताप्राप्तीनंतर
जनहिताच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करून राजकीय जागृती करून सामाजीकरणाचा करतात.
सर्वकष एकपक्षीय राजवट असल्याने तेथे प्रकारच्या राजकीय सामाजीकरणाचा अवलंब केला
जातो. जनतेच्या मागण्या अधिकार नियंत्रित केले जात असतात. बळाचा वापर, आकर्षक व मोहक कार्यक्रम, आश्वासनाचा वापर, राष्ट्रप्रेमाच्या भावनेचा अवलंब करून तेथे
जनतेचे सामाजीकरण करण्याचा प्रयत्न केले जात असतो. सर्वकष राजवटीत एका राजकीय
सामाजीकरणाचा प्रयास केला जातो. एखादया घटनेविषयी व्यवस्थेविषयी लोकांची विचारसरणी
बनविण्यात राजकीय पक्ष प्रमुख पार पाडत असतात. प्रौढ व्यक्तीची राजकीय निश्चितीचे
कार्य राजकीय करीत असतात. राजकीय सभासदत्वामुळे व त्या कामाच्या अनुभवातून
व्यक्तीचे सामाजीकरण होत आधुनिक राजकीय पक्ष सभासद नोंदणीला महत्त्व देतात.
विचारसरणीचा तरुण व लहान बालकावर पाडण्यासाठी राजकीय पक्ष संघटना बांधणीचे करतात.
उदा. रशियात पायोनिअर्स कोमसोमोल, भारतात विविध युवक संघटना राजकीय पक्षाच्या सामाजीकरणाच्या
योगदानाबाबत बालासाच्या मते, 'प्रत्यक्ष परिस्थितीशी राजकीय
संस्था प्रकार रहावेत म्हणून मानवाने निर्माण केलेले प्रभावी साधन म्हणजे राजकीय
पक्ष गुंतागुंतीच्या राजकीय प्रक्रियात काहीतरी साधे व काहीतरी स्थायी साधन असावे,
की ज्याचे प्रेम निवडणुकीच्या वेळी पूर्वीच्याच प्रिय किंवा
विश्वासार्ह वस्तूची किंवा साधनाची प्रचिती यावी अशा साधनाची गरज असते व ते साधन
म्हणजे राजकीय पक्ष होय. या विधानावरून राजकीय पक्षाचे राजकीय सामाजीकरण
प्रक्रियेतील महत्त्व लक्षात येते.
५) व्यक्तिचे कार्यक्षेत्र था दबावगट :- प्रत्येक व्यक्ती
उपजीवकेसाठी नोकरी किंवा व्यवसाय करीत असते. ज्या ठिकाणी ती काम करत असते. तिथे
देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया चालू शकते. कामगार
कारखान्यात काम करतात. त्यांच्या संघटना असतात. कारखान्यात कामगार राजकीय विषयावर
चर्चा करतात. प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्गाचे विशिष्ट असे प्रश्न
असतात. त्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी सर्व सदस्य एकत्र येऊन हितरक्षणासाठी
हितसंबंधी गट वा दबाबगट स्थापन करतात. संघटना आपले प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय
पक्षाशी बांधिलकी पत्करतात. संघटना विशिष्ट पक्षाशी संलग्न झाल्यास कामगार विशिष्ट
पक्षाबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि सहानुभूतीतून विशिष्ट प्रकारची विचारसरणी
विकसित होत असते. उदा. इंटक काँग्रेस पक्ष आपल्या व्यावसायिक हितसंबंधाचे रक्षण
करणे हे संघटनेचे ध्येय असते. हे हितरक्षण ज्या मागनि पूर्ण होईल त्या मार्गाचा
अवलंब संघटना अवलंबतात. अशा वेळी हितसंबंधास पोषक राजकीय भूमिका दबावगटांना घ्यावी
लागते. त्यामुळे त्यास अनुकूल राजकीय दृष्टिकोनाचा स्वीकार केल्यामुळे कळतनकळत
सदस्यांचे राजकीय सामाजीकरण होत असते.
६) सांस्कृतिक संघटना :- मोकळया वेळेत किंवा फुरसतीचा वेळ
घालविण्यासाठी व्यक्ती वेगवेगळया संघटनेच्या कार्यात भाग घेत असतात. या संघटनेचे
स्वरूप गैरराजकीय असले तरी ती राजकीय प्रशिक्षणाची क्रियाशील व्यासपीठे असतात.
