https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

NDA Vs India/ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? NDA आणि India बलस्थाने


 

I.N.D.I.A.Vs N.D.A

Ø लोकसभा निवडणूक 2024 ची  तयारी सर्वच  राजकिय पक्ष करत आहेत.

Ø राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA (मंगळवार, 18 जुलै 2023) दिल्ली येथे पार पडली. ही निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येईल, हे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Ø बंगळुरू येथे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या आघाडीचीही एक बैठक पार पडली. विरोधी पक्षांनी I.N.D.I.A. (Indian National Developmental Inclusive Alliance ) आघाडी बनवलेली आहे.

Ø सध्या तरी NDA मध्ये 38 तर I.N.D.I.A. मध्ये 26 पक्ष सहभागी झाले आहेत.

Ø I.N.D.I.A.VS N.D.A पक्षीय बलाबल

Ø NDA मध्ये 38 पक्ष दिसत असले तरी 301 लोकसभा सदस्य असलेल्या भाजपनंतर यामध्ये थेट 13 सदस्यीय शिवसेनेचा (शिंदे गट) क्रमांक लागतो. याव्यतिरिक्त इतर कोणतेही मोठ्या पक्षांचं नाव दिसत नाही. एनडीएच्या ३९ मित्रपक्षांपैकी २५ पक्षांचा एकही लोकसभेचा खासदार नाही.

Ø I.N.D.I.A. मध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पक्ष आणि जनता दल (संयुक्त) अशा अनेक मजबूत पक्षांची उपस्थिती दिसून येत असली तरी त्यामध्ये नेतृत्व कुणाकडे असणार हे अद्याप स्पष्ट नाही. शिवाय, एकमेकांना विविध ठिकाणी विरोध करणारे किंवा काही मुद्यांवर असहमत असलेले पक्षही यामध्ये दिसून येतात. .N.D.I.A च्या २६ पक्षांच्या आघाडीमध्ये १० पक्षांचा एकही लोकसभेत खासदार नाही

Ø तटस्थ पक्ष- सध्या तटस्थ असलेल्या राजकीय पक्षांकडे ६२ खासदारांचं बळ असून ती लोकसभेच्या सदस्य संख्येच्या ११ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. २०१९ मध्ये या राजकीय पक्षांना १०.७१ टक्के मतं मिळाली होती. त्यामुळं या राजकीय पक्षांचं महत्त्व कमी झालेलं नाही. एनडीए आणि I.N.D.I.A यांच्यात जिथं थेट लढाई होणार नाही. तिथं या राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. के. चंद्रशेखर राव, नवीन पटनाईक आणि जगनमोहन रेड्डी यांचं अनुक्रमे तेलंगाणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये सरकार आहे. त्यामुळं तिथली लोकसभेची निवडणूक निश्चितच रंगतदार असणार आहे.

Ø राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) सदस्य पक्ष आणि त्यांचे संसद सदस्य-

भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष - 301

शिवसेना महाराष्ट्र - 13

राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी (पशुपती कुमार पारस) बिहार - 05

अपना दल (सोनिलाल) - उत्तर प्रदेश - 02

नॅशनल पीपल्स पार्टी राष्ट्रीय पक्ष - 01

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) - महाराष्ट्र - 01

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) - बिहार - 01

नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टी नागालँड - 01

ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन झारखंड - 01

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा सिक्कीम - 01

मिझो नॅशनल फ्रंट मिझोराम - 01

नागा पीपल्स फ्रंट - नागालँड - 01

इंडिजिनिअस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा - त्रिपुरा - 00

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) - महाराष्ट्र - 00

आसाम गण परिषद - आसाम - 00

पत्तल्ली मक्कल कत्छी - तामिळनाडू - 00

तमीळ मनिला काँग्रेस - तामिळनाडू - 00

युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल - आसाम - 00

सुहेलदेव भारतीय समाज पार्टी - उत्तर प्रदेश - 00

शिरोमणी अकाली दल (संयुक्त) - पंजाब - 00

महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी - गोवा - 00

जननायक जनता पार्टी - हरयाणा - 00

प्रहार जनशक्ती पार्टी - महाराष्ट्र - 00

राष्ट्रीय समाज पक्ष - महाराष्ट्र - 00

जनसुराज्य शक्ती पार्टी - महाराष्ट्र - 00

कुकी पीपल्स अलायन्स - मणिपूर - 00

युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी - मेघालय - 00

हिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी - मेघालय - 00

निशाद पार्टी - उत्तर प्रदेश - 00

ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस - पुदुच्चेरी - 00

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) - बिहार - 00

जन सेना पार्टी - आंध्र प्रदेश - 00

हरयाणा लोकहित पार्टी - 00

भारत धर्म जन सेना - केरळ - 00

केरळ कामराज काँग्रेस - केरळ - 00

पुतिया तमिलगम - तामिळनाडू - 00

गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट - पश्चिम बंगाल - 00

ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) – तामिळनाडू - 00

Ø Indian National Developmental Inclusive Alliance मधील (I.N.D.I.A.) सदस्य पक्ष आणि त्यांचे संसद सदस्य-