काही वेळेस हे गट राजकीय पक्षाशी संलग्नित असतात. उदा. तनिष्का हा महिलाचा गट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्नित असते. संघटनेचे कार्य करतांना राजकीय
समस्या व राजकारणावर चर्चा होते. राजकारणात सहभाग घ्यावा याबद्दल प्रोत्साहन दिले
जाते या सर्व कृतीतून एक विशिष्ट राजकीय दृष्टिकोन विकसित होऊन राजकीय सामाजीकरण
घडवून येते. निवडणुकीच्या काळात या संघटनेच्या कार्यात विशेष उठाव मिळत असतो. तसेच
बहुसंख्य राजकीय नेते आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात सांस्कृतिक गटातील सहभागातून सुरू
करतात यावरून या राजकीय सामाजीकरणाचे महत्त्व लक्षात येते.
७) प्रसार माध्यमे- वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ ही संसूचन
माध्यमे आहेत. प्रसार माध्यमाचे राजकीय सामाजीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
लोकांची विशिष्ट राजकीय विचारसरणी बनविणे, लोकांची राजकीय
मते वा दृष्टिकोनाची निर्मिती किंवा त्यात बदल घडवून आणणे ही राजकीय सामाजीकरणाशी
निगडित कार्य प्रसार माध्यमे करत असतात. तंत्रज्ञानात्मक प्रगतीमुळे प्रसिद्धी
माध्यमाच्या कार्यात व व्याप्तीत मोठया प्रमाणावर भर पडलेली आहे. वर्तमान पत्रातून
अग्रलेख राजकीय बातम्या, व्यंगचित्र इ. माध्यमातून राजकीय
जागृती घडवून आणली जाते. विशेषतः साक्षर जनतेपर्यंत राजकीय घडामोडी व शासकीय
निर्णयांची माहिती पुरविणे, जनतेच्या मागण्या शासनापर्यंत
पोहचविणे आणि वाचकांना राजकीय दृष्ट्या क्रियाशील बनविणे ही महत्त्वपूर्ण कार्य
वर्तमानपत्र करत असतात. वृत्तपत्र खाजगी मालकीची असेल तर सामाजीकरण योग्य होईल
याउलट सरकारच्या मालकीचे असेल तर सामाजीकरण चुकीचे सामाजीकरण होण्याची शक्यता
असते. टि.व्ही या माध्यमातून निरक्षर लोकाचे राजकीय सामाजीकरण घडवून आणता येते.
जाहिराती, राजकीय चर्चा, मुलाखती,
बातम्या इ. माध्यमातून ही सामाजीकरण घडवून आणतात. हुकूमशाही देशात
या साधनावर सरकारची मालकी असल्यामुळे सामाजीकरणात विविधता दिसून येत नाही.
वृत्तपत्रानंतर नभोवाणी हे माध्यम राजकीय सामाजीकरणात प्रभावी भूमिका बजावत असते.
या माध्यमाचे वैशिष्टये म्हणजे निरक्षर लोकांचेही हे माध्यम सामाजीकरण घडवून आणत
असते. भौगोलिकदृष्ट्या दूरवरील भागातही नभोवाणी माध्यमाच्या माध्यमातून सामाजीकरण
घडवून आणता येईल. आधुनिक काळात दूरचित्रवाणी हे अत्यंत प्रगत माध्यम आलेले आहे. या
माध्यमाच्या माध्यमातून एकाच वेळेस राजकीय बातम्याचे वार्ताकन आणि चित्राकन करता
येते. थेट प्रसारणामुळे प्रत्यक्ष घटनेच्या अनुभव येत असल्याने संसूचनाच्या इतर
माध्यमापेक्षा हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे. उदा. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत
भारतात प्रसिद्धी माध्यमांनी मोठा प्रभाव पाडलेला दिसतो.