काँग्रेस राष्ट्रीय पक्ष - 49

द्रविड मुनेत्र कळघम तामिळनाडू 24

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल - 23

जनता दल (संयुक्त) - बिहार - 16

शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र - 06

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष {CPI(M)} - राष्ट्रीय पक्ष - 03

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) महाराष्ट्र - 03

समाजवादी पक्ष उत्तर प्रदेश - 03

जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीर - 03

इंडियन युनियन मुस्लीम लीग केरळ - 03

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)- केरळ - 02

विदुतलाई चिरुतैगल कत्छी (VCK) - तामिळनाडू - 02

आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष - 01

झारखंड मुक्ती मोर्चा झारखंड - 01

केरळ काँग्रेस (M) - केरळ - 01

मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) - तामिळनाडू - 01

रेव्हल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) – पश्चिम बंगाल - 01

कोंगुनाडू मक्कल देसिया कत्छी (KMDK) – तामिळनाडू - 01

राष्ट्रीय जनता दल - बिहार - 00

राष्ट्रीय लोक दल उत्तर प्रदेश - 00

अपना दल (कमेरावादी) उत्तर प्रदेश - 00

पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) – केरळ - 00

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्स-लेनिनिस्ट लिबरेशन {CPI(ML)} - बिहार - 00

ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पश्चिम बंगाल - 00

मणितनेया मक्कल कत्छी (MMK) - तामिळनाडू - 00

केरळ काँग्रेस (जोसेफ) - केरळ - 00

Ø अद्याप भूमिका जाहीर केलेले प्रमुख पक्ष आणि त्यांचे संसद सदस्य-

वायएसआर कांग्रेस पक्ष - आंध्र प्रदेश - 22

बिजू जनता दल - ओडिशा - 12

भारत राष्ट्र समिती - तेलंगण - 09

बहुजन समाज पार्टी - राष्ट्रीय पक्ष - 09

तेलुगू देसम पार्टी - आंध्र प्रदेश - 03

ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलीमिन (AIMIM) - तेलंगण - 02

जनता दल (सेक्युलर) - कर्नाटक - 01

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - महाराष्ट्र – 00

Ø २०१९ लोकसभा पक्षीय बलाबल-

Ø भाजपप्रणित एनडीएला ३५३ जागांवर विजय ३७.७ टक्के मतं मिळाली होती.

Ø INDIA या आघाडीतील पक्षांचे मिळून १५० खासदार आहेत. ४५ टक्के मतदान झाले  होते.

Ø तटस्थ असलेल्या राजकीय पक्षांना ६२ खासदार १०.७१ टक्के मतं मिळाली होती.

Ø NDA च्या ३८ पक्षांपैकी २५ पक्षांकडे म्हणजे ६५ टक्के पक्षांकडे एकही लोकसभेची जागा नाही.

Ø INDIAच्या समाविष्ट २६ पक्षांपैकी १० पक्षांकडे म्हणजे ४० टक्क्यांहून अधिक पक्षांकडे लोकसभेत एकही खासदार नाही.

Ø २०१९ लोकसभा निवडणूक वैशिष्टे-

Ø 2019 दोन लाख मताधिक्याने 236 विजयी संसद सदस्यात 164 बीजेपीचे  होते.

Ø 2019 तीन लाख मताधिक्याने 131 विजयी संसद  सदस्यात 105 बीजेपी होते.

Ø बाकीचे  26 सदस्य 10 डीएमके आणि 5 कांग्रेसचे  होते

Ø 2019 चार  लाख मताधिक्याने 44 विजयी संसद  सदस्यात 105 बीजेपी होते.

Ø 2019 पाच लाख मताधिक्याने 15 विजयी संसद सदस्यात 105 बीजेपी होते.

Ø I.N.D.I.A.आणि  N.D.A जमेच्या बाजी-

Ø NDA कडे नरेंद्र मोदीचे नेतृत्व

Ø NDA त भाजप सर्वाधिक मोठा पक्ष त्यामुळे जागावाटप सहज शक्य

Ø  NDA ला सत्ताधारी असल्याचा फायदा

Ø सत्ताविरोधी वातावरणाचा NDA ला फटका बसण्याची शक्यता

Ø  India मध्ये नेतृत्वाचा प्रश्न

Ø India  पक्षात जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता

Ø मतविभागणीचा धोका कमी होईल

Ø सत्ताविरोधी लाटेचा लाभ

Ø एकमेकांना विरोध करणारे किंवा वैचारिक मतभेद असलेले पक्ष India समाविष्ठ

Ø २०२४ लढत-

Ø उत्तराखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, आसाम,केरळ, हरियाना, छत्तिसगढ कॉंग्रेस आणि भाजप थेट लढत

Ø तिरंगी वा चौरंगी लढत- उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, ओडीसा, प.बंगाल, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, मेघालय, नागालँड,  पंजाब, झारखंड  



Ø  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.