८) प्रतीके- प्रतीके सुद्धा राजकीय प्रवृत्ती विकसित करण्यात
प्रभावी भूमिका बजावत असतात. विशिष्ट समाजातील राजकीय प्रतीकाच्या सहाय्याने
औपचारिक सामाजीकरण घडवून आणले जाते. भारतात १५ ऑगस्ट, प्रजासत्ताक दिन, चीन मध्ये मे
दिन, इंग्लंड मध्ये राज्यारोहण समारंभ इ. कार्यक्रमांच्या
माध्यमातून लोकासमोर इतिहास उभा केला जातो. आणि त्यातून राजकीय सामाजीकरण घडवून
आणले जाते. प्रतीकाच्या माध्यमातून ऐतिहासिक सातत्य व राजकीय एकात्मतेचे दर्शन घडत
असते. त्यातून राजकीय दृष्टया महत्त्वपूर्ण गोष्टींविषयी भावनात्मक प्रतिसाद व
दृष्टिकोन निर्माण होत असतात. त्या दृष्टिकोनाच्या आधारावर राजकीय निर्णय घेतले
जातात. भारतासारख्या देशात स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय
गीत, राष्ट्रीय पुरुषांच्या नावे साजरे केले जाणारे दिन,
राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या यांच्या माध्यमातून
लहान बालकांवर राष्ट्रीय स्वरूपायें संस्कार घडविण्याचा प्रयत्न केला जातो. भारतात
निरक्षतेच्या प्रमाणामुळे राजकीय पक्षांना निवडणुक चिन्ह दिलेले आहे. निवडणुकी
चिन्ह ही मतदारावर प्रभाव निर्माण करत असतात. निवडणुक चिन्ह पक्षाच्या विचारसरणीचे
प्रतिनिधित्व करत असतात. या चिन्हावर मतदान करून मतदार एकप्रकारे राजकीय पक्षाच्या
विचारसरणीला अधिकृतपणे मान्यता देत असतो.
९) राजकीय व्यवस्थेचा प्रत्यक्ष संबंध- राजकीय व्यवस्थेची
स्थापना लोकांसाठी असल्यामुळे जनतेचा राजकीय व्यवस्थेशी नेहमी संबंध येत असतो, पोलिस, नेते, तलाठी इ या न त्या कारणाने संबंध येतो. त्यातून राजकीय ज्ञान मिळते आणि
राजकीय सामाजीकरण घडते. प्रत्यक्ष संपर्काच्या माध्यमातून होणारे सामाजीकरण इतर
माध्यमातून झालेल्या सामाजीकरणापेक्षा प्रभावी व वास्तवतावादी असते.
१०) अनुभव :- राजकीय सामाजीकरणात अनुभव हा महत्त्वपूर्ण घटक
असतो. व्यक्तीला शासन यंत्रणा व शासकीय पदावर कार्यरत राजकीय अभिजनाचा प्रत्यक्ष
अनुभव येत असतो. प्रत्यक्ष राजकीय अनुभवातून व्यक्तीच्या राजकारणाविषयी धारणा आकार
धारण करीत असतात. आल्मंड व व्हर्बा यांच्या मते, कुटुंब आणि शाळा यांनी राजकीय व्यवस्थेविषयी कितीही अनुकूल राजकीय
सामाजीकरण केलेले असेल मात्र राजकीय पक्षाकडून येणारा अनुभव जर क्लेशदायक असेल तर
व्यक्तीच्या राजकीय व्यवस्थेविषयीच्या धारणेत बदल होता,' व्यक्तीची
राजकीय वर्तणूक अनुभवावर आधारित असते. व्यक्ती राजकीय अनुभव नसल्यास व्यक्ती
त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाहीत. म्हणून नव्याने स्थापन राजकीय
पक्षाबद्दल जनता निश्चित व्यक्त करू शकत नाही. व्यक्तीच्या अनुभवावर व्यक्तीचा
राजकीय दृष्टिकोन ठरत असतो. उदा. संप, निदर्शने केल्याशिवाय
शासन मागण्या मान्य करीत नसेल तर जनता त्याच मार्गाचा अवलंब करते, राजकीय सामाजिकरण प्रक्रियेत सर्वांना येणारे अनुभव समान नसल्यामुळे
सर्वांचे राजकीय सामाजीकरण समानरीतीने होत
नाही. लोकांचा अनुभव बदल्यास लोकांचा राजकीय निर्णयही बदल असतो. उदा. इंदिरा
गांधीनी लादलेल्या आणीबाणीमुळे त्यांच्या पक्षावर विश्वास कमी होऊन जनतेने १९७७
साली जनता पक्षाला निवडून दिले होते. अनुभवातून राजकारणाकडे पाहण्याच्या
दृष्टिकोनात बदल होत असतो, काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचार
निर्मूलनासाठी लोकपाल विधेयक मंजूरीचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात पाळले नाही. याउलट
काँग्रेस शासन काळात राजकीय नेत्यांची मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची प्रकरणे
बाहेर आली त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा जनाधार कमी झाल्यामुळे सत्तेबाहेर
बसावे लागले.
वरिल साधनाच्या सहाय्याने राजकीय सामाजीकरण घडवून आणले जाते. याशिवाय
शेजारी, धर्मसंस्था, इ. घटक ही
सामाजीकरण घडवून आणण्याचे काम करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.